- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डिजिटल माध्यमातून पारदर्शक व सुलभ प्रशासन देणे हे महापालिकेचे प्राधान्य आहे. समाज विकास विभागाच्या सर्व योजना एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्याने अधिकाधिक पात्र नागरिकांना या योजनांचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या कामकाजात तांत्रिक पारदर्शकता व गतीशीलता आणण्यासाठी बनविण्यात आलेल्या स्वतंत्र वेबपेजच्या अनावरण प्रसंगी आयुक्त सिंह बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले,सह आयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, समाज विकास विभाग उप आयुक्त ममता शिंदे यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महापालिका आयुक्त तथा प्रशासक…
मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर, शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टाळ-मृदुंगाचा निनाद… लेझीम-ढोलताशांचा गजर… आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष… अशा संस्कृतीच्या सुवर्ण धाग्यांनी गुंफलेली मराठी भाषेची गौरवमयी ग्रंथदिंडी जणू अक्षरांच्या रथावरून मार्गक्रमण करीत आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पोहोचली. अभिजात परंपरेचा अभिमान, साहित्यसंपदेचे वैभव आणि समाजजीवनाचा उत्सव एकवटून आलेल्या या ग्रंथदिंडीने पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवर मराठी अस्मितेचा जागर केला. शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग असणारी ही ग्रंथदिंडी मोरया गोसावी मंदिर, गांधी पेठ, चाफेकर चौक मार्गे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आल्यानंतर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषेचे माधुर्य, लोकसंगीताची लय आणि मातीच्या गंधात रुजलेली लोकपरंपरा… या तिन्हींचा सुरेल संगम पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने सादर झालेल्या ‘फोक प्रबोधन’ कार्यक्रमातून रसिकांनी अनुभवला. लोककलांच्या सजीव स्वरांनी, नृत्यांच्या तालांनी आणि मराठी अस्मितेच्या ओलाव्याने भरलेला हा सोहळा केवळ कलात्मक मेजवानी नव्हे, तर मराठी संस्कृतीच्या शतकांपूर्वीच्या लोकसंस्कृतीच्या ठेवा नवपिढीपर्यंत पोहोचवणारा ठरला. मराठी संस्कृतीतील शब्द, संगीत आणि नृत्य यांचा सुरेख संगम अनुभवताना रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरण एफ एस एस ए आय, एफ डी ए आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने प्रा रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आज पथारी, हातगाडी,टपरी धारकांना प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले त्यात तब्बल ७१७ विक्रेत्यांनी विक्रमी नोंद करून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला उपस्थित विक्रेत्यांना एप्रॉन कॅप व अन्नपदार्थ बनवताना ची सुरक्षा साधने मोफत वाटप करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या केंद्रीय संचालक ज्योती हरणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर,किसन भोसले, अलका रोकडे, यांचेसह महासंघाचे संघटक अनिल बारवकर,कार्याध्यक्ष इरफान चौधरी, उपाध्यक्ष राजेश माने, बालाजी लोखंडे,सुनील भोसले, नंदू आहेर, सूरज…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी बहुजनांच्या शिक्षणाद्वारे रयतेचा पाया मजबूत केला. पारंपारिक शिक्षणाबरोबरच उद्योजकीय शिक्षणाची असलेली गरज त्यांनी अधोरेखित केली. कर्मवीरांनी रोवलेले कमवा आणि शिका योजनेचे चे बीज आज जगभर अंगीकृत केले गेले आहे.” असे प्रतिपादन पंढरपूर येथील युवा उद्योजक मा. शशिकांत कराळे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले महाविद्यालय, नव महाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय, पिंपरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी असेही सांगितले की महात्मा जोतीराव फुले यांच्या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांच्या इंडक्शन कार्यक्रमाचे उद्घाटन गोपिसन अटायर अँड लाइफस्टाईल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राज मुच्छाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक , सचिव डॉ. दीपक शहा होते. यावेळी व्यासपीठावरती संस्थेचा खजिनदार भूपाली शहा, डॉ . तेजल शहा, संचालक डॉ. सचिन बोरगावे विभाग प्रमुख प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. मनीष पाटणकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री मुच्छाल पुढे म्हणाले, आयुष्यात नैराश्य तेव्हा येते , जेव्हा आपल्यामध्येच कमतरता असते. यासाठी स्वतःत बदल घडवा. वेळेचे अपव्यय टाळा. ज्ञान…
कामशेत (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या, अपेक्षा व गरजा प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद अभियानास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत आमदार सुनील शेळके यांनी कामशेत शहर, कुसगाव खुर्द व चिखलसे गावांना भेट दिली. यावेळी कामशेत शहरातील गणेश मंगल कार्यालय, बाजारपेठ तसेच कुसगाव खु. व चिखलसे येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. या संवादादरम्यान वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या—पिण्याच्या पाण्याची टंचाई, अंतर्गत रस्ते व गटार व्यवस्था, कचऱ्याचे व्यवस्थापन या मुद्द्यांवर नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेऊन…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोणावळा-खंडाळा या राज्यातील महत्वाच्या पर्यटन केंद्रातील कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने बायो-CNG प्रकल्पाच्या आराखड्याला हिरवा कंदील मिळाला. लोणावळा शहरात सध्या दररोज सुमारे ७० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. ओला, सुका, प्लास्टिक आणि ई-कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने विभाजन करून प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक केंद्र उभारण्यात येणार आहे. जुन्या डंपिंग यार्डमध्ये साचलेला जवळपास १ लाख मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्याचाही…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीविहार सोसायटीत गेली नऊ वर्षे महिलांनी सुरू केलेला एक स्तुत्य अध्यात्मिक उपक्रम म्हणजे ‘श्रीविहार श्रीसूक्तपठण महिला मंडळ’. या मंडळाची सुरुवात स्नेहा, वृशाली आणि गौरी या तीन मैत्रिणींच्या साध्या चर्चेतून झाली. एकदा गणपती मंदिरात बसल्या असताना त्यांना विचार सुचला – “आपण नवरात्रोत्सवाच्या काळात श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम का करू नये?” या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी सोसायटीतील ज्येष्ठ आणि सक्रिय महिलांशी संपर्क साधला. देशपांडे , ढोले , आशा , सायली धारप आणि पोरेड्डी आणि त्या सर्वांनी या उपक्रमाला मनापासून अनुमती व पाठिंबा दिला. मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवात नऊ दिवस दररोज संध्याकाळी पाच ते सात या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथील शंभूराजे गोशाळा येथे गोपुजन व चारा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात गोमातेचे पूजन केले व गाईंसाठी चारा वाटप करण्यात आले. या वेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आले होते. शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या वेळी भाजयुमो पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ‘गोमाता की जय’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थित युवा मोर्चा शहराध्यक्ष…
