ताज्या घडामोडीपिंपरी
“कुरिअर डिलिव्हरी एजंटसाठी कठोर नियमावलीची मागणी – महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हा निबंधकांना निवेदन”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहरात अलीकडे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमध्ये एका महिलेवर कुरिअर एजंटकडून अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर, डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या एजंट्ससाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे यांनी पुणे जिल्हा निबंधक संजय राऊत यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर आणि कसबा विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा निबंधक संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घरोघर येणाऱ्या कुरिअर डिलिव्हरी एजंट्सची पार्श्वभूमी तपासण्याची सक्ती, त्यांची नोंदणी, ओळखपत्र आणि पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी नियमबद्ध प्रणाली तातडीने राबवावी. महिलांचे घरात आणि एकट्याने असताना संरक्षण व्हावे यासाठी कठोर उपाययोजना करणं आवश्यक आहे.
यावेळी संपर्कप्रमुख पूजा खोतकर, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अक्षता धुमाळ, तसेच कसबा विधानसभा उपशहरप्रमुख अश्विनी मल्हारे उपस्थित होत्या.
पुणे जिल्हा निबंधकांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित यंत्रणांकडे योग्य सूचना पाठवण्याचे आश्वासन दिले.












