- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुनावळे – काटे वस्ती आणि वाकड – कस्पटे वस्ती येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या देश विदेशातील मुलांनी रविवार, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी अतिशय उत्साहात साजरी केली. साडेतीन वर्षे वयाच्या मुलांपासून विविध वयोगटातील विद्यार्थी या भक्ती दिंडीमध्ये पालकांसह सहभागी झाले होते; तसेच ऑनलाईन पद्धतीने शिकणाऱ्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशातील मुलांनी देखील विठ्ठलनामाचा गजर करून आषाढी एकादशी साजरी केली. विविध भक्तिगीते आणि अभंग गात पायी भक्तिमय दिंडी परिसरातून काढण्यात आली. कस्पटे वस्ती, वाकड येथून निघालेली दिंडी छत्रपती चौक मार्गे विठ्ठल मंदिरामध्ये विसावली. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पावली खेळत, फुगड्या घालत, विठ्ठलनामाचा गजर करत हा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील दापोडी ते निगडी दरम्यानच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई, अनियमितता आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिक त्रस्त झाले असून,या गंभीर प्रश्नावर भाजप आमदार अमित गोरखे यांनी विधानपरिषदेत आवाज उठवला. गोरखे म्हणाले की, “या विकासकामांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दररोज २-३ तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते, कामावर जाणाऱ्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो, आणि संपूर्ण परिसरात अस्वस्थता पसरली आहे.” विशेषतः मोरवाडी चौक ते चिंचवड चौकदरम्यान रस्ते अरुंद व अर्धवट अवस्थेत असल्याने गंभीर वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. कामाचा दर्जा निकृष्ट, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष नागरिकांच्या तक्रारीनुसार, कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून, सुरक्षेच्या प्राथमिक नियमांचेही पालन केले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख व इतर परिसरातील नाल्यांची स्थापत्य विषयक कामे करणे व नालेसफाई करणे, पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनचक्राचे मॅपिंग करणे, प्रभाग क्र. १९ मधील कुकी नाला दुरूस्तीची कामे करणे, महापालिकेचे रस्ते, उद्यान,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुना मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुलाजवळ आणि भक्ती-शक्ती ते निगडी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिराजवळ मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त; स्थानिक नागरिकांचा संताप उसळला आणि अखेर चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील निगडी ते आकुर्डी आणि भक्ती-शक्ती ते निगडी मार्गावरील अपुरे आणि अर्धवट मेट्रो काम, तसेच मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत दिनांक १० जुलै २०२५ रोजी निगडी सिग्नल येथे चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या कामामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असून, विशेषतः निगडी ते आकुर्डी आणि भक्ती-शक्ती ते निगडी मार्गावरील रस्त्यांची अवस्था…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था आणि विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने १० वी १२ वी २०२५ मध्ये माध्यमिक उच्चमाध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४५० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात यश मिळविलेल्यांचाही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि लग्नाची वेडी- सिंधू या मराठी मालिकेतील अभिनेत्री सायली देवधर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमाला युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, शिवसेना महिला उपनेत्या सुलभा उबाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, शहरप्रमुख निलेश तरस, शहर संघटिका सरिता साने, माजी नगरसेविका विमल जगताप, युवती सेनेच्या…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र, अध्यक्षपदी ॲड. रामराजे जी. भोसले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, शंकर जगताप (आमदार चिंचवड विधानसभा), उमा खापरे (आमदार विधान परिषद), अनुप मोरे (अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश), प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली, यांनी कार्याध्यक्ष ॲड. यशवंत खराडे, सचिव ॲड. प्रवीण नलावडे, प्रदेश सदस्य ॲड. दिनकर बारणे, प्रदेश प्रवक्ता ॲड. शंकर वानखेडे, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड. आतिश लांडगे यांच्या उपस्थितीत ॲड. रामराजे जी. भोसले पाटील यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले. ॲड. रामराजे जी. भोसले पाटील यांनी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रथम उपमहापौर विश्राती रामभाऊ पाडळे (वय – ७६) यांचे आज दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या मूळ गावी कांजी भोयरे (ता.पारनेर,जि. अहिल्यानगर) येथे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती रामभाऊ पाडळे, दोन मुले प्रशांत, प्रविण आणि कन्या अनिता विकास शिंदे असा परिवार आहे. उद्या म्हणजे बुधवारी (दि.९) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी कँम्प येथील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे. महिला आरक्षण लागू केल्यानंतर महापालिकेत १९९२ मध्ये त्या उपमहापौर होत्या.
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल’च्या २८व्या संगीतपर्वात या शतकातील महानायक असे गौरवोद्गार ज्यांच्याबद्दल काढले जातात त्या ‘बिग बी’ अर्थातच अमिताभ बच्चन यांच्यावरील निवडक गाण्यांच्या सांगीतिक मैफलीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) रविवार, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी राखी झोपे यांची निर्मिती संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या उत्तम अशा संयोजनातून या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हिरामण राठोड,दिलीप काकडे, जयराम शर्मा, किरण वाघेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आषाढी एकादशीनिमित्त अभंग आणि ‘कानडा राजा पंढरीचा…’ या भक्तिरचनेने मैफलीचा प्रारंभ करण्यात आला.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखड्यात (डीपी) नागरिकांच्या राहत्या घरांवर रस्त्यांची आरक्षणे टाकली असतील तर ती काढली जातील. अनावश्यक आरक्षणाबाबतही निर्णय घेतला जाईल. आराखडा अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे आल्यानंतर त्यात आवश्यक ते बदल केले जातील. त्यातून नागरिकांना दिलासा जाईल. विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नगरविकास विभागाची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. खासदार बारणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे सचिव असीम गुुप्ता यांची भेट घेतली. महापालिकेच्या विकास आराखड्याबाबत असलेला नागरिकांचा रोष शिंदे यांना सांगितले. आराखड्याविरोधात नागरिकांच्या सुरु असलेल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रात अग्रेसर शहर म्हणून ओळखले जाते. यामध्ये पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाबरोबरच सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. बँक ऑफ बडोदाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सफाई कर्मचाऱ्यांबाबत विशेष आदर आहे तसेच त्यांचा गुणगौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे असे बँक ऑफ बडोदाचे विभागीय विकास व्यवस्थापक रजनीकांत चौधरी यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सफाई कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन शनिवारी (दि. ५) थेरगाव येथील स्वर्गीय शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी रजनीकांत चौधरी बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड…
