- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याकरीता आणि हरकती मागविण्याकरिताच्या प्रस्तावाला राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप अधिसूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या website वर आणि मुख्य कार्यालयात आज (दि.२२) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१७ प्रमाणे ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असणार आहेत. प्रभागात या भागांचा समावेश.. प्रभाग क्र.०१ – चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती इत्यादी., ऐश्वर्यम कोर्टयार्ड, शाईन सिटी इमारत इ. प्रभाग क्र.०२ – चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, वुडस व्हिला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी भाग…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जैन समाजाचा सर्वात मोठा धार्मिक सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्युषण महापर्वाचे आयोजन दुबईत भक्तिभावाने पार पडले. पुण्यातील ज्येष्ठ समाजसेवक आणि स्वाध्यायी डॉ. अशोककुमार पगारिया यांनी या धर्मसभेमध्ये पर्युषण पर्वाचे महत्त्व सांगत विचार मांडले. “पर्युषण हे जप, तप, साधना, संतवाणी आणि स्वाध्याय या पंचसूत्रीवर आधारित आत्मशुद्धीचे पर्व आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. या अष्टदिवसीय पर्वात साधू-साध्वींच्या जिनवाणीमधून श्रावकांना धर्म, त्याग, अपरिग्रह, विरक्ती आणि आत्मा-परमात्म्याच्या एकात्मतेचे मार्गदर्शन मिळते. रोज प्रवचन, प्रार्थना, प्रतिक्रमण, व्रत आणि तपश्चर्या यामुळे जैन समाज भक्तिभावाने एकवटतो. या काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. यावर्षी प्रथमच अखिल भारतीय स्वाध्याय संघाच्या वतीने तीन…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वेस्ट टू वंडर थीम पार्कचे काम पुढील दोन महिन्यांत काटेकोर नियोजनासह पूर्ण करा. उद्यानात उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रत्येक प्रतिकृतीचे काम दर्जेदार करण्यात यावे. हे उद्यान अधिक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण होण्यासाठी प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील ‘वेस्ट टू वंडर थीम पार्क’ला भेट देत सुरू असलेल्या सर्व कामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांनी पार्कमधील फूड स्टॉल, नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा, तिकीट काउंटर, सुशोभीकरणाच्या दृष्टिने वृक्ष लागवड, वास्तूंची सुरक्षितता, सुरक्षा रक्षकांची नेमणूक, कंपाऊंड भिंतीचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत सेना महाराज नाभिक खान्देश मंडळ पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने खंडोबा माळ, आकुर्डी येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजातील सर्व स्तरांतील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री रोहिदास सैंदाणे यांच्या भक्तिमय प्रवचनाने झाली. त्यानंतर मंडळाचे अहवाल वाचन श्री निंबा सोनवणे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र फुलपगारे यांनी केले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त सचिन हिरे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आणि खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना नामदेव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तब्बल ५२५ वर्षांची परंपरा लाभलेली, चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तीची भाद्रपद पालखी यात्रा येत्या रविवारपासून (ता. २४) सुरू होत आहे. ०२ सप्टेंबरला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली. पालखी सोहळ्याचे वेळापत्रकही त्यांनी यावेळी जाहीर केले. चिंचवड येथील महान गाणपत्य श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज हे दरमहा श्रीमयूरेश्वराच्या दर्शनास मोरगाव येथे जात असत. त्यांनी सन १५६१ साली चिंचवड येथे पवना नदीच्या काठावर संजीवन समाधी घेतली. श्रीमोरया गोसावी महाराजांना वयाच्या ११७ व्या वर्षी सन १४८९ मध्ये श्रीमयुरेश्वराची तांदळामूर्ती श्री क्षेत्र मोरगाव येथील कऱ्हा नदीच्या पात्रात,…
महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध, २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असणार, हरकतींसाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत… प्रभाग नऊ सर्वाधिक तर प्रभाग पाच सर्वात कमी लोकसंख्येचा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकिसाठी प्रभाग रचना निवडणूक विभागाने आज जाहीर केली. विशेष म्हणजे रचनेत कुठलाही फरक नसून २०१७ चीच रचना आहे तशीच कायम ठेवण्यात आली आहे.चार सदस्यांचा एक असे एकूण, ३२ प्रभाग आहेत त्यानुसार २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असणार आहेत. प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वाधिक लाेकसंख्येचा, तर प्रभाग क्रमांक पाच हा सर्वात कमी लाेकसंख्येचा आहे. या प्रभाग रचनेवर चार सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहेत.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील कृष्णानगर प्रभागात वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शरदनगर स्पाईन रोड स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव पालिका प्रशासन व वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुयारी मार्गाच्या समस्यांवर नागरिकांची नाराजी शरदनगर, घरकुल, कोयनानगर, महात्मा फुले नगर, शिवाजी पार्क या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून स्वामी विवेकानंद भुयारी मार्ग बांधण्यात आला. मात्र, पूर्ण झाल्यानंतर लगेचच तो अपयशी ठरल्याच्या चर्चांना…
पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध यंत्रणांमार्फत उपाययोजनांवर भर दिला जात आहे. यात प्रामुख्याने प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने तातडीने मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. गुरुवारी त्यांनी औंध कार्यालयात विविध प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत तातडीने अपेक्षित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पुणे शहरासह इतर काही भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठोस पावले उचलली जात आहेत. हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतुकीसह नागरी समस्या निकाली काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ते रुंदीकरणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यासह रिंग…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राम नगर चिंचवड येथे कै.विलास (आप्पा) काळभोर प्रतिष्ठान व तसेच अजय काळभोर युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने गोपाळ भक्तांनी या सार्वजनिक उत्सवाला हजेरी लावली, तसेच उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दहीहंडी उत्सवाला प्रमुख आकर्षण होते सिनेतारका शिवाली परब (फेम – हास्य जत्रा) हे होते.यावेळी अनुप मोरे (महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा), युवा सेना सचिव विश्वजीत बारणे, अजित शितोळे,(अध्यक्ष आकुर्डी व्यापारी संघटन), महेश काटे(सामाजि कार्यकर्ते),संदिप चिंचवडे(सामाजिक कार्यकर्ते),भाऊसाहेब भोईर(मा. विरोधी पक्षनेते), प्रसाद(भाई)शेट्टी(माजी नगरसेवक), काळुराम पवार(माजीनगरसेवक),मारुती भापकर (माजी नगरसेवक),विशाल काळभोर(कार्याध्यक्ष रा.काॅ.पा शरद पवार गट पिं.चिं.), माऊली सुर्यवंशी (सामाजि कार्यकर्ते)मान्यवर पाटीलबुवा चिंचवडे.…
पिंंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी जप्ती मोहिम हाती घेतली आहे. नुकतीच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी १८ ऑगस्ट २०२५ रोजी मालमत्ता कर आकारणी व वसुली विषयक आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आणि सहायक आयुक्तांनी थकबाकीदारांच्या वसुलीबाबत पहिल्या टप्प्यात ५ लाखांवरील थकबाकीदारांवर जप्ती मोहिम राबविण्याबाबत सूचना दिल्या. २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जप्तीची कारवाई राबवली जाणार असल्याचे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले. शहरात ५ लाखांवरील एकूण ६९९…
