Author: maharashtrabreakingnews.com

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -वाकड परिसरातील वाकडकर वस्ती येथे शनिवारी मध्यरात्री एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. स्थानिक रहिवासी श्री. रमेश वाकडकर यांच्या गोठ्यातील एका निरपराध वासरावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने भीषण हल्ला करत त्याचे लचके तोडले. या क्रूर हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या मते, वाकड परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वारंवार प्रशासनाला कळवूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. विशेष म्हणजे, ही पहिलीच घटना नसून सुमारे दोन वर्षांपूर्वी याच भागात एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. सुदैवाने…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॅा विजय सूर्यवंशी यांनी आपल्या सुविद्य पत्नी डॅा आरती सूर्यवंशी यांच्यासह अक्षय्य तृतीया आणि क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त (रविवार, दिनांक १९ एप्रिल)क्रांतितीर्थ अर्थात क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयास सपत्नीक भेट दिली. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, अतुल आडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, ‘आज अक्षय्य तृतीया आणि कालच्या क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतितीर्थाला सपत्नीक भेट देण्याचा योग आला. एका प्रेरणादायी, क्रांतिकारी, राष्ट्रप्रेमी कुटुंबाच्या वाड्याला पाहून मन भारावून गेले. लहानपणी क्रांतिवीर चापेकरबंधू यांच्या बलिदानाचा…

Read More

स्वीकृत सदस्य निवडीचा निर्णय पुन्हा लांबणीवर; महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राजकीय कुरघोडी तीव्र पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मधील स्वीकृत सदस्य निवडीचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मतभेद उघडपणे समोर येत असून, या प्रक्रियेभोवती राजकीय रणनीती आणि दबावतंत्र अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्य पदे ही केवळ औपचारिक नसून, आगामी सत्तासमीकरणांमध्ये प्रभाव टाकणारी मानली जातात. त्यामुळे या निवडीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुचवण्यात आलेल्या नावांवर सत्ताधाऱ्यांनी अप्रत्यक्ष आक्षेप घेतल्याची चर्चा असून, काही नावांबाबत फेरविचार करण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचे राजकीय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकने “प्रोटेक प्रकल्प स्पर्धा” मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऑटोमेशन आणि रोबोटिक्स या विषयात यश संपादन करत पीसीपीच्या “बहुउ‌द्देशीय शेती रोबोट” प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. लवळे येथील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पीसीपी मधील इ. अँड टी. सी. विभागाच्या हर्षल जाधव, साईराज सुरवसे, पुष्कर सोनवणे व वेदांत काळे या वि‌द्यार्थ्यांनी हा प्रकल्प सादर केला होता. आताच्या काळात युवकांचे रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर यामुळे शेती साठी मजुरांची कमतरता, वाढता खर्च आणि वेळे अभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्यांचा विचार…

Read More

एमपीसीला मिळालेल्या कायदेशीर अधिकारानुसारच काम व्हावे – वसंत भसे एमपीसीमधील २३ रिक्त जागा ताबडतोब भरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पीएमआरडीएने कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेला व नंतर रद्द केलेला बेकायदेशीर प्रारूप विकास आराखड्यामधील झालेल्या चुका दुरुस्त करून घ्याव्यात. हे कमी खर्चात आणि कमी वेळेत होऊ शकते मात्र तसे न करता प्रशासनाचा हट्ट स्ट्रक्चरल प्लॅनसाठी का आहे असा प्रश्न पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी उपस्थित केला. तसेच सध्या अस्तित्वात असणाऱ्या महानगर नियोजन समितीमध्ये (एमपीसी) अद्यापही २३ जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असून त्यातून रिक्त असणाऱ्या २३ जागा भराव्यात आणि पुढील काळात एमपीसी च्या…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -केंद्र सरकारच्या आरडीएसएस (RDSS) योजनेअंतर्गत शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करून विद्युत पुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुण्यात रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. खोदकाम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून आवश्यक परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आपण यात लक्ष घालून पुणे मनपा प्रशासनाची बैठक घेऊन परवानगी देणेबाबत त्यांना आदेशित करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक तथा पुणे सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी राज्याचे उर्चा मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली आहे. सौंदणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महापालिका हद्दीत विद्युत वाहिन्या भूमीगत करण्याचे काम सध्या रखडले आहे. त्यासाठी आवश्यक परवानग्या उपलब्ध करण्यासाठी महावितरणकडून महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार…

Read More

स्वार्थाचा त्याग करून देशकार्यासाठी वेळ द्या- अविनाश भेगडे चिखलीत प्रथमच भव्य दिव्य ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न! ​चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- हिंदू धर्म वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.धर्म म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचे सायन्स असून हिंदू राष्ट्रासाठी संघटित होण्याचे आवाहन प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या कालीपुत्र कालिचरण महाराज यांनी हिंदू बांधवांना केले.नेवाळे वस्तीतील धर्मरक्षक भुजबळ प्रांगणात पार पडलेल्या विराट हिंदू संमेलनात ते (दि.१९) बोलत होते.या संमेलनाला चिखली आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हरिपाठ व भजनी मंडळे, सर्व महिला बचत गट, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघा सहित हजारो हिंदू बांधव, माता-भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​ यावेळी ​कालिचरण महाराज म्हणाले की,भारताला ‘हिंदू राष्ट्र’ बनवणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक ओळखीशी निगडित महत्त्वाचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी शहरातील एखाद्या सार्वजनिक संकुलाला ज्येष्ठ गायिका Asha Bhosle यांचे नाव देण्याची मागणी केली. सभेत बोलताना भोईर यांनी सांगितले की, Asha Bhosle यांनी पिंपरी-चिंचवड शहराला मोठे केले असून, त्यांच्या कर्तृत्वामुळे शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या माध्यमातून Lata Mangeshkar आणि Asha Bhosle या दोन्ही दिग्गज गायिका एकत्र शहरात आल्या होत्या, ही शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराच्या सांस्कृतिक परंपरेला बळकटी देण्यासाठी आणि अशा महान कलाकारांचा सन्मान करण्यासाठी एखाद्या प्रमुख संकुलाला…

Read More

अतिक्रमणांविरोधात करण्यात येत असलेल्या धडक निष्कासन कारवाईचा घेतला सविस्तर आढावा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांनिहाय करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात धडक निष्कासन कारवाईचा सविस्तर आढावा आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई अधिक सक्त करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, अतिक्रमण विभागाचे मुख्यालय उपायुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सरगर, अजिंक्य येळे, तानाजी नरळे, किशोर ननवरे, पूजा दुधनाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त डॉ.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नारी शक्ती वंदन विधेयकाच्या मुद्द्यावरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही त्याचे पडसाद उमटले. इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात निषेध आंदोलनं सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आज झालेल्या सर्वसाधारण सभेतही भाजपने आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवला. आजच्या सभेत अनेक महिला नगरसेविकांनी काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला. सभागृहात वातावरण तापलेलं असतानाच ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर महापौर रवी लांडगे, विधान परिषद आमदार उमा खापरे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सुलभा उबाळे तसेच महिला आणि पुरुष नगरसेवक मोठ्या संख्येने महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले.…

Read More