Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साडेचार मीटर उंचीचा नवा सुसज्ज बंधारा बांधण्यात यावा, अशी लेखी मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे समक्ष भेट घेऊन केली. या पत्रात आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत रावेत बंधाऱ्यातून दररोज पिंपरी-चिंचवड महापालिकेला ४८० एमएलडी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) १२० एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. हा बंधारा सुमारे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश कालखंडात बांधण्यात आला असून आज तो मोठ्या प्रमाणावर गाळाने भरला आहे. यामुळे पाण्याची साठवण क्षमता…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील औद्योगिक आस्थापनांना महापालिकेकडून येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत औद्योगिक व लघुउद्योगांसमोरील तातडीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विधानभवनात पिंपरी चिंचवड लघुउद्योजक यांच्या विविध समस्या बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा, पिपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अर्चना पठारे, महापारेषानचे अधिकारी व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, महापालिकेकडून विविध उद्योजकांना देण्यात आलेल्या LBT च्या नोटिसांचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा. तसेच…

Read More

कर्तृत्वावरच मिळणार पद! शहारध्यक्ष यांचे स्पष्ट संकेत” भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा समितीच्या इच्छुक मुलाखती यशस्वीरित्या पार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्ष,पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा समितीच्या अंतर्गत नव्याने नियुक्त होणाऱ्या विविध विभागीय समित्यांमध्ये पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती नुकत्याच मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. यावेळी एकूण १८० इच्छुक कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यात आली. अजूनही ही प्रक्रिया प्रगतिपथावर असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. जिल्हा कार्यकारिणीसाठी १ अध्यक्ष, ८ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस(१ SC/ST, १ महिला ), ८ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी (७ महिला,२ SC/ST) तसेच ६९ जिल्हा कार्यकारिणी सदस्य (२३ महिला व ४ SC/ST) अशी रचना असते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील डॉ. मनीषा भिकन शेवाळे-सुर्वे यांनी वारंगल, तेलंगणा येथील एस. आर. विद्यापीठातून स्ट्रक्चरल रेट्रोफिटिंग विषयात संशोधन करीत पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. डॉ. मनीषा भिकन शेवाळे-सुर्वे यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये हाय अ‍ॅस्पेक्ट रेशो कॉलम रेट्रोफिटिंग युजिंग स्पेशलायझ्ड फॅब्रिक मॉर्टार टीआरएम मेथड या विषयावर संशोधन केले. हे नाविन्यपूर्ण संशोधन स्ट्रक्चरल रिहॅबिलिटेशन डिझाईन क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे आहे. या संशोधनासाठी त्यांना अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. पीएच. डी. पदवी प्राप्त करीत त्यांनी उल्लेखनीय शैक्षणिक उपलब्धी मिळविली आहे. कुटुंबाची जबाबदारी व संशोधन यामध्ये उत्तम समतोल राखत त्यांनी केलेल्या यशस्वी संशोधनाचे विशेष कौतुक होत आहे.

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओला-उबर मोबाईल ॲप-आधारित कंपन्यांच्या दरांच्या निश्चितीसंदर्भात पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हॅचबॅक कॅबसाठी ₹२५, सेडानसाठी ₹३० आणि एसयूव्ही (SUV) वाहनांसाठी ₹३६ प्रति किलोमीटर असे दर तात्काळ निश्चित करण्याची मागणी विविध टॅक्सी व कॅब संघटनांच्या वतीने एकमुखाने करण्यात आली. या बैठकीत ओला-उबरसारख्या ॲप-आधारित कंपन्यांमार्फत सेवा पुरवणाऱ्या कॅब चालक-मालकांसाठी न्यायोचित व व्यवहार्य दर निश्चिती करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, राहुल जाधव यांच्यासह मुख्य लिपिक जगदीश कांदे व संबंधित अधिकारी उपस्थित…

Read More

– शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांना निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिर शाळेत १ ते ७ वी पर्यंत सुमारे १५० पटसंख्या असलेल्या वर्गासाठी केवळ दोनच शिक्षक सेवा देत आहेत. असे असताना महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये शिक्षकांची कमरता असून प्राथमिक शाळांमध्ये तब्बल १८४ पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, देशाची भावी पिढी अंधारात चाचपडत आहे. ही बाब स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहरासाठी शोकांतिका आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची तत्काळ भरती करावी, अशी आग्रही मागणी युवा नेते विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.  याबाबत विशाल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड परिसरातील आकुर्डी खंडोबा चौक येथे सध्या महामेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र या कामामुळे चौकात मोठा सर्कल तयार झाला असून रस्ताही अरुंद झाल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत चालली आहे. या गंभीर समस्येमुळे स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आकुर्डी-चिंचवड मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी युवा नेते विशाल काळभोर यांनी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवडकडे वळताना मध्येच लागणाऱ्या लाल सिग्नलमुळे अनेक वेळा वाहनचालक व ट्रॅफिक पोलिस यांच्यात वाद होतो. तसेच आकुर्डी ते चिंचवड आणि पुन्हा आकुर्डीकडे येणाऱ्या मार्गावर उभारण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडून सध्या आयटी पार्क परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि. २९ जुलै) माण गावठाण हद्दीत रस्त्याचे रुंदीकरण सुरू करण्यात आले. या कामादरम्यान, अंदाजे १.२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत ३६ मीटरप्रमाणे मार्किंग करण्यात आले. गावठाणातील नागरिकांचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन हिंजवडी पोलिस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मार्किंग प्रक्रियेस मंगळवारी दुपारी सुरुवात झाली. मात्र, ही प्रक्रिया माणदेवी चौकाजवळ पोहोचताच ग्रामस्थांनी ३६ मीटर रुंदीकरणास तीव्र आक्षेप नोंदवला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त केली असून रस्त्याच्या इतक्या मोठ्या रुंदीकरणामुळे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत स्वतंत्रपणे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालय स्थापन होणार असून, हा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुमोदनामुळे अंतिम झाला आहे. दिनांक 29 जुलै 2025 रोजी हा प्रस्ताव अधिकृतपणे मंजूर करण्यात आला असून, यामुळे पिंपरी चिंचवडमधील 35 लाखांहून अधिक नागरिकांना आणि 2300 पेक्षा अधिक वकिल बांधवांना थेट लाभ होणार आहे. या निर्णयामागे पिंपरी चिंचवड अ‍ॅडवोकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. रामराजे जी भोसले पाटील, संपूर्ण माजी कमिटी आणि महाराष्ट्र व गोवा राज्य नोटरी निरीक्षक अ‍ॅड. आतिश लांडगे यांचे अथक परिश्रम, सातत्यपूर्ण पत्रव्यवहार आणि सरकारी स्तरावर पाठपुरावा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरासाठी न्याय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले असून, येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशा दोन न्यायालयांची स्थापना केली आहे. तसेच, राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत या न्यायालयांसाठी आवश्यक पदांना मंजुरीही देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षकार आणि विधीतज्ञांकडून गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड न्यायालयाचा विस्तार व्हावा, अशी मागणी होत होती. याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सातत्त्याने पाठपुरावा केला आहे. वास्तविक, दि. १ मार्च १९८९ साली पिंपरी-चिंचवड न्यायालयाची स्थापना झाली. मात्र, अद्याप इमारतीचा प्रश्न सुटला नव्हता. पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक व नागरी शहरात स्वतंत्र न्यायालयांची गरज गेल्या अनेक वर्षांपासून…

Read More