- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. त्या शाळेची पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी जबाबदारी स्वीकारली. सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर क्रांतिकारी विचारांच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या अग्रदूत होत्या. विषमतेने ग्रासलेल्या समाजात स्त्रिया व शोषितांना सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य, कष्टकरी घरेलू कामगार संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भाजपाने दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता पिंपरी चिंचवड भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (दि. ३ जानेवारी) सकाळी ११ वाजता भक्ती शक्ती उद्यान येथे आयोजित करण्यात आला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती शक्ती समूह शिल्प येथून प्रचारास शुभारंभ होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा प्रदेश युवा मोर्चा माजी अध्यक्ष अनुप मोरे, भाजपा दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले तसेच भाजपाचे सर्व प्रभागातील उमेदवार, भाजपा प्रदेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून नीता पाडाळे, कोमल काळे, विनोद नढे, ऍड. हर्षद नढे यांना संधी देण्यात आली आहे. या पॅनलच्या माध्यमातून परिसराच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विनोद नढे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती देण्याचा निर्धार करण्यात आला असून, काळेवाडीच्या विकासाचा कायापालट करण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे. आज विजयनगर येथील नवरत्न मित्र मंडळ परिसर, मोरया कॉलनी, वैभव कॉलनी, सप्तश्रुंगी कॉलनी आदी भागांमध्ये प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी निघालेल्या प्रचारयात्रेत विकासाचा आवाज ठळकपणे उमटताना दिसत असून, स्थानिक मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.२ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीअखेर महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून तब्बल ४४३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध प्रभागांमधून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी मोठ्या प्रमाणावर माघारी नोंदवण्यात आल्या आहेत. ही माघार प्रक्रिया महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पार पडली असून, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. माघारीनंतर आता निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची चित्र स्पष्ट झाले असून, येत्या काळात प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांमध्येही काही ठिकाणी तडजोडीअंती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचे ५७ अधिकृत उमेदवार आणि ३ शिवसेना पुरस्कृत असे एकूण ६० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले असून ही यादी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सांडभोर यांनी जाहीर केली. महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने अनुभवी, तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शहरातील विकास, नागरिकांचे प्रश्न आणि स्थानिक नेतृत्व यांचा विचार करून उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. आगामी निवडणुकीत शिवसेना स्वबळावर मैदानात उतरत असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचे उमेदवार सक्षम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (पुनावळे–ताथवडे–वाकड) मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार यांच्या प्रचाराला आज शनिवारी, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी औपचारिक सुरुवात होणार आहे. पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असून, त्यानंतर परिसरात भव्य प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. या प्रचार दौऱ्याची सुरुवात नृसिंह मंदिर, महादेव मंदिर आणि गणेश मंदिर येथे दर्शन घेऊन होणार आहे. त्यानंतर पंचशील नगर, नरसिंह चौक (प्रभाग क्र. २५ ड) आदी भागांतून पदयात्रा काढण्यात येणार असून, नागरिकांशी थेट संवाद साधत मतदारांचे प्रश्न, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिता संदीप काटे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचाराची धुरा स्वतः काटे कुटुंबीयांनी खांद्यावर घेतली असून, पती संदीप काटे, दीर निलेश काटे तसेच पुतण्या धीरज काटे यांनी घराघरात जाऊन जनसंपर्काचा धडाका लावला आहे. गुरुवारी (दि. 02) रोजी पिंपळे सौदागर परिसरातील शिवार गार्डन, कुणाल आयकॉन, विश्वशांती कॉलनी या भागांत नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान प्रभागातील प्रलंबित प्रश्न, नागरी सोयीसुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता आदी मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. त्यावर काटे कुटुंबीयांनी योग्य तो आढावा घेऊन समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन…
पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटन दिवसेंदिवस मजबूत होत असून पक्षावरील विश्वास वाढत असल्याचे पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत गुरुवारी पिंपळे गुरव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शोभा संभाजी पगारे धर्मशाळे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष सुनिता अशोक अडसुळे, युवा नेते देवदत्त ऊर्फ सनी धर्मशाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काशिनाथ भिंगारे यांनी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या ध्येय-धोरणांवर विश्वास व्यक्त करत,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमच्यावरही बिनबुडाचे आरोप झाले होते. कोणावर आरोप झाला म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही. माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता; पण ज्यांनी आरोप केले, त्यांच्याच सोबत आज मी सरकारमध्ये काम करतो आहे. महापालिकेत आम्ही कामाची माणसे आहोत. मात्र, भाजपमध्ये सध्या दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी तयार झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. २) येथे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या नारळ फोडला. त्यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी (शरद पवार)चे शहराध्यक्ष तुषार कामठे, नाना काटे, अजित गव्हाणे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, आमच्या सत्ताकाळात २०१७ पर्यंत शहरात मोठ्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार रीना तोरणे (अ), दीपक मेवानी (ब), सविता आसवानी (क), काळूराम पवार (ड) यांनी शुक्रवारी उद्योग नगर, दत्तनगर, मयूर नगर, पत्राशेड परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. यावेळी लहू तोरणे, जय आसवानी, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, रेश्मा खरात, सलोनी सूर्यवंशी, साखराबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे यांनी प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना घड्याळ चिन्ह पुढील…
