Author: maharashtrabreakingnews.com

प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला मतदान प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सखोल माहिती असणे आवश्यक – अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे ईव्हीएम, मॉक पोल आणि मतदान व्यवस्थापनाबाबत करण्यात आले सखोल मार्गदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि कोणत्याही प्रकारच्या त्रुटीशिवाय पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ईव्हीएमची हाताळणी, मॉक पोलची कार्यपद्धती, मतदान साहित्याचे व्यवस्थापन, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच मतदानानंतरची कार्यवाही या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती असणे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने दि. १५ जानेवारी २०२६ रोजी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महर्षी दयानंद सरस्वती यांनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला आर्य समाज म्हणजे तत्कालीन काळात असणाऱ्या अंधश्रद्धे विरुद्ध सुरू केलेली एक राष्ट्रवादी चळवळ आहे. त्यांनी देशातील पहिली गोशाळा हरियाणामध्ये सुरू केली. ब्रिटिश सरकारने मीठ करमुक्त करावे यासाठी सर्वप्रथम महर्षी दयानंद सरस्वती यांनी सह्यांची मोहीम राबविली होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी आर्य समाजाचे उल्लेखनीय योगदान आहे, असे प्रतिपादन जयपूर, राजस्थान येथील स्वामी सच्चिदानंद यांनी केले. पिंपरी येथील आर्य समाज संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी येथे तीन दिवस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, स्वामी सच्चिदानंद यांचे प्रवचन व अमृतसर पंजाब येथील…

Read More

निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी केले मार्गदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी चिंचवड शहराचा 2017 नंतर भाजपच्या माध्यमातून अक्षरशः कायापालट झाला आहे. विकासाची ही गंगा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या माध्यमातून अविरत वाहत रहावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्ते एक दिलाने, एक विचाराने आणि संघटनाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेत कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार पिंपळे गुरव येथे करण्यात आला . निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली “100 पार”चा संकल्प पूर्ण करू असा निर्धार देखील यावेळी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडणूक निर्णय प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.21) बैठकीचे आयोजन…

Read More

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ३१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार आज जोरदार शक्तीप्रदर्शनात सुरू झाला. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अरुण पवार, उमा शिवाजी पाडुळे आणि जया बाळासाहेब सोनवणे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारप्रमुख नाना काटे, माजी नगरसेवक कैलास बारणे यांनी प्रचारात सहभागी होत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. नवी सांगवीतील एम. एस. काटे चौक ते कृष्णा चौक, साई चौक, फेमस चौक, शिवनेरी चौक, एम. के. चौक, स्वामी विवेकानंद नगर, समता नगर असा भव्य प्रचार रॅलीचा मार्ग होता. या रॅलीत शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहरातील सर्वात पहिला पॅनल जाहीर करत प्रचाराला अधिकृत सुरुवात केली. आज, शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर-रहाटणी येथे प्रचार प्रमुख  विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या पॅनलमध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवार म्हणून  विठ्ठल उर्फ नाना काटे, सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गातून मिनाक्षी अनिल काटे, तर सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून  शितल नाना काटे आणि सौ. सायली उमेश काटे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख व माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते अखंड…

Read More

– पुणे ग्रामीण भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे फुलले ‘कमळ’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने दिमाखदार यश संपादन करत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या महायुतीने राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यातील २८८ नगरपरिषदांपैकी २१४ हून अधिक नगराध्यक्ष पदांवर भाजपाच्या महायुतीने विजय मिळवला असून, भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक २८ (रहाटणी–पिंपळे सौदागर) येथे आपल्या प्रचाराचा भव्य शुभारंभ जाहीर केला आहे. रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज मंदिर, पिंपळे सौदागर येथे हा प्रचार शुभारंभ सोहळा पार पडणार आहे. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमामुळे प्रभाग २८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताकदीनिशी मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच स्थानिक पातळीवरील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखली जाणार आहे. या प्रभागातून श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे, सौ. शीतल विठ्ठल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी शनिवारी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. प्रभाग क्र.२२ काळेवाडी, विजयनगर मधून त्यांची भाजपकडून उमेदवारी आता झाली आहे. या प्रभागात विनोद नढे यांच्या भव्य प्रचार शुभारंभ रॅलीचे आज रविवार (दि.२१) आयोजन करण्यात आले आहे. हि भव्य प्रचार रॅली आज (दि.२१) सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार रॅलीची सुरुवात काळेवाडी येथील पंचनाथ चौक येथून होणार असून, रॅलीचा मार्ग विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पवना चौक, जीवन चौक, भारतमाता चौक असा असणार आहे. रॅलीचा समारोप तापकीर मळा चौक येथे होणार आहे. या प्रचार शुभारंभ रॅलीत महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याच्या राजकारणात व विकासात पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिके चा स्वतंत्र ठसा आहे. उद्योग, व्यवसाय व रोजगारासाठी राज्याच्या ग्रामीण भागातून येथे कष्टकरी, मजूर झोपडपट्टीत येऊन रहात आहेत. घाम गाळून कष्ट करत आहेत. या मजुरांना, कष्टकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात, शिक्षणात, राजकारणात हवी तेवढी संधी मिळाली नाही. यासाठी मजुरांचे नेतृत्व करण्यासाठी, त्यांचा आवाज सभागृहात पोचविण्यासाठी “महाराष्ट्र मजूर पक्षाचे” संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी दिली. शुक्रवारी पिंपरी येथे महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने पत्रकार…

Read More

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी प्रभाग क्र.३१ मध्ये आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व अरुण पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार, (दि.२१) रोजी सकाळी १० वाजता करण्यात येत आहे. नवी सांगवी परिसरात प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रचार रॅली रविवार, दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून सुरुवात सुरची हॉटेल, एम. एस. काटे चौक, नवी सांगवी येथून होईल. या रॅलीचा मार्ग एम. एस. काटे चौक – इंद्रप्रस्थ कॉर्नर – साई चौक – फेमस चौक – युनियन बँक कॉर्नर – स्वामी विवेकानंद कॉर्नर…

Read More