ताज्या घडामोडीपिंपरी

भोसरीत लघुउद्योग संघटना व महावितरणची आढावा बैठक — वीजपुरवठा सुधारण्यासाठी महत्त्वाचे निर्णय

Spread the love

 

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरण भोसरी कार्यालयात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी यांच्या उपस्थितीत दरमहा होणारी आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ, सचिन आदक, उद्योजक व माजी नगरसेवक संजय वाबळे, तसेच महावितरणचे मुख्य अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता अतुल देवकर, सहाय्यक अभियंते माने, जाधव, भगत उपस्थित होते.

बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले:

कॅनबे चौक, तळवडे येथे नवीन सबस्टेशनचे काम अॅप्रूव्हल मिळताच सुरू होणार.

औद्योगिक परिसरातील जुनी केबल बदलण्याचे काम सुरू आहे.

सेक्टर ७ आणि १० मधील सबस्टेशनसाठी प्रत्येकी १००० चौ.मी. जागा पीएमआरडीएकडून घेण्यास मान्यता.

शांतीनगर भोसरी येथे दोन २०० KVA ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे निर्देश.

तळवडे, ज्योतिबानगर, सोनवणे वस्ती, शेलारवस्ती येथे जागा उपलब्ध झाल्यास वीजपुरवठा सुधारणा प्रकल्प राबविण्याचा विचार.

विजेचे साहित्य वेळेत उपलब्ध करणे, झाडांच्या फांद्या वेळेवर छाटणे, आणि डी.पी. बॉक्सची झाकणे बसविणे यावर भर देण्यात आला.

मुख्य अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी नियमितपणे अशीच आढावा बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button