पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंत्तीनिमित्त खराळवाडी, पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील महात्मा फुले स्मारक येथे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी असे शहराध्यक्ष योगेश बहल बोलत होते की, ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतिराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. भारतीय समाजातील महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक आणि ‘सत्यशोधक समाजा’चे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव आहे.
याप्रसंगी ॲड.गोरक्ष लोखंडे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले, १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा पाया रचला. जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यांचे कार्य खूप मोठं आहे, अशा या थोर क्रांतीसूर्याला मी विनम्र अभिवादन करतो.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे, नगरसेवविका वर्षा जगताप, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, शक्रुल्ला पठाण, दत्तात्रय जगताप, अभिजीत आल्हाट, दिलीप पानसरे, उद्योग व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, सरचिटणीस राजेंद्र पवार, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष राजेंद्र कदम, युवक शहर संघटक स्वराज शिंदे, सरचिटणीस राजू चांदणे, गणेश गायकवाड, कुमार कांबळे, सचिन शिंदे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

