- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे वाटप करत केला निषेध पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुष्यभर कामगार, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणारे कॉ. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ?” या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना थेट फोनवरून अर्वाच्च शब्दात शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. हि ऑडिओ सर्वत्र व्हायरल होत असून महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे वितरण करून या पुस्तकाचे समर्थन करण्यात आले. नखाते म्हणाले की, आ.संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात. कॅन्टीन मधल्या कामगारांना मारहाण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “क” क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक ०६ पांडवनगर, भोसरी येथे “स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६” संदर्भात नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची सामूहिक शपथही देण्यात आली. “माझे शहर, माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत महापालिकेकडून शहरभर विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये भाजी मंडई, रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक, चौक-रस्ते, सिग्नल बस स्थानके तसेच शाळा व महाविद्यालये येथे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मी स्वच्छाग्रही, मी कचरा करणार नाही, मी स्वच्छाग्रही, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करेल, मी स्वच्छाग्रही, मी माझा परिसर स्वच्छ ठेवेल, मी स्वच्छाग्रही, माझ्या घरातील ओला…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळाला सुद्धा महत्त्व देणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी क्रीडेला तितकेच महत्त्व आहे. खेळामुळे नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास विकसित होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. खेळात खिलाडूवृत्तीचे असणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात ग्रामीण खेळाडू विकास प्रकल्प व आमदार उमा खापरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ चे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधानपरिषद सदस्या आमदार उमा खापरे यांच्यासह…
तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. महेश भागवत यांचा पीसीसीओई मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना चालू घडामोडींची माहिती ठेवण्यासाठी दररोज काटेकोरपणे वृत्तपत्र वाचन करण्याची गरज आहे. तसेच शैक्षणिक अभ्यास आणि अवांतर वाचन सातत्याने सुरु ठेवावे. मी मराठी वाङ्मय आणि इतिहास हा विषय घेऊन यूपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झालो. ज्ञानाला भाषेचं बंधन नसतं हे माझे स्पष्ट मत आहे. जर स्पर्धा परीक्षेत अपयश आले तर आपल्याकडे प्लॅन बी तयार असला पाहिजे असे मार्गदर्शन तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. महेश भागवत यांनी पीसीसीओई मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ…
‘मधुगंधित हेमाक्षरे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक असून त्यातूनच मानवी संस्कृती जिवंत राहते!’ असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी व्यक्त केले. जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित पुस्तकपूजन आणि कवयित्री हेमांगी बोंडे लिखित ‘मधुगंधित हेमाक्षरे : कवितांची मांदियाळी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‘सरवा’कार प्रा. किसन वराडे तसेच प्रा. संजय पवार यांच्या विशेष उपस्थितीत, महाराष्ट्र साहित्य परिषद…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या देशातील पहिल्या स्मारक उभारणीस अखेर मंजुरी मिळाली आहे. आज महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे यांनी येत्या २८ तारखेला पिंपरीत या स्मारकाचे भूमिपूजन केंद्रीय गृहराज्यमंत्री रामदास आठवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर आरपीआय (आठवले) शहराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वाव्हळकर यांनी म्हटले आहे की, ‘पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारील आरक्षित जागेत माता रमाई यांचे स्मारक उभारण्याची मागणी माझ्यासह महापालिकेचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, महापालिकेच्या तिजोरीवर चक्क लेखा विभाग,काही अधिकारी , ठेकेदार व काही नगरसेवक यांनी संगनमताने दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी सर्व प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून ५२ कोटींहून अधिक रक्कमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली आहेत. या गंभीर भ्रष्टाचाराप्रकरणी प्रवीण जैन यांना तातडीने निलंबित करावे यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची भीषणता इतकी मोठी आहे की, सन २०२६-२७ चे अधिकृत बजेट…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यात मंगळवार (दि. 21 एप्रिल 2026) रोजी औद्योगिक परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, स्वीकृत संचालक दिनकर साळुंखे, बक्षीरभाई तरसगार, संस्थापक अध्यक्ष तात्या सपकाळ उपस्थित होते. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बंगाडे, मुख्य अभियंते संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत लघुउद्योग संघटनेच्या…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘वाचनातून जीवन समृद्ध होते!’ असे मत लेखिका प्रा. रूपाली अवचरे यांनी थेरगाव येथे व्यक्त केले. संवाद व्यासपीठ आयोजित लेखक – वाचक संवाद कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. याच कार्यक्रमात निमंत्रितांचे कविसंमेलन आणि कार्यकर्तृत्व पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी सुरेश कंक, चंद्रकांत धस, भाजप शहराध्यक्ष शत्रूघ्न काटे, नगरसेविका शालिनी गुजर, वाचक संवाद समितीचे अध्यक्ष अविनाश रानवडे, कांचन दीक्षित, जगन्नाथ फडतरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. रूपाली अवचरे पुढे म्हणाल्या की, ‘आयुष्यातील यश अपयश यावर मात करण्याचे बळ पुस्तके देतात. त्यामुळे माणूस संस्कारक्षम होतो!’ याप्रसंगी सोळा कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचा प्रारंभ रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ पासून होत असून चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे दररोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यानाची सुरुवात होईल. छत्तिसाव्या वर्षात पदार्पण करणार्या जिजाऊ व्याख्यानमालेमध्ये रविवार, दिनांक २६ एप्रिल रोजी अमृता चांदोरकर ‘जे मागाल ते मिळेल’ (मनातील लहरी कसे काम करतात?) या विषयावर प्रथम पुष्पाद्वारे विचार मांडतील. सोमवार, दिनांक २७ एप्रिल रोजी प्रा. डॉ. संजय चौधरी ‘संतांच्या संगती’ या विषयाच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधतील. मंगळवार, दिनांक २८ एप्रिल रोजी संदीप तापकीर ‘मराठ्यांचा देदीप्यमान पराक्रम : गाथा स्वराज्य ते साम्राज्याची!’ या विषयाच्या माध्यमातून…
