- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन या ठिकाणी राज्यातील आगामी महानगरपालिकेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील पदाधिकाऱ्यांची राज्य निवड समिती सोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व प्रदेश व शहर ब्लॉक, फ्रंटल, सेलचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी (अजित पवार ) गटासोबत कोणत्याही प्रकारे काँग्रेस जाऊ शकत नाही तेव्हा समविचारी पक्षांशी बोलणे करून काँग्रेस पक्षाने स्थानिक निर्णय घेऊन निवडणुकीला सामोरे जावे. यावेळी एकमताने सर्व पदाधिकारी यांनी हा निर्णय स्वीकारत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस आगामी भूमिका स्पष्ट करेल व आता काँग्रेसच्या समविचारी पक्षांशी बोलणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय वातावरण तापत असून, वाकड येथील विविध गृहनिर्माण सोसायट्यांनी गणेश सयाजी कस्पटे व सारिका गणेश कस्पटे दाम्पत्याला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सत्ता परिवर्तनाची स्पष्ट चाहूल लागली आहे. वाकड येथील बर्ड व्हॅली बँक्वेट हॉलमध्ये आयोजित भव्य सोसायटी मेळाव्यात परिसरातील नामांकित सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एरोस मिडोज, माउंट वर्ड, पारस विस्टा, मालपाणी ग्रीन्स, ड्रीम कॅसल, पार्क वेज, अतुल पॅरेडाईझ, डायनस्टी, प्रिस्टिन वुड्स यांसह अनेक सोसायट्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी झाले होते. मेळाव्यात नागरिकांनी पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्ते, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग आदी मूलभूत प्रश्नांसह…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रभाग क्रमांक १२ मध्ये भव्य ‘विजयी संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गणेशनगर येथील पांडुरंग पार्क (लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ) येथे होणार आहे. प्रभाग १२ अंतर्गत येणाऱ्या तळवडे गावठाण, ज्योतिबानगर, गणेशनगर, रुपीनगर, सह्याद्रीनगर व त्रिवेणीनगर परिसरातील नागरिकांसाठी हा मेळावा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी निवडणुकीसाठी संघटन मजबूत करण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेळाव्यात प्रभागातील प्रमुख नेते व संभाव्य उमेदवार श्री. शरद वसंत भालेकर (ओबीसी पुरुष),…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे प्रभाग क्रमांक १८ मधील ताकदवान नेतृत्व सुरेश भोईर यांनी केलेल्या दणदणीत शक्तीप्रदर्शनाने चिंचवडच्या राजकारणाला जबरदस्त धक्का दिला आहे.जनतेच्या प्रचंड प्रतिसादामुळे चिंचवडच्या राजकीय मैदानात एकच खळबळ उडाली आहे. सन २०१७ मध्ये सर्वाधिक मते मिळवत विजय खेचून आणणारे सुरेश भोईर हे प्रभाग १८ मधील विकासाचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. मागील नऊ वर्षांत रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, मंदिरे, सभामंडप, नागरिक सुविधा आदी कामांचा सपाटा लावत त्यांनी “काम बोलेल” हीच आपली राजकीय ओळख निर्माण केली आहे. भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत तरुण, महिला, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले, यामुळे ही रॅली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा उमेदवार निशा दिनेश यादव यांच्या प्रचाराला महिलांचा निर्णायक पाठिंबा मिळताना दिसत आहे. तुळजाईनगर व नेवाळेवस्ती परिसरात राबविण्यात आलेल्या ‘घर टू घर’ संवाद उपक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली. या संवादादरम्यान महिलांनी प्रभागातील पाणी, स्वच्छता, आरोग्य, रस्ते, स्ट्रीट लाईट, तसेच महिलांसाठी सुरक्षितता व रोजगाराच्या संधी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर थेट चर्चा केली. महापालिकेच्या सभागृहात प्रभावी महिला प्रतिनिधित्व असावे आणि महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, अशी ठाम अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. मनपा ‘कौशल्यम लाईटहाऊस’ उपक्रमाच्या माध्यमातून युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ मध्ये भव्य प्रचार प्रारंभ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी गाव, वैभवनगर, मिलिंदनगर, जिजामाता रुग्णालय, अशोक थिएटर परिसर आदी भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात भाजपाचा प्रचार जोमात सुरू होणार असून, “विजयाचा संकल्प” घेऊन ही रॅली काढण्यात येणार आहे. ही प्रचार रॅली गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली असून, रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, पिंपरीगाव येथून होणार आहे. ही रॅली मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल परिसर, अशोक थिएटर परिसर अशा विविध ठिकाणांहून मार्गक्रमण करण्यात येणार आहे. लोकशाहीच्या बळावर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळवडे – रुपीनगर – त्रिवेणी नगर प्रभाग क्रमांक १२ मध्ये “आपुलकीचा, विश्वासाचं.. आपल्या लोकांनी बनवलेलं.. आपलं पॅनल” भारतीय जनता पक्षाचा गुरूवारी (दि.२५) भव्य प्रचार शुभारंभ करण्यात येणार आहे. भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचार पदयात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. गुरुवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री भैरवनाथ महाराज मंदिर, तळवडे गावठाण येथून या प्रचार पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे. यावेळी प्रभागातील भाजपाचे उमेदवार प्रविण महादेव भालेकर (ओबीसी पुरुष), सौ. शीतल धनंजय वर्णेकर (सर्वसाधारण महिला), सौ. शिवानीताई दादासाहेब नरळे (सर्वसाधारण महिला) तसेच शांताराम भालेकर (एस. के. बापू…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्य सचिवपदी विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करणे आणि ‘पेड न्यूज’ सारख्या प्रकारांवर लक्ष ठेवण्याचे काम करणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कक्ष कार्यान्वित केले आहेत. उमेदवारांच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक १७ (ड) साठी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज घेण्याची व अर्ज स्वीकृती प्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. अर्ज वितरणाच्या पहिल्या दिवशी (२३ डिसेंबर) ८७५ इच्छुक उमेदवारांनी २ हजार २१२ अर्ज नेले होते. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला नाही. तर आज (२४ डिसेंबर ) रोजी प्रभाग क्रमांक १७- ड साठी एक अर्ज दाखल केला असून गेल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचाराची रणनीती राबवत निवडणूक रणधुमाळीला वेग दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवत तसेच चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे उमेदवार विनोद नढे यांनी प्रचारात जोमाने आघाडी घेतली आहे. विनोद नढे यांचा भाजपमधील प्रवेश हा केवळ राजकीय घडामोड नसून, तो भाजपच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनसेवकांचा व सर्वसामान्य नागरिकांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारा ठरत आहे. प्रभागात कोपरा सभा, घराघरांत जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी आणि थेट संवाद यावर विशेष भर देत नढे यांनी प्रचाराला लोकाभिमुख…
