Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी (आप) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने शहरातील सर्व महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात PMPML आणि PMPL या दोन्ही सार्वजनिक बस सेवा महिलांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. या उपक्रमाची अधिकृत घोषणा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केली असून, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की शहरातील सर्व भगिनींना शिक्षण, नोकरी तसेच दैनंदिन गरजांकरिता आता कोणताही खर्च न करता सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची हमी देण्यात येत आहे. श्री. काळे यांनी सांगितले की, दिल्लीत आणि पंजाबमध्ये महिलांसाठी मोफत बससेवा राबवून आम आदमी पार्टीने मोठे यश संपादन केले आहे. त्याच…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील विविध महानगरपालिकांमधील कामगार प्रतिनिधींचा एक महत्त्वपूर्ण राज्यव्यापी मेळावा दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात पार पडला. या मेळाव्याचे प्रस्ताविक फेडरेशनचे प्रवक्ते गौतम खरात यांनी केले. या मेळाव्याला बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सोलापूर, मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, अमरावती, नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, पनवेल, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, लातूर, धुळे, अहिल्यानगर, परभणी, इचलकरंजी या महानगरपालिकांचे कामगार प्रतिनिधी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांवर सखोल चर्चा झाली. अनेक कर्मचाऱ्यांना ३ ते ४ महिन्यांपासून वेतन न मिळणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला गती मिळाली असून, प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश महानगरपालिकेची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी केंद्रीभूत करणे, नागरी सेवा अधिक सुलभ करणे आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. हा प्रकल्प ३६ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या नवीन इमारतीचे तळघरातील तीन मजले आणि तिसऱ्या मजल्यापर्यंतचे बांधकाम सध्या पूर्ण झाले आहे. पूर्णत्वास आल्यानंतर ही इमारत नागरी सेवा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, संग्रहालय, प्रदर्शन हॉल आणि ई-गव्हर्नन्स सेंटरसारख्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. ही प्रशासकीय इमारत ८.६५ एकरच्या विस्तृत भूखंडावर उभी…

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६२ तक्रार वजा सूचना प्राप्त पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६२ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषा आपल्या अभिमानाशी व संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. या भाषेच्या संवर्धनासाठी महापालिका कटिबद्ध असून अभिजात मराठी भाषा दिन आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने सर्वसमावेशक कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जाणार आहेत, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले. मराठी भाषा संवर्धनासाठी शहरात कार्यरत असणाऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी आपला सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार येत्या ३ ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी भाषा दिन’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संस्थेच्या न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संस्थापक सचिव कालवश विद्याधर चाबुकस्वार यांचा २२ वा स्मृतिदिन मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. या प्रसंगी भारतीय बौद्धजन विकास समितीचे प्रमोद गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नागलोक असोसिएशन चे पुरुषोत्तम गाणार, बारटी च्या संगीता शहाडे मॅडम, तात्या शिनगारे, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमोद गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्याधर चाबुकस्वार यांची पत्नी विठाबाई चाबुकस्वार यांच्या चार मुलं व एक मुलगी अभ्यासात नेहमीच उत्तम होती. शिक्षणाबाबत त्यांचा…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पर्यावरणाची जपवणूक करत धार्मिक परंपरा कायम राखण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय शिंदे यांनी महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र पाठवून, घरगुती आणि लहान सार्वजनिक गणेश मंडळांच्या शाडू मातीच्या गणेश मूर्तींना पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रवाहात विसर्जन करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. पर्यावरणाची काळजी घेतानाच, नागरिकांच्या भावनांचाही आदर करण्याची गरज त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून, महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) च्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनावर बंदी घातली आहे. शिंदे यांनी महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, हा निर्णय…

Read More

तळेगाव ढमढेरे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांती दिनाच्या निमित्ताने (दि.९ ऑगस्ट) आद्यक्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे स्मृती स्थळ,तळेगाव ढमढेरे येथे शब्दधन काव्यमंचतर्फे क्रांती काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले.    कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक,पत्रकार अरुण बोऱ्हाडे होते.निवृत्त वायुसेना सैनिक नामदेव हुले, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर,तळेगाव ढमढेरे गावच्या उपसरपंच किर्ती गायकवाड प्रमुख अतिथी होते.      याप्रसंगी ग्रंथपाल शोभा हिंगणे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कंक,हभप अशोक महाराज गोरे, आण्णा गुरव, पांडुरंग सुतार,दत्तात्रय कांगळे यांची उपस्थिती होती.     क्रांतिवीर विष्णू गणेश पिंगळे स्मारकाच्या प्रवेशद्वारापासून ते स्मारक स्थळापर्यंत ‘वंदे मातरम’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘शहीद विष्णू पिंगळे अमर है’ अशा घोषणा देत फेरी काढण्यात आली.       याप्रसंगी अरुण बोऱ्हाडे म्हणाले, “क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा आयुक्तांकडून झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात 5000 पेक्षा अधिक आंबेडकरी कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित नागरिक सहभागी झाले. मोर्चाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभेने त्याची सांगता झाली. आयुक्तांवर सात दिवसांत कारवाईचा इशारा निषेध सभेत आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकमुखाने आयुक्तांवर सात दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत कारवाई न झाल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टाळा ठोकण्याचे आंदोलन तीव्र करण्याचा…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिन’ तर ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या काळात पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करणारे विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी, मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता बैठक आयोजित केली आहे. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात…

Read More