Author: maharashtrabreakingnews.com

महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित समाजव्यवस्थेचा परिसंवादातून उहापोह पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा विचार समाजात रुजविण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे, जातिभेद व अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणे आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे या त्यांच्या कार्यातून समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा पाया घातला. महात्मा फु्ले यांचे विचार आजही समाजाच्या विकासासाठी मार्गदर्शक असल्याचे मत  ‘महात्मा फुले यांना अभिप्रेत समाजव्यवस्था’ या विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह…

Read More

शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी उपक्रम पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘समाजाशी समन्वय साधणारा खरा साहित्यिक असतो!’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी विवेक वसाहत, केशवनगर, चिंचवड येथे शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांचा विशेष सन्मान करताना प्रा. तुकाराम पाटील बोलत होते. महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून आणि जगद्गुरू तुकाराममहाराज यांच्या ‘आवडे हे रूप | गोजिरे सगुण | पाहता लोचन | सुखावले ||’ या अभंगाचे तानाजी एकोंडे यांनी केलेल्या गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंत्तीनिमित्त खराळवाडी, पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील महात्मा फुले स्मारक येथे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी असे शहराध्यक्ष योगेश बहल बोलत होते की, ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतिराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व…

Read More

पिंपरी-चिंचवडकरांनी विश्वासाला कदापि तडा जावू देणार नाही! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तब्बल ५२ कोटी रुपयांची बिले लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अदा केली. यामध्ये ठकेदार किंवा नगरसेवक यांचा दोष नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांने अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यावर भाजपाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पर्दाफाश केला. पिंपरी-चिंचवडकरांनी विश्वासाने सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेची संधी दिली. त्यामुळे शहरवासीयांच्या विश्वासाला आम्ही कदापि तडा जावू देणार नाही. ‘‘चुकीच्या कामांना अंकूश हीच भाजपाची कार्यप्रणाली आहे’’ अशी भूमिका भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मांडली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील तब्बल ५२ कोटी रुपयांच्या आर्थिक प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली. स्थायी…

Read More

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सोमवारी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशा ताईंनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या संस्कारातून संगीताचे धडे घेतले. सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा २० पेक्षा अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड करून विक्रम प्रस्थापित केला. “पिया तू…

Read More

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी घेतला निर्णय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा शंभर टक्के वापर व्हावा, तसेच महापालिकेचा व्यवहार अधिक सोपा, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा, या उद्देशाने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, कुशाग्र कदम, वर्षा जगताप, तुषार सहाणे, कुंदा भिसे, शेखर चिंचवडे यांच्यासह महापालिका सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त…

Read More

पिंपळेगुरव येथे  ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद १५ प्रकारचे दाखले एकाच छताखाली उपलब्ध पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “भारतीय जनता पक्ष हा अंत्योदयाचा विचार घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि नागरिकांच्या समस्यांचे विनाविलंब निराकरण करणे, हेच आमच्या सुशासनाचे अर्थात गुड गव्हर्नन्स मुख्य सूत्र आहे. या शिबिरांच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा थेट जनतेच्या दारी आणून नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले. पिंपळेगुरव  येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात  ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रस्व अभियान’ अंतर्गत आयोजित ‘समाधान शिबिराचे’ उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, यावेळी ते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. दिव्या सागर चरण यांना सामाजिक न्याय व कामगार कल्याण क्षेत्रातील योगदानाबद्दल लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वाल्मीकि समाजातून मानद डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. डॉ. चरण या ससून रुग्णालयाच्या दक्षता समितीच्या (Vigilance Committee) पहिल्या महिला सदस्य म्हणूनही कार्यरत असून, त्यांनी या माध्यमातून सफाई कामगार व वंचित घटकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे कार्य केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सफाई कामगार, वंचित व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक सफाई कामगारांच्या सुरक्षितता, सन्मान आणि…

Read More

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या सुमारे ५००० विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत विश्वशांतीसाठी नवकार महामंत्राच्या जपात आज उत्साहात सहभाग नोंदवला. यावेळी संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, “संपूर्ण विश्वाच्या शांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी ‘विश्व नवकार दिवस’ आज एकाच वेळी जगभरात साजरा करण्यात येत आहे. समाजात एकता, शांती आणि सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी या सामुदायिक नवकार महामंत्र जपाचे जगभरात आयोजन करण्यात आले आहे.” जगात शांतता नांदो, या हेतूने ‘जितो’ पुण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तब्बल ५२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणात भाजप नगरसेवकांसह आमदारांचाच थेट सहभाग असल्याचा आरोप करत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. शिवसेना उपनेत्या नगरसेविका सुलभा उबाळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक संदीप वाघेरे, निलेश बारणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सुलभा उबाळे म्हणाल्या की, ३० व ३१ मार्च २०२६ रोजी झालेल्या उपसूचनांच्या आधारे अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात बिले काढण्यात आली. विशेष म्हणजे, या…

Read More