न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियमस्कूलमध्ये विद्याधर चाबुकस्वार यांना २२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संस्थेच्या न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संस्थापक सचिव कालवश विद्याधर चाबुकस्वार यांचा २२ वा स्मृतिदिन मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भारतीय बौद्धजन विकास समितीचे प्रमोद गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नागलोक असोसिएशन चे पुरुषोत्तम गाणार, बारटी च्या संगीता शहाडे मॅडम, तात्या शिनगारे, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रमोद गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्याधर चाबुकस्वार यांची पत्नी विठाबाई चाबुकस्वार यांच्या चार मुलं व एक मुलगी अभ्यासात नेहमीच उत्तम होती. शिक्षणाबाबत त्यांचा दृष्टिकोन काटेकोर होता. यामुळेच त्यांच्या मुलांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे यश मिळवले. आज त्यांच्या कुटुंबातील डॉ. वसंत चाबुकस्वार हे नौरोजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य आहेत, सुनबाई वैशाली चाबुकस्वार या मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत, संदीप चाबुकस्वार पुणे महानगरपालिकेत ज्युनिअर इंजिनिअर आहेत, अरुण चाबुकस्वार यांनी कठीण परिस्थितीत इंग्लिश मीडियम शाळा उभी केली, प्रमोद चाबुकस्वार यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तर मुलगी प्रतिभा कांबळे या चाकण-कुरळी गावच्या उपसरपंच आहेत.”
ते पुढे म्हणाले, “गरीब आणि वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेची सुसज्ज इमारत उभारण्याचा व विद्यार्थ्यांना अल्पदरात व्यावसायिक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
कार्यक्रमात पूजा देवगिरीकर, डिंपल काळे व गीतांजली दुबे यांनीही कालवश विद्याधर चाबुकस्वार यांच्या विषयी आपली मतं व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन समृद्धी वाघमारे यांनी केले.








