Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील तसेच हिंजवडी आयटी पार्क या भागात या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवलेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोसायटी फेडरेशन आणि हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित करावी, अशी विनंती आमदार महेश लांडगे यांना फेडरेशनने पत्राद्वारे केली होती. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे सोसायटीधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी व्यक्त केली आहे. शहरातील सर्वच भागातील सोसायटीधारक नागरिक, हिंजवडी आयटी पार्क या भागामध्ये नोकरी व्यवसाय निमित्त जात असताना त्यांना तासाने तास ट्राफिक मध्ये अडकून पडण्याचा भयंकर त्रास होत असल्याबाबत मुख्यमंत्री…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या जनहित व विधी कायदा सेलच्या शहराध्यक्षा ॲड. प्रीतिसिंह परदेशी यांनी आपल्या संपूर्ण कायदा सेलच्या पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. बापू काटेंच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश पार पडला असून, यामुळे मनसेची शहरातील ताकद लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे मानले जात आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड भाजप सध्या दमदार वाटचाल करत आहे. नुकतीच पार पडलेली तिरंगा भारत यात्रा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त शहरात आयोजित विविध कार्यक्रम,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,उद्योगनगरच्या वतीने एक अपत्य किंवा दोन मुली अपत्यावर कुटुंब नियोजन केलेल्या पाच कामगार कुटुंबियाचा सन्मान कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर वाघ ,सचिव राष्ट्रीय कामगार संघ .प्रमुख पाहुणे कामगार नेते किरण देशमुख रवींद्र घाडगे अध्यक्ष प्रीमियम ट्रान्समिशन लिमिटेड , कामगार भूषण डॉ. मोहन गायकवाड            गुणवंत कामगार अण्णा जोगदंड उपस्थितीत झाला.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले की छोटया कुटुंबाची आहे शान ,सदैव उंचावेल जीवनमान. जगात सर्वात मोठी लोकशाही प्रधान देशाची लोकसंख्या 146 कोटीच्या जवळपास…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडीतील बालघरे वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने महावितरणकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत महावितरणचे उपअभियंता श्री. राजेश भगत व स्वी सदस्य दिनेश यादव यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान महिला भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या व वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केली. निवेदनात वस्तीतील वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज येणे, अचानक ट्रिपिंग अशा समस्यांकडे लक्ष वेधून घेतले गेले. यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास, लघुउद्योग आणि दैनंदिन घरगुती कामांवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची निवडणूक 27 जुलै 2025 रोजी पार पडणार असून, संपूर्ण राज्यातून 12 संचालकांची निवड या निवडणुकीतून होणार आहे. ही निवडणूक राज्यातील सहकारी क्षेत्रातील एक महत्त्वाची घटना मानली जात असून, अनेक प्रतिष्ठित सहकारी नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत श्री. प्रवीण दरेकर, श्री. हिरामण सातकर आणि श्री. कुसाळकर यांचे पॅनेल विशेष लक्ष वेधून घेत आहे. याच पॅनेलमधून एनटी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गातून टाटा मोटर्स कर्मचारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक श्री. पोपट हजारे यांनी आपली उमेदवारी अर्ज सादर केली आहे. श्री. हजारे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेतून यशस्वीरित्या पास झाला असून, त्यांची…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र बरेको न्यूज) – नुकताच शासकीय स्कॉलरशिप परीक्षा इ 5 वी व 8 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यांनी उत्तम या संपादन करून मेरिटमध्ये स्थान प्राप्त केल्या बद्दल त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यशस्वी विदयार्थी 1) कु जाधव उत्कर्षा–इ 5 वी.. 226 2) चि.हर्ष ढोकले… इ 5 वी..220 3) चि.भोम्बे आर्यन.. इ 8 वी..240 4) चि. जाधव इशान.. 8 वी..208 5) चि पुजारी हर्षवर्धन..8 वी..232 6) कु पवार श्रेया.. 8 वी..214 संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव सचिव संजय जाधव संचालक मा विजय…

Read More

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी येथील जैन स्थानकामध्ये आनंद शिष्य रत्न,जिनशासन प्रभावक, प्रवचन भास्कर प पू प्रशांत ऋषीजी म सा ,मधुर वक्ता प पू विजय स्मिताजी, प्रखरवक्ता प पू करुणाश्रीजी यांचा चातुर्मास या दापोडी येथील जैन स्थानकामध्ये संपन्न होत आहे. चातुर्मासाच्या प्रारंभीच्या दिवशी गुरु पूर्णिमा आणि आनंद शिष्य रत्न पू प्रशांत ऋषीजी म सा यांचा 65 वा जन्मदिवस हे ही कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले प पू प्रशांत ऋषीजी यांनी यांचा 65 वा जन्मदिन अनेक धार्मिक कार्यक्रम अनुष्ठान आणि गुणांवर कुणाल वाद या माध्यमातून संपन्न झाला प्रशांत ऋषीजी महाराज हे आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांच्या शिष्य असून गेले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या एका वादग्रस्त निर्णयावर आम आदमी पार्टीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’ या खासगी संस्थेकडे पुढील पाच वर्षांसाठी सुपूर्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी महापालिकेच्या निधीतून तब्बल ₹४० कोटी ५३ लाख ७५ हजार खर्च होणार आहे, हे विशेष लक्षवेधी ठरते. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष  रवीराज काळे यांनी याला सार्वजनिक शिक्षणाच्या खासगीकरणाची सुरुवात म्हणत कडाडून विरोध दर्शविला. त्यांनी सांगितले की, “हा निर्णय फक्त आर्थिक बाबतीतच नव्हे, तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अतिशय धोकादायक आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे होत असताना सुरुवातीला महापालिका प्रशासनाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. पाच मजली बांधकामे पूर्ण झाल्यानंतर कारवाईची मोहीम हाती घेतली जाते. त्यामुळे या कारवाईचा खर्च अधिकाऱ्यांकडूनच वसूल करावा, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी. पदपथावर अतिक्रमण होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती करावी. कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याचे निर्देश देत कारवाईमध्ये टाळाटाळ करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त सिंह यांनी दिला होता. याबाबत खासदार बारणे यांनी महापालिका प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, शहरात अनधिकृत बांधकामे होताना सुरुवातीला प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते.…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भयभीत तर हिंदू समाजातील लोकसद्धा झाले आहेत. 10 वर्षांच्या हिंदू मुलींवर पादऱ्यांनी अत्याचार केल्याचा गुन्हा सोनाई पोलीस ठाण्यात दाखल झाला. आमच्याकडे पुरावे आहेत. त्या अत्याचारी पादऱ्यांवर सभागृहात कोणीही बोलले नाही. कोणत्याही अल्पसंख्याक समाजाला घाबरण्याची गरज नाही. पण, हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात आम्ही बोलत असू, तर त्यावर आक्षेप घेण्याचीही गरज नाही. अल्पसंख्यास समाजात भीती आहे, असा चुकीचा संदेश (नॅरेटीव्ह) तयार करण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दांत भाजपा आमदार महेश लांडगे सभागृहामध्ये आक्रमक भूमिका मांडली. ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून अत्याचार केल्यामुळे सांगली येथील ऋतुजा राजगे या महिलेने सात महिन्यांची गरोदर असताना आत्महत्या केली होती. ‘‘प्राण सोडला..पण धर्म नाही..’’…

Read More