Author: maharashtrabreakingnews.com

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  डोंगराळे (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने सर्वत्र प्रचंड संताप उसळला आहे. या अमानवी प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी समस्त ग्रामस्थ पिंपळे सौदागर आणि उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने संताप सभेचे आयोजन करण्यात आले. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण येथे भरलेल्या या सभेत मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक व लहान मुले सहभागी झाली. सभेची सुरुवात चिमुकलीला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकमुखाने या निर्दयी कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आरोपींवर अत्यंत कडक, उदाहरण ठरतील अशी शिक्षा तातडीने व्हावी, अशी मागणी केली. बालसुरक्षेच्या प्रश्नावर समाज…

Read More

– आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतील उपक्रमला पिंपरी-चिंचवडकरांचा तुफान प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी नदी स्वच्छतेचा जागर संदेश देण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. वारकरी परंपरा आणि पर्यावरणसंवर्धनाचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमात ‘शिव-शंभू यशोगाथा’ हा विशेष कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. शिवकालीन शौर्य, सांस्कृतिक वैभव आणि नदी संवर्धनाचा संदेश यांचा अनोखा मेळ यंदाच्या सायक्लोथॉनमध्ये पाहायला मिळाला. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’—धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरातून रविवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता सायक्लोथॉनची सुरुवात झाली. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या उपक्रमाने यंदा नवा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला असून, “निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी तातडीने सुधारणा कराव्यात,” अशी ठाम मागणी पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात, १६ जुलै २०२५ रोजी आयोगाने दिलेल्या आदेशातील स्पष्ट सूचनांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता अनेक भागांची संपूर्ण मतदार यादी चुकीच्या प्रभागात टाकण्यात आल्याने हजारोंच्या संख्येने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. मुख्य आक्षेप : 1. प्रभाग सीमेवरील मतदारांची नावे तपासण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आवश्यक असूनही,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप–राष्ट्रवादी युतीचे गणित पुन्हा चर्चेत आले आहे. या संवेदनशील राजकीय प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपली भूमिका मांडत स्पष्ट प्रतिक्रिया दिली. चिंचवडमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी युतीच्या चर्चांना योग्य तो प्रतिसाद दिला. मेळाव्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत भाजपने निवडणूक तयारीची गती वाढवली. रवींद्र चव्हाण म्हणाले की, मावळमधील कार्यकर्त्यांसोबत नियोजित बैठकीला जात असताना त्यांनी चिंचवडमधील कार्यकर्ता मेळाव्यालाही उपस्थिती दर्शवली. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत निर्णय प्रक्रिया पूर्णपणे स्थानिक पदाधिकारी आणि कोअर कमिटीच्या शिफारशींवर आधारित असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक परिस्थितीचा सखोल…

Read More

पिंपरी  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव व सांगवी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रभाग क्र. २९ आणि ३१ सोबतच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तात्पुरते ‘पे अँड पार्क’ सुरू करून वाहतूक कोंडीची समस्या सोडववण्यात यावी. या माध्यमातून युवकांना रोजगार आणि महापालिकेला आर्थिक फायदा मिळू शकतो, अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी केली आहे. याबाबत अरुण पवार यांनी महापालिकेच्या वाहतूक व दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंते सुनील पवार यांना निवेदन दिले आहे. यावेळी संजय गायके, किशोर अट्टरगेकर, मालोजी भालके, श्रीकृष्ण जाधवर, प्रताप भोसले आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन पार्किंगसाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या घरकुलातील सदनिकांच्या लाभामुळे लाभार्थ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले असून, त्याचा वापर योग्य करावा, सदनिका भाड्याने देऊ नयेत व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने चिखली सेक्टर क्र. १७ व १९ येथे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील रिक्त ३२ सदनिकांसाठीची संगणकीय सोडत आज चिंचवड येथे झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता सुनील दांगडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रारुप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ठ होणा-या संबंधित विधानसभा क्षेत्रांच्या दिनांक १ जुलै २०२५ अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीवरुन महानगरपालिकेची प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी गुरुवारी २० नोव्हेंबर २०२५ रोजी मतदार यादी कक्ष तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना स्विकारण्यासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती सूचना आणि आक्षेपांची गांभिर्याने दखल घ्यावी असे निर्देश ‍…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती सूचना आणि तक्रारी स्विकारण्याचे कामकाज सुरू असल्याने येत्या सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर) होणारी जनसंवाद सभा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात नागरिकांकडून प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये…

Read More

​पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षाने एकट्याने लढायची की युती करून, याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून शहर भाजपची कोअर कमिटी घेईल, आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मोठे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. ​शनिवारी, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवड शहर भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ​यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेत व प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड निवडणूक संचालन समितीचे संयोजक आमदार अमित गोरखे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार लिगल सेल महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदी    ॲड.  सुहास पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्र पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ॲड. सुहास पडवळ हे मागील २९ वर्षांपासून पिंपरी व पुणे न्यायालयात वकिली व्यवसाय करत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लिगल सेलच्या पातळीवर विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. पिंपरी-चिंचवड लिगल सेल शहराध्यक्षपदी काम करताना त्यांनी पक्ष संघटनाला सातत्याने बळकटी दिली आहे. पडवळ यांनी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी…

Read More