Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार  विनोद नढे यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करताच राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळाल्याचे चित्र आहे. प्रभागातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध घटकांनी एकत्र येत ‘विकासासाठी एकजूट’ असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. प्रभाग २२ मधील नागरी व औद्योगिक परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न, मूलभूत सुविधांचा अभाव, तसेच प्रशासनाकडून होणारी दुर्लक्षाची भावना लक्षात घेता, आता बदल हवा अशी नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे. “राजकारणाच्या चौकटीबाहेरचा जनतेचा हक्काचा माणूस” म्हणून विनोद नढे यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उभे राहत आहेत. नढे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत बूथ लेव्हल ऑफिसर यांच्यासाठी निवडणूक विषयक कामकाजाबाबत मार्गदर्शन बैठक डॉ. हेडगेवार भवन , निगडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ लेव्हल ऑफिसर यांची भूमिका व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी बूथ लेव्हल ऑफिसर यांना मतदार केंद्राची माहिती संकलन व अद्ययावत ठेवणे, मतदान केंद्रांवरील प्राथमिक सुविधांचा आढावा घेणे, शाळांमध्ये होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची खातरजमा करणे, मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देणे तसेच मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण ३६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यानुसार २३ डिसेंबर २०२५ ते आजपर्यंत एकूण ४९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. *आज प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे जमा करणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील–* *अ क्षेत्रीय कार्यालय – १२ अर्ज* प्रभाग क्र. १० – भाग्यश्री राजेंद्र कसबे (अपक्ष) तुषार रघुनाथ हिंगे (भारतीय जनता पार्टी) प्रभाग क्र. १४ – मनिषा चंद्रकांत शिंदे (अपक्ष-२) अभय बबन भंडारे (अपक्ष) संदेश सुरेश गादिया (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१) – एकूण २ प्रभाग क्र. १५ – रीमा प्रवीण मेंगळे (आम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक 11 मधील घरकुल परिसरात इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली आज घरोघरी प्रचार अभियान राबविण्यात आले. या प्रचारादरम्यान नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत निशा यादव यांना भरभरून पाठिंबा दिला. नागरिकांचा वाढता प्रतिसाद हा त्यांच्या विजयाची पोचपावती देणारा ठरत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. प्रचारादरम्यान निशा यादव यांनी घराघरांत भेटी देत नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. परिसरातील महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी निशा यादव यांचे मनापासून स्वागत करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. अनेक ठिकाणी माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले. घरकुल परिसरातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर येथे भाजपच्या नेत्या अनिता काटे यांनी गाठीभेटींच्या माध्यमातून थेट जनसंवादाची आक्रमक रणनीती अवलंबली आहे. प्रचाराच्या पारंपरिक चौकटीला छेद देत घराघरात पोहोचण्याचा निर्धार त्यांनी दाखवून दिला असून, या भेटींमुळे परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे. नागरिकांशी थेट संवाद साधताना अनिता काटे यांनी त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांचा सखोल आढावा घेतला. पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छता, महिला-सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि सोसायटी पातळीवरील मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजनांचे आश्वासन देत त्यांनी विकासाचा स्पष्ट ‘ॲक्शन प्लॅन’ मांडला. “समस्या ऐकून न थांबता त्या सोडविण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकू,” असा ठाम संदेश या भेटींमधून देण्यात आला.…

Read More

पिंपरी, पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आसवानी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर डब्बू आसवानी उपस्थित होते. धनराज आसवानी हे भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष असून त्यांच्या पत्नी सविता धनराज आसवानी या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर ३००० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने वॉर्ड क्रमांक १९ मधून निवडून आल्या होत्या. २०१७ मध्ये धनराज आसवानी यांनी याच वॉर्ड मधून भाजपा च्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. दिवंगत आमदार तथा भाजपा शहर अध्यक्ष लक्ष्मण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – “मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो” अशा घोषणानी दुमदुमला परिसर सोबत टाळ–मृदुंगाचा गजर… लोकशाहीच्या मूल्यांचा जयघोष.. महापुरुषांची वेशभूषा साकारलेले विद्यार्थी… वारकरी परंपरेचा साज आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण… अशी संस्कार, इतिहास आणि मतदानाचे महत्त्व यांचा संगम साधणारी ‘मतदानाची दिंडी’ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील संतपीठ परिसरात काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराने मतदान करणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचा संदेश देण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत…

Read More

– जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लक्षवेधी विकासकामे झाली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत या प्रभागातून सर्वप्रथम चारही नगरसेवक निवडून येतील, असा मला विश्वास आहे. भाजपाकडून इच्छुक असलेल्या प्रभागातील 12 उमेदवारांमध्ये कोणताही मनभेद नाही. ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांचे काम आम्ही ‘भाजपा परिवार’ म्हणून करणार आहोत, अशी भावना भाजपाचे उमेदवार आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे नगरसेवक उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वात प्रभाग क्र. 28 (पिंपळे सौदागर-रहाटणी) क्षेत्रात जोरदार प्रचार सुरू केला आहे. ग्रामदेवत श्री मुंजोबा मंदिरात आशिर्वाद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील उमेदवार विनोद नढे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला नवा वेगळा आयाम देत थेट जनसंवादावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रचाराच्या धावपळीतही नियोजन, शिस्त आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी ही रणनीती सध्या प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे. उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षरात तयार केलेल्या प्रचार नोंदीत आजच्या प्रचार फेरीचा सविस्तर आराखडा स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. पवननगर कॉलनीतील १, २, ३ व ४ या भागांमध्ये आज सखोल प्रचार फेरी घेण्यात येणार असून, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प यामध्ये नमूद करण्यात आला आहे. प्रचारादरम्यान फटाके आतषबाजी न करता, प्रत्यक्ष संवाद…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘काव्यानंद हा ब्रह्मानंदासारखा असतो!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी  निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी व्यक्त केले. कवी नितीन कुलकर्णी उर्फ सुमतीसुत लिखित आणि पीच ब्लिंक प्रकाशननिर्मित ‘सूर्यपक्षी – एक प्रकाशवारी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डाॅ. वंदना घांगुर्डे, ज्येष्ठ रंगकर्मी राजेंद्र करंबेळकर, ज्येष्ठ कवयित्री सुमती कुलकर्णी, प्रकाशिका निकिता कपूर – मथाडू आणि कवी नितीन कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. राजन लाखे पुढे म्हणाले की, ‘काव्य हा साहित्याचा आत्मा आहे. त्यामुळे…

Read More