सर्व प्रश्नांचे समाधान ग्रंथराज ज्ञानेश्वरीत – प्रकाश काळे
ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी हस्तलिखित प्रकाशन सोहळा

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी विश्वासाठी निर्माण केलेला श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ हा जीवन ग्रंथ आहे. यात सर्व प्रश्नांची उत्तरे आणि समाधान मिळत असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार प्रमुख मार्गदर्शक प्रकाश काळे यांनी सांगितले.
ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवारचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव यांनी चार महिने परिश्रम पूर्वक श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे हस्तलिखित तयार केले. या श्री ज्ञानेश्वरी हस्त लिखित प्रतीचे प्रकाशन, पूजा करीत लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अध्यक्ष स्थानी श्री ज्ञानेश्व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर होते. श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ आळंदी येथील व्यासपीठावर श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर , राम मंदिर आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर, शाळा व्यव्थापन समिती अध्यक्ष काळुराम येळवंडे, इंद्रायणी शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब गवारे, ज्ञानेश्वर दिघे, नंदकुमार वडगावकर ,विश्वंभर पाटील, धनाजी काळे, अरुण कुरे, ज्ञानेश्वर जाधव, धनाजी काळे, विशम्भर पाटील, महादेव वीर, रोहिदास कदम, यांचे सह कुटुंबातील सदस्य व आप्तेष्ट ,नातेवाईक उपस्थित होते.
हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन सुरेश वडगावकर, प्रकाश काळे ,अजित वडगावकर, इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम अण्णा गवारी, नंदकुमार वडगावकर, अर्जुन मेदनकर यांचे हस्ते ज्ञानेश्वर जाधव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे वतीने तसेच जैन स्थानक आळंदी यांचे वतीने समाज बांधवांचे हस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश काळे, तुकाराम अण्णा गवारे, अजित वडगावकर, सुरेश काका वडगावकर आदींनी मनोगते व्यक्त करीत हस्तलिखित प्रतीचे लिखाण कार्य सेवा रुजू केल्या बद्दल या प्रेरणादायी कार्याचे कौतुक केले. ज्ञानेश्वरी पारायण करतो, सार्थ ज्ञानेश्वरी अभ्यासतो. किंवा ज्ञानेश्वरी सप्रेम भेट देऊन प्रचार प्रसार करतो. परंतु आज ग्रंथराज ज्ञानेश्वरी हस्तलिखित करून त्याचे प्रकाशन व ज्यांनी ग्रंथ स्वहस्ते लिहिला त्यांचा सत्कार हा ऐक आगळा वेगळा विषय या निमित्ताने अनुभवायला मिळाला. माऊली जाधव यांचा सत्कार म्हणजे आपल्यातील संवेदनाचे प्रतीक आहे.
ज्ञानेश्वर जाधव यांनी गेली चार-पाच महिने दररोज आठ ते दहा तास हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे श्लोक हे लाल शाईने व ओव्या या निळ्या शाईने लिहिल्या. अतिशय स्वच्छ, सुवाच्च ,सुंदर अशा अक्षरात व सुंदर अशी मांडणी अतिशय प्रेम पूर्वक केली आहे. ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराने त्यांचा सत्कार करून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे प्रचार प्रसाराचे कार्यात भर घातली. यावेळी ज्ञानेश्वर जाधव यांनी उपक्रम राबवीत असताना मिळालेले अनुभव सांगत हस्त लिखिताचे सेवा कार्य माउलींना समर्पित केले. या सेवा कार्यात आपल्या कुटुंबीयांनी सहकार्य केल्याचे सांगत ग्रंथ माऊलीं से सेवा कार्य करवून घेतले. प्रास्ताविक अर्जुन मेदनकर यांनी केले. पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.













