Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या पाणी विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी रहाटणी परिसरातील पवना नदी काठ परिसराची पाहणी करून महापालिका प्रशासन आणि नागरिकांना सूचना दिल्या. त्रिभुवन यांनी पवना नदीच्या काठावर असलेल्या पवनानगर, गंगानगर, रहाटणी गावठाण आणि श्री शंकर मंदिर परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे उपअभियंता श्री. बोरसे, कनिष्ठ अभियंता अमित पवार आणि आरोग्य अधिकारी गणेश राजगे उपस्थित होते. नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकप्रिय भारताचे तत्कालीन सातवे पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंती व राष्ट्रीय सदभावना दिना निमित्त ( दि. २०) राजीव गांधी प्रतिष्ठान तर्फे हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांना पुरस्कार व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते संदेश नवले म्हणाले, “स्व. राजीव गांधींच्या स्मृती प्रित्यर्थ १९९२ पासून ” स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड शहर , पुणे ” हे गेली बत्तीस वर्षे सातत्याने प्रतिवर्षीच्या ‘ २० ऑगस्ट ‘ २०२५ रोजी स्व. राजीव गांधींच्या जयंती आणि राष्ट्रीय सद्भावना दिनाच्या औचित्यावर सामाजिक एकोपा व सौहार्दतेसाठी कार्य करणाऱ्या…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे बुधवारी (दि.२०) लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,सावित्रीबाई फुले…

Read More

केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील सध्याचा सर्वात संवेदनशील असलेला मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी यासंदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत संतांच्या भूमीत मसाज पार्लरच्या नावाखाली चालणारा वेश्याव्यवसाय तात्काळ थांबवावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. काळेवाडी येथील इंदू लॉन्स याठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना नानासाहेब जावळे पाटील यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली. याप्रसंगी केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, केंद्रिय सहकार्यध्यक्ष भिमराव मराठे, प्रदेश महासचिव मनोज आण्णा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरण येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम करत असताना झालेल्या एका भीषण दुर्घटनेत तीन कष्टकरी मजुरांचा— रमेश पवार, संतोष यादव आणि महेश खांबे—यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 30 लाख रुपये नुकसानभरपाई आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष आणि कष्टकऱ्यांचे लढवय्या नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केली आहे. ही मागणी मजुरांच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय आणि आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबांचे भविष्य सुरक्षित होईल. या गंभीर प्रकरणी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने सातत्याने…

Read More

भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून व्याजासह रक्कम वसूल करा – काळुराम पवार पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. पुढील दोन आठवड्यात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून हडप केलेली रक्कम व्याजासह वसूल करावी आणि या भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या ठेकेदारांना काळया यादीत टाकावे अशी मागणी माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी संतोष तेलंग, किरण तेलंग, जितेंद्र ननावरे, गणेश शिंदे, तेजस आगमने, आनंद भिल्ला, मयूर…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी गावठाण परिसरातील कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलावर एस.टी. महामंडळाच्या बसगाड्या अत्यंत धोकादायक पद्धतीने थांबवल्या जात असून, त्यामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात आले आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एस.टी. महामंडळास कडक शब्दांत इशारा दिला आहे की, हा धोकादायक बसथांबा तात्काळ हटवावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासून आंदोलन छेडले जाईल. मनसे शहराध्यक्ष सचिन तुकाराम चिखले यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष कमलेश धणराळे यांना आज हे चौथे आणि अंतिम निवेदन देण्यात आले. यावेळी योगेश लंगोटे, आकाश कांबळे, जय सकट, अनिल चव्हाण व मयूर खरात उपस्थित होते. निगडीतील मारुती मंदिराजवळील भुयारी मार्गाशेजारी, उड्डाणपुलाच्या मध्यावर बसगाड्या…

Read More

निगडी प्राधिकरण दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना १० लाखाचे अर्थसहाय्य द्या पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यदिनी निगडी प्राधिकरण येथे बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबरचे काम करणाऱ्या निष्पाप ३ कष्टकरी कामगारांचा मृत्यू झाला. याला ६ दिवस उलटले तरी गुन्हा नाही, मदत नाही यामध्ये बीएसएनएल विभाग, जिल्हा अधिकारी, कामगार विभाग व पोलीस प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून प्रशासकीय यंत्रणा एकमेकावर जबाबदारी ढकलत आहेत, याप्रकरणी आज कष्टकरी कामगारांची जबाबदारी ढकलायची नाय..! म्हणत कष्टकरी संघर्ष महासंघाच्या तर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात कामगार आक्रोश आंदोलन करण्यात आले. बीएसएनएल कार्यालय चिंचवड येथे झालेल्या आंदोलनात राज्य संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, उपाध्यक्ष राजेश माने, महिलाअध्यक्षा माधुरी…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेला ९ ऑगस्ट रोजी २९ वर्षे पूर्ण झाले आहेत. २३ ऑगस्ट २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शाखेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे शाखेच्या नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या मान्यवरांना ‘‘कै. बालगंधर्व’, ‘कै. स्मिता पाटील’, ‘कै. आचार्य अत्रे’, ‘कै. अरुण सरनाईक’, ‘कै. जयंत दळवी’ ई. मान्यवरांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच शहरातील स्थानिक कलाकार व रंगमंचावरील विविध तंत्रज्ञ यांना विषेश पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती अ.भा.मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुहास जोशी,राजेंद्र बंग,संतोष रासने,संतोष शिंदे,गौरी…

Read More

कीर्तनकार संग्राम भंडारेंवर कडक कारवाई करण्याची प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी ज्येष्ठ नेते आणि स्वच्छ प्रतिमेचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात केलेल्या धमकीवजा आणि भडक विधानाचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शाखेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या विधानात नाथुराम गोडसेसारख्या खुनी व्यक्तीचा उल्लेख करून त्याचे अप्रत्यक्ष उदात्तीकरण करण्यात आले असून, ही बाब लोकशाहीच्या मूल्यांवर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरेवर घातक हल्ला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.…

Read More