Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रकाश, आनंद आणि उत्साहाच्या झगमगाटात चिंचवड परिसरातील रसिक संगीतप्रेमींची दिवाळीची पहाट यंदा खऱ्या अर्थाने सुरेल ठरली. कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि परिवार यांच्या वतीने, तसेच माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी, मनिषा स्मृती निवास, भोईर नगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या रेशमी तारा, सुरांच्या लहरी आणि तालवाद्यांच्या झंकाराने भोईर नगर परिसर दुमदुमून गेला. रसिक संगीतप्रेमींनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून या सुरेल पर्वाचा आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरुवात अजिंक्य देशपांडे यांच्या ‘सूर निरागस हो…’ या लोकप्रिय भावगीताने झाली आणि क्षणातच उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.…

Read More

 पिंपळे सौदागर,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि वाटण्याचा सण. समाजातील प्रत्येक घटकाला या आनंदात सामील करण्याच्या हेतूने उन्नती सोशल फाउंडेशन, पिंपळे सौदागर तर्फे सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत “स्वच्छतेचे खरे दीप प्रज्वलित करणाऱ्या हातांना” सन्मान देण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामागील संकल्पना विषद करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “दिवाळी हा केवळ सण नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याची संधी आहे. सफाई कामगार हे आपल्या शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक आहेत. त्यांच्यामुळेच आपण स्वच्छ, सुंदर वातावरणात दिवाळी साजरी करू शकतो.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजित सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमात गायिका पल्लवी पत्की-ढोले, गायक संदीप चाबुकस्वार, जयश्री करंबेळकर – ठाणेकर, गायक आकाश सोळंकी यांनी रसिकांना सकाळच्या प्रहरी गुलाबी थंडीत मंत्रमुग्ध केले.            पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित सुरमयी दिवाळी पहाटच्या पहिल्या दिवशी रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत गाण्यांवर अक्षरशः ठेका धरला. बाल्कनीसह तुडुंब भरलेल्या सभागृहात ‘सूर निरागस हो’ गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर, संभाजीनगर महापालिकेचे सीईओ सुखदेव बनकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी ,पिंपळे गुरव भागात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मोकळ्या मैदानात पालामध्ये तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या  40 कुटुंबातील महिलांना दोन नवीन साड्या एक पैठणी तसेच लहान मुलांना गोड फराळाचे साहित्य देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. यापूर्वी आम्ही दिवाळीनिमित्त आदिवासी तसेच कातकरी समाजालच्या 60 कुटुंबाला मदत केली आहे तसेच दिवाळीत आम्ही शेतकऱ्यांनाही पूरग्रस्त भागात जाऊन मदत करणार असल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले. सा.का.हेमंत नेमाडे म्हणाले कि, पालावर राहणाऱ् गोरगरिबांना फराळाचे आणि साड्याचे वाटप केले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमची दिवाळी झाली असे आम्हाला वाटले आणि खूप आनंद झाला. गुणवंत कामगार काळूराम लांडगे म्हणाले की…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टीच्या कार्यकर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि जनआंदोलनातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचा गौरव करत,  सुप्रिया जालिंदर गायकवाड यांची आम आदमी पार्टी पिंपरी विधानसभा अध्यक्ष म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श रवीराज बाबन काळे यांनी सुप्रिया गायकवाड यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान केले. त्यांच्या समाजकार्यातील सक्रिय सहभाग, महिलांच्या प्रश्नांबाबतचे संवेदनशील नेतृत्व आणि जनतेशी असलेला थेट संपर्क लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पिंपरी विधानसभा क्षेत्रात आम आदमी पार्टीचे संघटन अधिक मजबूत होऊन पक्षाचे धोरण आणि दिल्ली-पंजाबमधील जनकल्याणकारी मॉडेल जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य वेगाने होईल, असा विश्वास शहराध्यक्ष रविराज काळे यांनी व्यक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील बोऱ्हाडेवाडी परिसरातील नागरिकांचा लवकरच वीज भार कमी होऊन सुलभ आणि अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (MSEB) NSC योजनेअंतर्गत बोऱ्हाडेवाडीतील पायाभूत वीज सुविधा बळकट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील समाविष्ट गावांतील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम केल्या आहेत. यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉरचा विकास झाला असून, त्या भागातील लोकसंख्या आणि वीज ग्राहकांची मागणी हळूहळू वाढत आहे. वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत. या भागात 200 केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविला जात असून, त्याचा थेट लाभ खालची बोऱ्हाडेवाडी,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथील विवेकानंद शिळा मंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संजय पवार यांच्या ‘तापी इंद्रायणी’ या कवितासंग्रहाचे लोकार्पण सोहळा  (१४ ऑक्टोबर)  उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे लोकार्पण विवेकानंद रॉक मेमोरियल कन्याकुमारीचे प्रमुख व्यवस्थापक श्री. थनु तसेच गणराज टूर्सच्या संचालक सौ. अनिता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक पर्यटक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री. थनु यांनी विवेकानंद केंद्राच्या कार्याचा परिचय करून देत, “मानव निर्माण आणि राष्ट्र निर्माण हा केंद्राचा मुख्य उद्देश आहे,” असे सांगितले आणि प्रा. पवार यांच्या साहित्य कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. प्रा. संजय पवार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंडियन डेफ क्रिकेट असोसिएशन (IDCA) यांच्या वतीने दि. ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथे ९ वी नॅशनल डेफ टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल विवेक मालशे यांची निवड करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील २० राज्यांतील संघ सहभागी होणार असून, ऐकू न येणाऱ्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा कौशल्य, आत्मविश्वास आणि संघभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन ठरणार आहे. या माध्यमातून दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळीचा उत्साह, फराळाचा सुगंध, आनंदाचे सूर…अशा आनंदमय आणि उत्सवी वातावरणात दिशा सोशल फाऊंडेशनच्या ‘दिवाळी फराळ’ने रविवारी (१९ ऑक्टोबर) आनंदाची पर्वणीच दिली. राजकीय आखाड्यातील प्रतिस्पर्धी नेते, प्रशासकीय अधिकारी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर एकाच छताखाली जमले. हास्यकल्लोळ, गतस्मृतींना उजाळा आणि धमाल किश्श्यांमुळे जवळपास चार तास गप्पांची ही मैफल रंगली. दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरीतील ‘ श्री कृष्ण पॅलेस’मधील ‘सुदामा हॉल’मध्ये या दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, ॲड. गौतम चाबुकस्वार,…

Read More

पाचगणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पाचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती करिता आरक्षित झाल्याने अनेकांना पदाच्या डोहाळ्यांनी वेधलं आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून लाखों करोडोंच्या वार्ता चर्चा बाजारात चालू झालेत. तर लग्नाला तयार होऊन अक्षता पडण्याची वाट पहातायेत. याच दरम्यान दिपक कांबळे घरोघरी जाऊन आपला चेहरा नगराध्यक्ष पदाला कसा साजेशा आहे. हे सांगत असल्याने या चेहऱ्याची वेगळीच चर्चा बाजार कट्यावर झडत आहे. पाचगणी नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमतः नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती करिता आरक्षित झाले आहे. अद्यापि निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र दीपावली नंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून स्वतःला प्रमोट…

Read More