Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- जीआयझेड जर्मन चेंबर, डॉन बॉस्को आयटीआय, मोरवाडी आयटीआय व टाटा मोटर्स यांचे संयुक्त विद्यमानाने इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन व मेकॅनिकल मोटर वेहिकल या ट्रेडसच्या विद्यार्थ्यांना अद्यावत ईव्ही टेक्निशियन कोर्स साधारण ३ महिने कालावधीचा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरचा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर व आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स येथे शिकाऊ उमेदवारी उपलब्ध करून दिली जाणार आहे व तदनंतर २ वर्षे कालावधीचा डिप्लोमा कोर्स टाटा मोटर्स यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे ईव्ही कोर्स व डिप्लोमा कोर्सेस ई संपूर्ण विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासोबत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध योजनांची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी वस्ती संसाधन केंद्र उपयुक्त ठरेल. या माध्यमातून वंचित घटकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. प्रतिपादन समाज विकास विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे यांनी केले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फ क्षेत्रीय कार्यालयात पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आणि सेंटर फॉर एडवोकेसी अँड रिसर्च (सिफार) यांच्या संयुक्त विद्यमाने वस्ती संसाधन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.याच्या उद्घाटनप्रसंगी उप आयुक्त ममता शिंदे बोलत होत्या. या उद्घाटन प्रसंगी फ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले, पिंपळे निलखमधील जनतेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले आणि ओबीसी समाजासाठी सातत्याने झटणारे ज्येष्ठ समाजसेवक  सुरेश गायकवाड यांनी आज अधिकृतपणे आप आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अरुणा ताई गायकवाड या 2002 ते 2007 या काळात नरसेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपळे निलख परिसरात आम आदमी पक्षाचे संघटन अधिक बळकट होणार आहे, तसेच सामाजिक समरसतेच्या कार्यात नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गायकवाड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी आणि स्थानिक विकासासाठी लढा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपळे निलख परिसरात अनेक सामाजिक उपक्रम आणि प्रकल्प…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहरात अलीकडे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमध्ये एका महिलेवर कुरिअर एजंटकडून अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर, डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या एजंट्ससाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे यांनी  पुणे जिल्हा निबंधक संजय राऊत यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर आणि कसबा विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा निबंधक संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले.   दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  घरोघर येणाऱ्या कुरिअर डिलिव्हरी एजंट्सची पार्श्वभूमी तपासण्याची सक्ती, त्यांची नोंदणी, ओळखपत्र आणि पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली.  अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी नियमबद्ध…

Read More

पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात राज्यातील पहिल्या आणि एकमेव “वेस्ट टू वंडर वर्ल्ड” थीम पार्कची उभारणी काम जोरात सुरू असून, यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन महत्त्वात लक्षणीय वाढ होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली साकारत असलेले हे प्रकल्प महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरणार आहे. या पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यांसह एकूण १७ ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, या स्मारकांच्या निर्मितीसाठी “वेस्ट टू वंडर” या संकल्पनेनुसार टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. या पार्कच्या उभारणीसाठी एकूण ११.०२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. थीम पार्कमध्ये साकारल्या जाणाऱ्या प्रमुख वास्तूंमध्ये खालील जागतिक स्मारकांचा…

Read More

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हिंजवडी आयटी पार्क व परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या रस्त्यांची स्थिती व प्रशासनातील समन्वयाचा अभाव या गंभीर समस्यांकडे आमदार शंकर जगताप यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लक्ष वेधले. या विषयावर लक्षवेधी सूचना सादर करत त्यांनी वाहनचालक व आयटीयन्सच्या दैनंदिन त्रासाबद्दल आवाज उठवला. विधानसभेत बोलताना आमदार जगताप यांनी सांगितले की, “हिंजवडी फेज १, २ व ३ कडे येणाऱ्या नागरिकांना व आयटीयन्सना भूमकर चौक, डांगे चौक, लक्ष्मी चौक, ताथवडे, वाकड, पुनावळे, ॲम्स्टरडॅम कंपनीमार्गे जाणे भाग पडते. परिणामी, या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. या भागात ३० मीटरचा रिंग रोड, वाकड ते फेज थ्री मुळा नदीच्या…

Read More

 मुख्यमंत्र्यांकडून चौकशी व तातडीच्या कार्यवाहीचे आदेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात (DP) सर्वसामान्य नागरिक, भूमिपुत्र शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटांवर अन्याय करणारी आरक्षणे लादल्याच्या निषेधार्थ चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोन सविस्तर निवेदने सादर केली. या निवेदनांमधून त्यांनी विकास आराखड्याच्या प्रक्रियेमधील त्रुटी, भेदभाव व नियोजनातील गंभीर विसंगतींवर लक्ष वेधले. या निवेदनांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, नगर विकास विभाग यांना आराखड्यातील त्रुटी तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. शंकर जगताप यांनी निदर्शनास आणून दिले…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभेच्या सभागृहाचे लक्ष वेधून घेत त्र्यंबकेश्वरला राज्य सरकारने ‘अ’ वर्गाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्या बद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करत देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील भोरगिरी ( ता.खेड ) येथील श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, श्री क्षेत्र भीमाशंकरलाही अ वर्ग पर्यटन स्थळ दर्जा देण्याची मागणी आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेच्या सभागृहात ओचित्याचा मुद्द्याद्वारे केली आहे. आमदार बाबाजी काळे ओचित्त्याच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, भीमाशंकरला अ दर्जा दिल्यास या भागात पायाभूत सुविधांचा विकास, शाश्वत पर्यटनाला चालना आणि या स्थळाचे संवर्धन शक्य होणार…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राज्यातील महत्त्वाच्या नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी सरकारने तीन टप्प्यांत प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे आणि परिसरातील पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे संपूर्णपणे शुद्धीकरण करण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधानपरिषद सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांचे पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनीही उपप्रश्न विचारला. याबाबत अधिक माहिती देताना उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, इंद्रायणी आणि पवना नदी प्रकल्पाचा (PMRDA मार्फत) एकूण खर्च ६७१…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी येथुन वाहणा-या इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात होत असलेल्या जोरदार संततधारेच्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे पाण्यामुळे इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी दुतर्फा पसरले असून नदी काठाचे रस्ते रहदारीला बंद झाले आहेत. या महापुराचे पाणी शनी मारुती मंदिर परिसर , राम घाट, भक्त पुंडलिक मंदिर, स्वामी महाराज मठ मागील चौंडी घाट परिसरात घुसले आहे. यामुळे नदी घाटावर अनेक ठिकाणी रहदारी बंद झाली आहे. पुराचे पाणी पाहण्यास नदी घाटावर तसेच पुलांचे वर दुतर्फा भाविकांसह नागरिकांनी गर्दी करुन पुराचे पाणी पाहत सेल्फी चा आनंद लुटत आहेत. दक्षता म्हणून पुलांवर जास्त वेळ…

Read More