Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेसंबंधी सुरू असलेल्या कार्यवाहीचा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा घेतला. टप्पा एक, दोन, तीन आणि चारसंदर्भात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेऊन तातडीने भूसंपादन प्रक्रिया आणि मोजणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने प्रस्तावित रिंग रोडसह इतर महत्त्वाचे काही रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. रिंग रोड टप्पा एक, दोन, तीन आणि चार असे असून सद्यस्थितीत टप्पा क्रमांक एक सोलू ते निरगुडीमधील ३ गावांची भूसंपादन प्रक्रिया अंतिम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथील यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ २०२५’ या स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कला जनसेट’चे सर्वेसर्वा व प्रसिद्ध उद्योजक मनोजकुमार फुटाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक शाह, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शाह, सदस्य संजय साने, गणेश खांडगे, विलास काळोखे, निरुपा कानिटकर, बाळासाहेब काकडे, रणजित काकडे, युवराज काकडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. अमृता सुराणा, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे…

Read More

मोशी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी गायकवाड वस्ती येथील लोटस नंदनवन या सोसायटीमध्ये एवढा तुफान पाऊस चालू असताना देखील रोज चार चार पाच पाच टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील यावर कोणत्याही प्रकारचा मार्ग निघत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार असल्यामुळे पाण्यासारखी मूलभूत गोष्ट देखील महानगरपालिकेकडून पुरेशा प्रमाणात मिळत नाही. याबाबत चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन कडे तक्रार केल्यानंतर. चिखली – मोशी- चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष  संजीवन सांगळे यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री चेतन देवरे यांना प्रत्यक्ष सोसायटीमध्ये घेऊन जाऊन पाणीपुरवठ्याबाबत पाणीपुरवठा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वप्न पाहिलेल्या स्वच्छ भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत पिंपरी चिंचवड महापालिकेकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेला सामाजिक चळवळीचे रूप देणे, नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. महापालिकेने या अभियानांतर्गत १६ दिवसांच्या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण, लोकसहभाग वाढवणारे कार्यक्रम आखले असून त्यातून नागरिकांना प्रत्यक्ष कृतीतून सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमांमध्ये नागरिक, व्यापारी वर्ग, स्वयंसेवी संस्था, महिला गट व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे विशेष सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहरातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, स्वदेशी विचारसरणी, आत्मनिर्भरतेची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धा, नाट्यप्रयोग, भूमिका-अभिनय, प्रश्नमंजुषा, संगीतगायन, काव्यवाचन, कथाकथन, घोषवाक्यलेखन आणि चित्रकला अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सर्जनशील क्षमतेला चालना मिळावी, तसेच त्यांना सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक विषयांवर विचार करण्यास प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘अर्थसंकल्पात नागरी सहभाग’ या उपक्रमाला विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्थसंकल्प २०२६–२७ साठी तब्बल ५ हजार १०२ नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले आहेत. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा दुप्पट आहे. गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत २ हजार २७९ नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले होते. यंदा १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला असून शहरातील सर्व आठ प्रभागांमधील रहिवाशांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये प्रभाग ‘ड’ मधून सर्वात जास्त १ हजार १६१ अभिप्राय प्राप्त झाले आहेत. अभिप्राय पाठवण्यासाठी तीन दिवस बाकी असताना म्हणजेच १३ ते १५ सप्टेंबर २०२५ या काळात तब्बल २…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार मार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा दि. १७ सप्‍टेंबर २०२५ रोजी राज्‍यभर होणार असून राज्‍यस्‍तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्‍हाण सेंटर, रंगस्‍वर सभागृह नरिमन पॉईंट येथे मा.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव २०२५” चे आयोजन १९ ते २१ सप्टेंबर पर्यंत ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण निगडी येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व महोत्सवाचे अध्यक्ष जब्बार पटेल हे असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह तथा प्रशासक आणि महोत्सवाचे निमंत्रक यांच्या शुभहस्ते होणार आहे.      यानंतर सात वाजता कर्नाटक श्री. इदागुणजी महागणपती यक्षगान मंडळी केरेमाने कर्नाटक यांचे पंचवटी ही कथानाट्य असलेली – यक्षगान प्रयोगकला…

Read More

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने गौरी-गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा व आदर्श शिक्षक सन्मान कार्यक्रम पिंपळे सौदागर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा व भा.ज.पा. चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. गौरी-गणपती सजावट ४८ स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले. विजेच्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ,शिक्षक दिनानिमित्त पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील २९७ आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील विविध रहिवासी सोसायट्यांतील शिक्षकांचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे हिंदी दिवस संपन्न झाला .या प्रसंगी हिंदी भाषेचे महत्त्व,गौरव आणि साहित्यिक परंपरा यावर प्रकाश टाकत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. त्यानंतरमहाविद्यालयाच्या उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख प्रो. (डॉ.) कामायनी सुर्वे यांनी प्रास्ताविक केले . समारंभाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध साहित्यिक व अनुवादक,स.प.महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) गोरख थोरात होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ‘हिंदीतील रोजगाराच्या संधी’या विषयावर विचार मांडले. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून व्यक्तीच्या अभिव्यक्तीचे साधन आहे, असे सांगून त्यांनी हिंदीमध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी व…

Read More