Author: maharashtrabreakingnews.com

१,०२९ सदनिकांसाठी ५,३१७ अर्जदार पात्र – आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार प्रक्रिया; ‘म्हाडा’च्या प्रणालीद्वारे पारदर्शकता पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ मधील गृहप्रकल्पातील शिल्लक १,०२९ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. बुधवारी (८ एप्रिल २०२६) सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ही सोडत पार पडणार आहे. या प्रक्रियेत ५,३१७ पात्र अर्जदारांचे भवितव्य ठरणार असून, ‘पीएमआरडीए’ने याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. या गृहयोजनेसाठी एकूण ५,३६७ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननीनंतर ५० अर्जदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित ५,३१७…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने निर्माण झालेल्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. महापौरांनी नमूद केले की, शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रशासनिक यंत्रणा सक्षम राहणे अत्यावश्यक आहे. सध्या अनेक विभागांमध्ये मनुष्यबळ अपुरे असल्याने नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांनी विद्यमान तसेच आगामी काळात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती तात्काळ सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आवश्यक त्या पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करून भरती प्रक्रिया गतीमान करण्यावरही भर देण्यात…

Read More

आमदार शंकर जगताप मित्र परिवाराकडून सामाजिक बांधिलकी ​पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘आमदार शंकरभाऊ जगताप मित्र परिवारा’च्या वतीने शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेट वाटप करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ​वाढदिवसाच्या निमित्ताने होणारी अनावश्यक होर्डिंगबाजी आणि खर्च टाळून थेट विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपयोगी पडणारी वस्तू भेट देण्याचा निर्णय आमदार शंकरभाऊ जगताप मित्र परिवाराने घेतला आहे. महापालिकेच्या विविध प्राथमिक शाळांमध्ये या वाटप प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने शहरातील २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जात आहे.…

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, महानाट्यासह शाहिरी जलसा, गीत गायन, नृत्यकला, काव्य संमेलन, चर्चासत्र अशा विविध प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार होणार सहभागी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  महात्मा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी जयंती वर्ष तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ जयंतीच्या निमित्ताने शासन निर्देशाप्रमाणे सामाजिक समता सप्ताह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन ११ एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ याकाळात करण्यात आले आहे. पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब…

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुळा नदीवरील सांगवी–बोपोडी पुलावरील विद्युत रोषणाई व सुशोभीकरण या कामाचे लोकार्पण  व नामकरण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मुळा नदीवरील सांगवी–बोपोडी दरम्यान असलेल्या विद्यमान पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण करण्यात आले असून, पुलावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व सुशोभीकरणामुळे या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आकर्षक वातावरणात प्रवासाचा अनुभव मिळणार असून, शहराच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुळा नदीवरील सांगवी–बोपोडी पुलावरील विद्युत रोषणाई व सुशोभीकरण या कामाचे लोकार्पण तसेच पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण…

Read More

देशभरातील निवडक लोकप्रतिनिधींच्या यादीत ‘पिंपरी-चिंचवड’चा सन्मान; गोव्यातील परिषदेत ‘विकसित भारत’वर मांडणार भूमिका पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘कॉमनवेल्थ संसदीय संघटना (CPA) वेस्ट झोन–७’ तर्फे गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या परिषदेसाठी आमदार श्री. अमित गोरखे यांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. दिनांक ८ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान होणाऱ्या या परिषदेत देशातील निवडक आणि अभ्यासू आमदारांनाच पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आमदार गोरखे यांना या परिषदेच्या ‘मुख्य पूर्ण अधिवेशनात’ आपले विचार मांडण्याची अत्यंत महत्त्वाची संधी देण्यात आली आहे, ही बाब त्यांच्या नेतृत्वगुणांची व धोरणात्मक दृष्टीकोनाची राष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याचे स्पष्ट करते. राष्ट्रीय दिग्गजांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अमेरिका, इस्राइल आणि इराणच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे कामगारांवर मोठे संकट कोसळले असून त्यांच्या जेवणाचे हाल होत आहेत म्हणून कम्युनिटी किचन सुविधा व शिव भोजन थाळी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज करण्यात आली. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना निवेदन पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील आणि पुण्यातील कष्टकरी, कामगारांवर कोरोना सारखी परिस्थिती उडवलेले असून त्यांचे हातचे काम गेले आहे अशा कामगारांना परत जाण्यासाठी आणि पुन्हा येण्यासाठी ते खर्च करू शकत नाहीत कारण पगार मिळत नाही,…

Read More

प्रेरणादायी कार्यकर्त्यांचा दिमाखदार सन्मान सोहळा संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – शून्यातून विश्व उभं करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून कष्ट, जिद्द आणि समाजाला काहीतरी देण्याच्या भावनेचा सन्मान असतो. उद्योजक भरत गीते यांच्या कार्याचा गौरव म्हणजे त्यांच्या जिद्द, सचोटी आणि समाजाभिमुख कार्याची पावतीच आहे. त्यांचा प्रवास नव उद्योजकांना कायम प्रेरणा देत राहील, असे मत खासदार Shrirang Barne यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. 6) आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. रमा मंगल सोशल फाऊंडेशनच्या कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले. समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून पिंपरी-चिंचवड तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची…

Read More

पीसीसीओइ करते सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे काम – डॉ. निळकंठ चोपडे पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पीसीसीओइच्या माजी विद्यार्थ्यांनी नोकरी, उद्योग, व्यवसायात जे यश मिळवले आहे. त्याचा पीसीसीओइ व्यवस्थापन आणि सर्व प्राध्यापकांना अभिमान वाटतो. या माजी विद्यार्थ्यांमुळे आमचीच प्रतिमा उज्ज्वल होत आहे, येथे चांगली नोकरी, व्यवसाय करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाते. त्याच बरोबर एक जबाबदार सुसंस्कृत आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवून देशाच्या विकासात हातभार लावणारा नागरिक घडवण्याचे काम केले जाते. येथे ज्ञान, कौशल्य आधारित प्रकल्प राबवित विविध उपक्रम आणि मॉक टेस्ट इंटरव्ह्यू घेतात. यामुळे विद्यार्थी तयार होतात असे प्रतिपादन पीसीसीओइचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांनी केले.     पिंपरी चिंचवड एज्युकेशन…

Read More

केंद्रीय विहार सोसायटी मध्ये बालगोपालांची रामलीला संपन्न पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) लहान मुलांना मोबाईल पासून दूर रहावे आणि आपली कला, संस्कृती समजून घ्यावी यासाठी त्यांना सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच त्यांच्यामध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे मत मोशी प्राधिकरण येथील केंद्रीय विहार सोसायटीचे सचिव मुकुंद पवार यांनी व्यक्त केले.      रामनवमी निमित्त मोशी, प्राधिकरण सेक्टर चार येथील केंद्रीय विहार सोसायटी मध्ये बालगोपालांची रामलीला आयोजित करण्यात आली होती. तसेच ‘गोल्डन टेन डेज’ या उपक्रमात १० दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी…

Read More