- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी बोगस उपसूचनेद्वारे 52 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यामध्ये नगरसेवकांसह विभागप्रमुख, अभियंते तसेच, ठेकेदार सहभागी आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्या समितीने सात दिवसांनंतर अखेर, मंगळवार (दि. 21) चौकशी अहवाल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सादर केला आहे. समितीने जैन यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली की, त्यांना अभय दिले आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. प्रवीण जैन यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्थापत्य, बीआरटीएस व इतर अशी 70 हून अधिक कामांची बिले वेगवेगळ्या 20 ठेकेदारांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वातावरण तापले असून, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन करत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मराठीला विरोध करणाऱ्यांनी महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. राज्य सरकारने १ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ४ मे रोजी काही संघटनांनी पुकारलेल्या संपावरही कांबळे यांनी टीकास्त्र सोडले. हा संप पूर्णपणे अपयशी ठरेल, असा दावा करत त्यांनी रिक्षा चालकांनी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील रिक्षा स्टँड हे केवळ प्रवासासाठीचे ठिकाण न राहता ‘आदर्श समाजसेवा केंद्र’ म्हणून विकसित व्हावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केले. भोसरी येथील यशवंतनगर चौकात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शहर हे कष्टकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांचे असल्याने रिक्षा ही वाहतुकीची महत्त्वाची कडी आहे. मात्र, केवळ प्रवास सेवा देण्यापुरते मर्यादित न राहता रिक्षा चालकांनी नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन करत सामाजिक जबाबदारीही पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. २० वर्षांच्या संघर्षाचा आढावा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत कांबळे यांनी संघटनेच्या लढ्याचा आढावा…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंमली पदार्थांविरोधात निर्णायक भूमिका घेत सांगवी पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करत तब्बल 70 किलो गांजा जप्त केला आहे. दौंड तालुक्यातील पाटेठाण परिसरात करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे ड्रग्स माफियामध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगवी पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत पाटेठाण येथे मोठ्या प्रमाणात गांज्याची साठवणूक व वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. छापेमारीदरम्यान संशयितांकडील मालाची तपासणी केली असता सुमारे 70 किलो गांजा आढळून आला. जप्त…
पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यातील महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना (शिंदे गट)मध्ये अंतर्गत नाराजी आता उफाळून आली असून, पक्षात उघड गटबाजीचे संकेत मिळू लागले आहेत. या पराभवाचा ठपका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर ठेवत, त्यांना पुन्हा संधी देऊ नये, अशी मागणी होत असतानाच शिवसेना महिला आघाडी सह-संपर्कप्रमुख सुदर्शना रमेश त्रिगुणाईत यांनी स्वतःसाठी विधान परिषद आमदारकीची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षवाढीसाठी अपेक्षित प्रयत्न न झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “नेतृत्वाकडून कोणतीही स्पष्ट दिशा मिळाली नाही, त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात राहिले,” अशी नाराजी तळागाळातून व्यक्त होत आहे. यामुळेच पुण्यात पक्षाची कामगिरी…
लघुउद्योग व उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, घातक कचरा व्यवस्थापन तसेच लघुउद्योगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. उद्योगधंद्यांना सक्षम, सुरक्षित आणि विकासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. एमआयडीसी भागांचा सर्वांगीण विकास हा महापालिकेचा प्राधान्यक्रम असून, मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आणि कामांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात शहरातील लघुउद्योग संघटना तसेच एमआयडीसीमधील विविध उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयुक्त डॉ. विजय…
सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे इ क्षेत्रीय कार्यालयाचा तर तानाजी नरळे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण व अभिलेख कक्षाचा दिला पदभार पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे इ क्षेत्रीय कार्यालयाचा व तानाजी नरळे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण व अभिलेख कक्षाचा पदभार सोपवण्यात आला आहे. पशुवैद्यकीय व कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त म्हणून संदीप खोत हे काम पाहत होते. आता त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार (पशुवैद्यकीय विभागासह) सोपविण्यात आला आहे. उपायुक्त…
कामगार मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आमदारांच्या पाठपुराव्यामुळे आयटीयन्सना मिळाला दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच विशेष बैठक;आयटीयन्ससाठी सकारात्मक निर्णय पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी तसेच राज्यातील आयटी पार्कमधील आयटीयन्सच्या नोकरीची असुरक्षितता, ‘ले-ऑफ’च्या नावाखाली होणारी पिळवणूक आणि फ्रेशर्सची वाढती फसवणूक यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाकडून एका ‘ आयटी स्टडी सेल’ची स्थापना केली जाणार आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी या प्रश्नी घेतलेल्या पुढाकारामुळे आता आयटीयन्सचे प्रश्न थेट मुख्यमंत्री स्तरावर पोहोचले असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. आयटीयन्सच्या विविध गंभीर समस्यांबाबत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २१ ) मंत्रालयात एक संयुक्त…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर इंजिनिअर (JE) पदाच्या १६९ जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना दिलेल्या परीक्षा केंद्रांबाबत नाराजी वाढली आहे. मराठा सेवा संघच्या वतीने दि. २० एप्रिल २०२६ रोजी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन देत परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील उमेदवारांना नागपूर, अमरावती, नांदेड यांसारखी ५०० ते ९०० किलोमीटर अंतरावरील केंद्रे देण्यात आली आहेत. यामुळे उमेदवारांना प्रवासासाठी किमान दोन दिवस द्यावे लागत असून राहण्याची व जेवणाची अतिरिक्त सोय करावी लागत आहे. सध्या राज्यात उष्णतेची तीव्र लाट…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कवी संजय एकनाथ गायकवाड यांच्या ‘अंधारावर सूर्य गोंदला’ आणि ‘सूर्यांधकारात माणूस’ द्वितीय आवृत्ती या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन गायकवाड यांच्या मातोश्री विमल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विश्वास वसेकर, रजत प्रकाशनचे प्रकाशक अशोक कुमठेकर, नगरसेविका तृप्ती कांबळे, नगरसेविका दीप्ती कांबळे, रोहिणीताई गायकवाड, अशोक गायकवाड, राजेंद्र गायकवाड, मुखपृष्ठकार अनिल जोशी, दिलीप कुमठेकर, अभियंता विजय मानकर, चंद्रकांत चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. विश्वास वसेकर म्हणाले, की गायकवाड हे मराठीतील प्रतिथयश कवी आहेत. कवितेत अनुभवाचे संश्लेषण असते. बाकी प्रकारात अनुभवांचे…
