ताज्या घडामोडीपिंपरी
उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप उपक्रम ; सफाई कामगारांच्या सेवाभावाला मानवंदना

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि वाटण्याचा सण. समाजातील प्रत्येक घटकाला या आनंदात सामील करण्याच्या हेतूने उन्नती सोशल फाउंडेशन, पिंपळे सौदागर तर्फे सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत “स्वच्छतेचे खरे दीप प्रज्वलित करणाऱ्या हातांना” सन्मान देण्याचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमामागील संकल्पना विषद करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “दिवाळी हा केवळ सण नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याची संधी आहे. सफाई कामगार हे आपल्या शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक आहेत. त्यांच्यामुळेच आपण स्वच्छ, सुंदर वातावरणात दिवाळी साजरी करू शकतो. म्हणूनच या दिवाळीत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे फराळ वाटपाचा हा उपक्रम राबवण्यात आला. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने अशा सेवाभावी घटकांचा सन्मान करावा, हीच खरी दिवाळीची भावना आहे.”
या उपक्रमात फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. फराळ वाटपाच्या वेळी सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते.
याप्रसंगी , विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद ,ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे सर्व सभासद , लिनिअर गार्डन जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.













