Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पत्रकार हे समाजाचे खरे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या लेखणीतील सत्यतेचा प्रकाश समाजाला दिशा देतो आणि अंधारातही मार्ग दाखवतो,” असे मत शिवसेनेच्या विभाग संघटिका सुजाता हरेश नखाते यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, “पत्रकार हे लोकशाहीचे सजग प्रहरी आहेत. त्यांच्या लेखणीत प्रामाणिकपणा आणि निडरता आहे. सत्य, निष्पक्षता आणि न्याय यांचे रक्षण हेच त्यांचे खरे धर्मकार्य आहे. कधी भ्रष्टाचार उघड करताना, तर कधी सामान्य माणसाच्या आवाजाला शब्द देताना — पत्रकार समाजातील प्रत्येक थरापर्यंत प्रकाश पोहोचवतात. म्हणूनच दीपावलीसारख्या प्रकाशाच्या उत्सवात आम्ही त्यांच्या कार्याला सलाम करतो.” दीपावलीनिमित्त शिवसेनेचे चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार हक्क व गुन्हेगारी नियंत्रण…

Read More

– विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाला महसूल नोंदणी विभागाची मान्यता पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयासाठी आता हक्काच्या जागेचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला आहे. टाळगाव चिखली येथील 5 एकर जागा तहसील कार्यालयास उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मान्यता दिली. राज्याचे महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी याकामी सकारात्मक निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवडकरांसाठी हक्काच्या जागेत तहसील कार्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे 35 लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या अपर तहसीलदार कार्यालयासाठी जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे दोन-तीन ठिकाणी कार्यालय स्थलांतरीत करावे लागले. तहसीलदार कार्यालयासाठी हक्काची जागा मिळावी. त्याठिकाणी सुसज्ज तहसीलदार कार्यालय, निवासस्थान, नागरी सुविधा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील ३६ दिवसांचा सर्वात मोठा सण असूनही पाश्चात्त्य विचारांच्या आक्रमणांमुळे त्याचे महत्त्व कमी होत चालले आहे; परंतु कितीही षडयंत्रे केली तरी भारतीय संस्कृतीची  पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्याने ती कधीही नष्ट होणार नाही!’ असे विचार संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे कार्यवाह डॉ. अजित जगताप यांनी दत्तोपंत म्हसकर सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे  व्यक्त केले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी सांज २०२५ या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. अजित जगताप बोलत होते. ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, नवयुगचे अध्यक्ष…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि.२० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण ७६१ कोटी १७ लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील तसेच प्रभाग क्रमांक नऊ सह परिसरातील मोकाट कुत्रे यांचा मोठा त्रास होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे. या संदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना घुले यांनी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ मधील हिंदवी कॉलनी १, २, वाघजाई मंदिर परिसर, दगड़े बिल्डिंग परिसर तसेच चावडी चौक गावठाण येथील भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे यांची संख्या वाढली आहे. या मुळे परिसरात ये जा करणे धोक्याचे झाल्याने भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक यांना रहदारी करणे…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी विश्वासाठी निर्माण केलेला श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ हा जीवन ग्रंथ आहे. यात सर्व प्रश्नांची उत्तरे आणि समाधान मिळत असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार प्रमुख मार्गदर्शक प्रकाश काळे यांनी सांगितले. ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवारचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव यांनी चार महिने परिश्रम पूर्वक श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे हस्तलिखित तयार केले. या श्री ज्ञानेश्वरी हस्त लिखित प्रतीचे प्रकाशन, पूजा करीत लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अध्यक्ष स्थानी श्री ज्ञानेश्व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर होते.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  दिवाळी सणाच्या उत्साहात बाजारपेठा, घरांची सजावट आणि भेटवस्तूंची खरेदी यांना वेग आला आहे. मात्र, या आनंदात प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणारा पर्यावरणीय आणि आरोग्याचा धोका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना जबाबदारीने सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, कप, प्लेट्स, फुगे, सजावटीच्या वस्तू आणि गिफ्ट रॅप्स यांचा वापर वाढतो.  या सर्व वस्तू वापरल्यानंतर थेट कचर्‍यात जातात व पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवतात. अशा वस्तू विघटन न होणाऱ्या असल्याने नाल्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, प्रदूषण वाढते आणि सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. पिंपरी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  प्रकाशाच्या झळाळीने, आनंदाच्या लहरींनी आणि सुरांच्या सुवासिक झुळुकींनी सजलेली दिवाळीची पहाट… कानात झंकारणारे स्वर, भावनांच्या लहरींनी ओथंबलेले वातावरण… आणि शेकडो संगीतप्रेमींची मिळणारी दाद… अशा संगीतमय वातावरणात मंगलसुरांच्या अभ्यंगस्नानाने रसिकांची दिवाळीची पहाट अविस्मरणीय झाली. आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात  सुरांच्या दीपांनी व भावनांच्या शब्दसुरावटीने आजची पहाट उजळली. भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी यांच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट २०२५ – दीपबंध सुरांचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील सर्व असंघटित कामगार यात घरेलू कामगार,फेरीवाला,रिक्षा चालक, कंत्राटी कामगार, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक चालक, कंत्राटी कामगार,अशा विविध कामगारांना ई एसआयसी योजना लागू केल्यास त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे व त्यांना लाभदायी ठरणार आहे म्हणून त्यांना ई एसआयसी लागू करण्याबाबत विचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली असता याबाबत लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती, सारथी चालक-मालक महासंघ…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे आणि कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे’ यांच्यात शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रकल्प, इंटर्नशिप तसेच भविष्यातील नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या करारामुळे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच दोन्ही संस्थांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होणार आहेत. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रसंगी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रा. डॉ. विरेंद्र शेटे…

Read More