- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय उद्यमिता विकास संस्था (EDII) व अॅक्सेंचर तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने रुपी नगर,पुणे येथे मायक्रो स्किलप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम (MSDP) अंतर्गत कृषी, बाजारपेठ व अन्नप्रक्रिया उत्पादनांवरील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. हा प्रशिक्षण उपक्रम 03 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर 2025 पर्यंत राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मा.नगरसेवक शांताराम बापू भालेकर, भगवान हरकळ ( EDII Manager) ज्योती हेलवे,( एरिया को-ऑर्डिनेटर माविम) अमृता गोडसे ( मास्टर ट्रेनर)यांनी सहभागी महिलांना प्रमाणपत्रे प्रदान केली. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबन, उद्यमशीलता व स्थानिक रोजगारनिर्मिती याकडे प्रवृत्त करणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान महिलांना व्यवसाय नियोजन, वित्त व्यवस्थापन, विपणन…
आमदार शंकर जगताप यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग) – अखेर वाकड ते मामुर्डी दरम्यानच्या सेवा रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या होर्डिंग्ज काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांना लवकरच वाहतूक कोंडीच्या त्रासातून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी काही दिवसांपूर्वी या परिसरात पाहणी दौरा करत संबंधित अधिकाऱ्यांना काम तातडीने सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यांच्या निर्देशानंतरच आज प्रत्यक्ष कामाला गती मिळाली आहे. कामाची सुरुवात होताच ठिकठिकाणी डांबरीकरण, अतिक्रमण हटविणे, सर्विस लाईन शिफ्ट करणे आणि वाहतूक मार्ग मोकळा करणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI),…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थी दक्षेत शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञानदान करतात. यशस्वी विद्यार्थी घडविण्याची त्यांची धडपड आहे. शिक्षक आपल्या कार्यातून विद्यार्थ्याच्या जिवनाला आकार देण्याचे काम करत असतात, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी व्यक्त केले. भोसरी, इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता मंदिर प्रांगणात रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ इंद्रायणीनगर भारतीय जनता पक्ष व श्री साई चौक मित्र मंडळ विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या वतीने भारताचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहा अंतर्गत तसेच जागतिक शिक्षक दिनाचाही आऊचित्त साधून प्रभाग क्र. ८ मधील शिक्षक गौरव समारंभ पार पडला. या सोहळ्यात मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, शिक्षक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहतूकदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यव्यापी संपाच्या तयारीसाठी सुरू असलेल्या जनजागृती दौऱ्याला पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याअंतर्गत आज ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांचे इचलकरंजी येथे आगमन झाले. यावेळी शहरातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत केले. शहरात आगमन होताच डॉ. कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर श्री आवाडे जनसंपर्क कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली, ज्यात शेकडो चालक-मालक सहभागी झाले होते. सभेत बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, “बेकायदेशीर बाईक टॅक्सीमुळे आमचा रोजगार हिसकावला…
– स्वाभिमानी कामगार संघटनेमुळे कामगारांच्या हक्कांचे संवर्धन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण औद्योगिक वसाहातीमधील ट्रॅक कॉम्पोनंट लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा वेतनवाढ करार झाला. कंपनीच्या कामगारांना 14 हजार 100 रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. त्यामुळे यंदा कंपनीच्या कामगारांची दिवाळी अधिक गोड होणार आहे. कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये चौथ्या वेतनवाढ करार झाला. यावेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे व अध्यक्ष जीवन येळवंडे उपस्थित होते. करारावरती संघटनेच्या वतीने सरचिटणीस कृष्णा रोहोकले, सचिव रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, भट्टू पाटील, महादेव येळवंडे, प्रशांत पाडेकर, रविंद्र भालेराव, ग्रुपो अंतोलीन युनिट अध्यक्ष संजय पाटील,…
– समाविष्ट गावांतील शाश्वत विकासावर शिक्कामोर्तब पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील महावितरण संदर्भात विविध प्रलंबित विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाने (महावितरण) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मोशी उपशाखेचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. भोसरी आणि परिसरातील वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांच्यासोबत मे-2025 मध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा अधिवेशनातही भाजपा महायुती सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची फलश्रृती आता होताना दिसत आहे. आमदार लांडगे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 नंतरच्या काळात समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी गती मिळाली.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निसर्गाकडून मानवाला मिळालेल्या साधन संपत्तीचे रक्षण व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी पीसीईटी च्या वतीने राबविण्यात येणारे पर्यावरण पूरक उपक्रम कौतुकास्पद आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे तापमानात वाढ होत आहे. कार्बन उत्सर्जन वाढल्याने नैसर्गिक संकटे वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवित हानी होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशी झाडांचे वृक्षारोपण आणि संवर्धन आवश्यक आहे. ती जबाबदारी पीसीसीओईआर सारख्या इतर संस्था, संघटना, उद्योग यांनी घ्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर) येथील स्थापत्य…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरण भोसरी कार्यालयात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी यांच्या उपस्थितीत दरमहा होणारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ, सचिन आदक, उद्योजक व माजी नगरसेवक संजय वाबळे, तसेच महावितरणचे मुख्य अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता अतुल देवकर, सहाय्यक अभियंते माने, जाधव, भगत उपस्थित होते. बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले: कॅनबे चौक, तळवडे येथे नवीन सबस्टेशनचे काम अॅप्रूव्हल मिळताच सुरू होणार. औद्योगिक परिसरातील जुनी केबल बदलण्याचे काम सुरू आहे. सेक्टर ७ आणि १० मधील सबस्टेशनसाठी प्रत्येकी १००० चौ.मी. जागा पीएमआरडीएकडून घेण्यास मान्यता. शांतीनगर…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागरमध्ये उपमुख्यंमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या योगा पार्क मधील आशिया खंडातील सर्वात मोठ्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त क्लायम्बिग वॅाल साकारण्यात आलेले आहे. माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सर्वात पहिल्या राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून २९ वी आयएमएफ फाऊडेशन पश्चिम विभाग अंतर्गत राष्ट्रीय अजिक्यपद क्लायबिगं स्पर्धा २०२५ चे उद्घाटन नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले आहे , या स्पर्धेमध्ये पश्चिम विभागातील १५० खेळाडु सहभागी झाले आहेत, या योगा पार्क मध्ये १८ मीटर उंचीची बोल्डरिगं वॅाल, २१ मीटर उंचीची स्पीड वॅाल, २१ मीटर उंचीची लीड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आली असून, त्यांना नाशिक येथील कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश राज्य शासनाने आज सायंकाळी जारी केले. दरम्यान, पिंपरी चिंचवड मेट्रोचे मुख्य अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार तात्पुरता सोपविण्यात आला आहे. शेखर सिंह यांची १४ ऑगस्ट २०२२ रोजी सातारा जिल्हाधिकारी पदावरून थेट पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. शेखर सिंह यांच्या कार्यकाळात प्रशासनिक पातळीवर अनेक निर्णय घेतले गेले; मात्र त्यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराचे आरोप, प्रशासकीय अनियमितता आणि विकासकामांतील अपारदर्शकता यावर विरोधकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना विरोधकांकडून त्यांची बदली करण्याची…
