ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपळे गुरवमध्ये ‘सुरमयी दिवाळ पहाट’मध्ये रसिकांचा गाण्यांवर ठेका

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजित सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमात गायिका पल्लवी पत्की-ढोले, गायक संदीप चाबुकस्वार, जयश्री करंबेळकर – ठाणेकर, गायक आकाश सोळंकी यांनी रसिकांना सकाळच्या प्रहरी गुलाबी थंडीत मंत्रमुग्ध केले.
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित सुरमयी दिवाळी पहाटच्या पहिल्या दिवशी रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत गाण्यांवर अक्षरशः ठेका धरला. बाल्कनीसह तुडुंब भरलेल्या सभागृहात ‘सूर निरागस हो’ गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर, संभाजीनगर महापालिकेचे सीईओ सुखदेव बनकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष ह.भ.प. विजूअण्णा जगताप, कविता जगताप, कामगार नेते विश्वनाथ शिंदे, लक्ष्मण नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनील कदम,, ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, शिवानंद स्वामी महाराज, दत्त आश्रमाचे तुकाराम महाराज, गोरबंजारा समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड, पंकज मालवीय, ऍड. अभिषेक जगताप, प्रा. महादेव रोकडे, सुनील इंगळे, सचिन शेलार, गोपी पवार, उदय ववले, बारामती मित्रमंडळाचे अध्यक्ष सतीश चोरमले, श्रीधर फौजदार, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रंगनाथ भोंडवे, माळी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप जगताप, नारायण सूर्यवंशी, सूर्यकांत गोफने, मॉर्निंग वॉकिंग ग्रुपचे सचिन मनोहर, वामन कड, महेश भागवत, राजेंद्र घनवीर, श्रीधर फौजदार, प्रदीप बाफना, गौतम डोळस, अजय पाटील, तहसीलदार श्रावण माने, विजय गायकवाड, गणेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, संतोष तांदळे, बबनराव आल्हाट, शशिकांत धुमाळ, राजेंद्र मोरे, विश्वनाथ मोरे, दत्तात्रय पवार, अर्जुन शिंदे अशोक मोरे, जयवंत चांदेरे, नरसिंग भोई, आप्पा कुंजीर, नंदकुमार कस्पटे, प्रमोद भागवत, विश्वास मोरे, सुखदेव बनकर, शशिकांत धुमाळ आदी उपस्थित होते.
महेंद्र कांबळे यांनी सेकसोफोनवर वाजवलेली धून टाळ्या घेऊन गेली. गायक आकाश सोळंकी यांनी गायलेले ‘सुख के हैं सब साथी’, जयश्री करंबेळकरसोबत गायलेले हृदयी वसंत फुलताना’ गीताला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. जयश्री करंबेळकर – ठाणेकर यांनी दिवाळीचे गाणे ‘आली दिवाळी’, दिल चीज क्या हैं आप मेरी जान दीजिए’ ही गाणी वन्स मोअर घेऊन गेली. गायिका पल्लवी पत्की-ढोले यांनी गायलेल्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ लावणीने पहाटेच्या गारव्यात सभागृहात टाळ्या शिट्या घेतल्या. रसिकांनी सभागृहात फेर धरला. ‘परदेशीया ये सच हैं प्रिया’ दाद घेऊन गेले. गायक संदीप चाबुकस्वार यांनी ‘तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी’, ‘हमारे आंगणे में तुम्हारा क्या काम हैं’, ही अनोख्या अंदाजात गायलेली गीते काळजाचा ठाव घेऊन गेली. सर्व गायकांनी मिळून गायलेल्या ‘हृदयी वसंत फुलताना’, ‘चोरीचा मामला’, ‘लल्लाटी भंडार’ हे गोंधळीगीत, ‘वेडात वीर दौडले सात’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतांवर रसिकांनी अक्षरशः ठेका धरला.
सुप्रसिद्ध निवेदक योगेश सुपेकर यांच्या निवेदनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. कीबोर्ड’ वर संतोष खंडागळे, सेक्सोफोनवर महेंद्र कांबळे, सुनील गायकवाड, ढोलकीवर निलेश यांनी, तबल्यावर राहुल यांनी साथ संगत केली.













