Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण,मंडळ संत तुकारामनगर येथे  उपस्थित नागरिकांना  पर्यावरणाची व प्लॅस्टिक न वापरण्याची शपथ आण्णा जोगदंड यांनी देऊन समाज प्रबोधन करून 79 वा स्वतंत्र दिन साजरा केला. यावेळी शहरात प्रथमच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्या संगीता जोगदंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संगीता जोगदंड म्हणाल्या की मला ज्या मंडळाने गुणवंत कामगार पुरस्कार दिला त्याच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संत तुकारामनगर केंद्रात मला ध्वजारोहणाचा सन्मान मिळाला हे माझे नशीबच आहे , कामगार कल्याण मंडळ जात, धर्म, पंथ असा भेदभाव न करता कामगाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. आणि सर्वांनी कामगार कल्याण योजनांचा…

Read More

पिंपळे सौदागर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. चॅलेंजर पब्लिक स्कूलसोबत सिटी इंटरनॅशनल स्कूलनेही रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रसंगी शाळेचे संचालक संदीप काटे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याच्या अमूल्य वारशाची जपणूक करण्याचे, तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आणि देशाच्या प्रगतीसाठी निष्ठेने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, तिरंगा केवळ एक ध्वज नसून तो आपल्या अस्मितेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या उपसंचालिका सौ. अनिता काटे यांनीही आपल्या विस्तृत भाषणातून विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त, आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा ७८ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी उपस्थितांना आयुक्त शेखर सिंह यांनी शुभेच्छा दिल्या. आयुक्त सिंह म्हणाले,’भारतीय स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा उत्सव आपण घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवून आनंदाने साजरा करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व महान व्यक्तींच्या त्यागाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या देशाच्या इतिहासाची सुवर्ण पाने आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. सर्वप्रथम मी सर्व शहरवासियांना भारतीय…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांत “पसायदान पठण” आयोजित करण्यात आले. या अनुषंगाने महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक “पसायदान पठण” झाले. या प्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, एनएसएस कार्यक्रम अधिकारी गणेश भांगरे, एनसीसी ए.एन.ओ. लेफ्ट. प्रसाद बाठे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रतिमा कदम तसेच तिन्ही विद्याशाखांचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. डॉ. संगीता आहिवळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे आणि कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक रुपाली जाधव उपस्थित होते. या उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षकवर्ग, प्रशासकीय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची आकर्षक वेशभूषा धारण करून ‘गोविंदा आला रे आला’ या गाण्यावर नृत्य सादर केले. श्रीकृष्णाच्या बाललीलेबद्दल माहिती देण्यात आली तसेच पाळणा आणि आरतीचे गायन करून वातावरण भक्तिमय करण्यात आले. इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या मुला-मुलींनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्याने गोविंद पथकाने पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून उत्सवाला जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण केले. या प्रसंगी शाळेचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त रहाटणी, पुणे येथील लाडक्या बहिणींनी ५५० राख्या पाठवून हृदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या आहेत. “देवाभाऊ, तुम्ही चांगलं काम करत आहात; तुम्हाला दीर्घायुष्य लाभो!” अशा भावनिक संदेशासह या राख्या पाठवण्यात आल्या, ज्यामुळे फडणवीस यांच्यावरील प्रेम आणि विश्वास दिसून येतो. रहाटणीतील महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक सक्षमीकरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर, ९ ऑगस्ट २०२५ रोजी या योजनेचा १३ वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला, ज्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. यावेळी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ६५.०० मी. रुंद बाह्यवळण रस्त्यांचे क्षेत्र मिळण्यासाठी नव्याने नगर रचना योजना कार्यान्वित करण्यासाठी मान्यता द‍िली आहे. त्यानुसार धामणे, गोदुंबरे, दारूंबरे, साळुंब्रे, सांगवडे या गावांमधील प्रस्तावित नगर रचना योजनेबाबतच्या तरतुदींची माहिती देणे, धोरणात्मक बाबी समजावून सांगणे, नगर रचना योजनेच्या इराद्याबाबत, क्षेत्राबाबत व नकाशाबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी (दि.१४) प्राधिकरण कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या योजनेमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यापूर्वी त्यांच्या शंकांचे निरसन आणि समन्वयातूनच पुढील प्रक्रिया राबवणार असल्याची ग्वाही महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. नव्याने मंजूर झालेल्या टीपी स्कीमच्या अंमलबजावणीसंदर्भात आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेच्या अंतर्गत संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.रॅलीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून झाली कोकणे चौक ते चालेंजर स्कूल ते लिनिअर गार्डन ते एन.सी.पी स्कूल ह्या मार्गाने रॅली काढण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे, संस्थेचे अध्यक्ष अरुण चाबुकस्वार, सी. पी. एस. स्कूलचे अनिता काटे, उन्नती फौंडेशनच्या कुंदा भिसे, पिंपळे सौदागर मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर , संदीप काटे, संजय भिसे, संदेश काटे, मनोज…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या “उद्धव श्री २०२५” पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ आणि राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे धनादेश वाटप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावर्षीचा “उद्धव श्री २०२५” पुरस्कार उद्योजक विश्व चोरडिया तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे राजेश म्हस्के यांना जाहीर झाला आहे अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष व संयोजक माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार आणि संयोजक सचिव माधव मुळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. रविवारी (दि.१७…

Read More

भोसरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये भारतातील ग्रंथालयाचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त संपन्न करण्यात येणारा “ग्रंथपाल दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी डॉ एस. आर .रंगनाथन यांच्या पवित्र स्मृतिस अभिवादन करून त्यांच्या ग्रंथालयाचे संदर्भातील कामगिरी ची माहिती दिली,प्रा पगारिया म्हणाले,”डॉ रंगनाथन हे भारतीय ग्रंथालय संस्कृती चे जनक असून ते गणितज्ञ आणि पुस्तकालय तज्ञ होते .त्यांचे ग्रंथालयाच्या विकासामध्ये फार मोठे योगदान आहे. ग्रंथ, ग्रंथपाल आणि वाचक यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ग्रंथालय. शिक्षणामध्ये वाचनाचे फार महत्व आहे,वाचनाशिवाय अभ्यास नाही, अभ्यासाशिवाय ज्ञानार्जन नाही. या क्षेत्रात” वाचाल…

Read More