ताज्या घडामोडीपिंपरी

उद्योगनगरमध्ये कुटुंब नियोजन करणाऱ्या पाच कुटुंबांचा सत्कार

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,उद्योगनगरच्या वतीने एक अपत्य किंवा दोन मुली अपत्यावर कुटुंब नियोजन केलेल्या पाच कामगार कुटुंबियाचा सन्मान कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर वाघ ,सचिव राष्ट्रीय कामगार संघ .प्रमुख पाहुणे कामगार नेते किरण देशमुख रवींद्र घाडगे अध्यक्ष प्रीमियम ट्रान्समिशन लिमिटेड , कामगार भूषण डॉ. मोहन गायकवाड            गुणवंत कामगार अण्णा जोगदंड उपस्थितीत झाला.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले की छोटया कुटुंबाची आहे शान ,सदैव उंचावेल जीवनमान. जगात सर्वात मोठी लोकशाही प्रधान देशाची लोकसंख्या 146 कोटीच्या जवळपास गेलेली असून जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 18% नागरिक हे भारतात राहत आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत ही बाब चिंताजनक असून राष्ट्रीय आणि पर्यावरणासाठी सुद्धा  हानिकारक आहे.असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

किरण देशमुख प्रमुख पाहुणे म्हणाले की,देशाची लोकसंख्या  संतुलित ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन करणे ही काळाची गरज आहे .मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव करू नये.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर वाघ म्हणाले की संघटित कामगार कमी होत चाललाय आणि असंघटित कामगार कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही गोष्ट चिंताजनक आहे,कामगार देश धडीला जाताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

उद्योगनगर केंद्राचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे  म्हणाले की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील केंद्रामध्ये लोकसंख्या दिन साजरा करून एक अपत्य किंवा दोन मुली अपत्यावर कुटुंब नियोजन केलेल्या कामगार कुटुंबाचा मंडळाच्या वतीने सन्मान केला जातो ही गोष्ट भूषणावर आहे.

प्रबोधन दिंडीत सहभागी झालेल्या कामगार व कामगार कुटुंबीयांना प्रमाणपत्राचे वाटप सहाय्यक कल्याण आयुक्त म्हणून पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सुभाष चव्हाण यांनी एक आपली रचना सादर केली.

यावेळी योगेश नागवडे (सी.आय.इ) प्रवीण आरबोले (एस.एफ.एस. ग्रुप इंडिया )चंद्रकांत साळुंखे ( पीएमपीएल )मंगेश भोसले (कैलास वाहन प्रा.लि. ) संतोष अडचुले(टाटा मोटर)यांना शाल श्रीफळ पुष्पगुछ व पाच हजार रपयाचा धनखदेश देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर वाघ,प्रमुख पाहुणे कामगार नेते किरण देशमुख,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील ,रवींद्र घाडगे अध्यक्ष प्रीमियम ट्रान्समिशन लिमिटेड ,कामगार भूषण डॉ.मोहन गायकवाड, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, शंकर नाणेकर ,सुभाष चव्हाण ,तानाजी एकोंडे, राजेश हजारे,कल्पना भाईगडे, मोहम्मदशरीफ मुलानी, बाळासाहेब साळुंके,हनुमंत जाधव संदीप रांगोळे, मच्छिंद्र कदम,प्रकाश चव्हाण शिवराज शिंदे, दत्तात्रय देवकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन केंद्र संचालक प्रदिप बोरसे, सुनील बोराडे ,संदीप गावडे,अनिल कारळे,अविनाश राऊत यांनी केले.
सूत्रसंचालन  सुनिल बोराडे यांनी केले आणि कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली तर आभार उद्योगनगरचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button