- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -भाजपा शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न बापु काटे यांनी पालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांना लेखी निवेदणाद्वारे निळू फुले नाट्यगृह संदर्भातील काही प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. आपल्या निवेदनात शत्रुघ्न काटे यांनी लिहले आहे की,निळू फुले नाट्यगृह हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे एक प्रमुख नाट्यगृह असून हे शहरातील एक अत्यंत महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे,जेथे अनेक नाट्यप्रयोग,संगीत मैफिली, शालेय व महाविद्यालयीन कार्यक्रम सातत्याने पार पडत असतात.पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत पारदर्शकता,वेळेची बचत,गैरव्यवहार टाळणे आणि प्रक्रियेला डिजिटल स्वरूप देणे या उद्दिष्टांच्या अधीन राहून नाट्यगृहासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली असावी परंतु गेल्या काही काळात या नाट्यगृहासाठी सुरू करण्यात आलेली…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित ३२व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेसाठी गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत कविता पाठवाव्यात, असे आवाहन नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी केले आहे. सदर स्पर्धा प्रत्यक्ष सादरीकरण करून घेण्यात येईल. स्पर्धेसाठी इच्छुक कवीने आपली एक कविता अनिकेत गुहे (सहकोषाध्यक्ष) यांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९८२२८८४९९२ वर टाईप करून पाठवायची आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खालील नियमावलीचे पालन करावे. १) कवितेला विषयाचे बंधन नाही. २) कविता किमान १२ ते कमाल २० ओळीपर्यंत असावी. यापेक्षा दीर्घ असू नये. ३) सुरुवातीला ‘नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित श्रावणी काव्य स्पर्धा ३२ साठी’…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- राज्य शासनाच्या विशेष अधिकाराने सन २०१२ मध्ये थेट नियुक्ती देण्यात आलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना गेल्या १२ वर्षांपासून शासनाच्या विविध लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या मुद्द्यावर विधान परिषदेत आवाज उठवत मा. आमदार अमित गोरखे यांनी शासनाकडे स्पष्ट मागणी केली की, “या खेळाडूंना तातडीने न्याय देण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलवावी आणि त्यांच्या समस्या सोडवाव्यात.” 2005 व 2010 च्या धोरणानुसार थेट नियुक्त झालेल्या खेळाडूंना विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट लावण्यात आली आहे. मात्र हे खेळाडू सातत्याने देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांना विभागीय परीक्षा देण्याची संधी मिळालेली नाही, आणि त्यामुळे त्यांना वेतनवाढ,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने विकसित होणाऱ्या वाकड, पुनावळे, ताथवडे भागात नागरी सुविधांची कमतरता आहे. या भागात बांधकाम परवानग्या दिल्या जातात. पण, सुविधा दिल्या जात नाहीत. या भागातील पाणी, कचरा, लाईट, रस्त्यांच्या समस्या आठ दिवसात निकाली काढण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. वाकड, पुनावळे, ताथवडे या प्रभागातील नागरिकांकडून रस्ते, लाईट, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेविषयी सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यापार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी मंगळवारी “ड” प्रभाग कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता विद्युत सचिन नांगरे, मुख्य आरोग्य अधिकारी योगेश फस्ते, सहायक आरोग्य अधिकारी एस.ए. माने,…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -चित्पावन सेवा संघ चिंचवड द्वारे दरवर्षी प्रमाणे तानाजीनगर चिंचवड येथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.श्रीरंग गोखले तसेच चित्पावन संघाचे अध्यक्ष अरुण चितळे,ज्येष्ठ विश्वस्त प्रभाकर लेले व गंगाधर जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा वेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्या डॉ. शिल्पगौरी गणपुले, तसेच माधुरी ओक व गीता कंठस्थ पुरस्कार विजेत्या श्रीमती प्रिया जोग या सर्वांनी त्यांचे विचार मांडले व नंतर त्यांचे सत्कार करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले सौ आगरकर व मेघना मराठे यांनी आभार प्रदर्शन केले.
देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत परंपरेचा गौरवशाली वारसा जपत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी तब्बल १७ वर्षांनंतर आळंदी मार्गे देहूला परतणार आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, यंदाचा पालखी सोहळा विशेष ऐतिहासिक ठरणार आहे. यंदा श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष, तसेच तुकाराम महाराजांचे ३७५ वे वैंकुंठगमन वर्ष एकत्र येत असल्याने हा एक अद्वितीय संयोग मानला जात आहे. या विशेष प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी यांनी ११ जुलै २०२५ रोजी तुकाराम महाराज संस्थानला २० जुलै रोजी आळंदी मुक्कामी…
पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिशा सोशल फाऊंडेशनचे ज्येष्ठ संचालक तसेच माजी अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले यांची थेरगाव येथील प्रेरणा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय या शिक्षण संस्थेत प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने मंगळवारी (१५ जुलै) दिशा सोशल फाऊंडेशन परिवाराच्या वतीने त्यांचा शिवप्रतिमा, स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. दिशा सोशल फाऊंडेशनच्या स्थापनेपासूनच कार्यरत असलेले नाना शिवले हे शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, सहकारी संस्थाशी संबंधित आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिध्द सूत्रसंचालक, वक्ते व मुलाखतकार म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत. महापालिकेच्या शिक्षण मंडळावर सदस्य आणि उपसभापती म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत त्या संधीचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील संस्थेमध्ये दाखल असणाऱ्या अनाथ मुलींवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी अत्याचार केले जातात. त्यांचा छळ केला जातो, त्यांच्याकडून सार्वजनिक शौचालय साफ करून घेणे, त्यांचे केस कापणे, त्यांच्या देवतांच्या मूर्ती फोडून धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो. या संस्थेची मान्यता रद्द करून धर्मांतरण विरोधी कायदा पुढील अधिवेशनात आणावा अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. या संस्थेमध्ये दाखल झालेल्या अनाथ मुलींवर अत्याचार केले जातात, तसेच त्यांना वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली परदेशात पाठवले जाते. त्यांचे पुढे काय होते ? त्या परत भारतात आल्या का नाही याची माहिती…
मुंबई , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी-जाधववाडी येथील दीपक भगत यांना कर्ज देण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेतली. त्याच्या आधारे बनावट कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या माध्यमातून बोगस बिले सादर केली आणि इनपूट टॅक्स घेवून सरकारचा करोडो रुपयांचा वस्तू व सेवा कर (GST) बुडवला आहे. सेवा कर गुप्तवार्ता संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असली, तरी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याची चर्चा करुन गृह विभाग व जीएसटी विभागाकडून आरोपींवर कठोर करावाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. जाधववाडी येथे राहणारा मोहम्मद कैश रहमानी याने कर्ज देण्याच्या बहाण्याने दीपक भगत यांची कागदपत्रे घेतली. त्याद्वारे बोगस…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘न्यायप्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता नवोदित वकिलांसाठी प्रेरणादायी असून युवा पिढीने न्याय, नीतीमत्ता आणि लोकशाही मूल्यांची शिकवण घ्यावी!’ असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांनी पिंपरी येथे केले. दर्द से हमदर्द तक संस्था आणि एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ व १३ जुलै रोजी ऑक्सफर्ड शैली राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय सभागृह, मोरवाडी, पिंपरी येथे ‘कॉलेजियम प्रणाली : शाप की वरदान?’ या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याच्या बक्षीस वितरण समारंभात अंबादास जोशी बोलत होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश साळशिंगीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीता साळशिंगीकर, सुभद्रा…
