चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
चित्पावन संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -चित्पावन सेवा संघ चिंचवड द्वारे दरवर्षी प्रमाणे तानाजीनगर चिंचवड येथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.श्रीरंग गोखले तसेच चित्पावन संघाचे अध्यक्ष अरुण चितळे,ज्येष्ठ विश्वस्त प्रभाकर लेले व गंगाधर जोशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा वेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्या डॉ. शिल्पगौरी गणपुले, तसेच माधुरी ओक व गीता कंठस्थ पुरस्कार विजेत्या श्रीमती प्रिया जोग या सर्वांनी त्यांचे विचार मांडले व नंतर त्यांचे सत्कार करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले सौ आगरकर व मेघना मराठे यांनी आभार प्रदर्शन केले.















