Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सांगवी प्रभाग क्रमांक ३२ अ (अनुसूचित जाती – महिला) मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, निवडणूक रणांगण अक्षरशः तापले आहे. डॉ. प्रज्ञा गायकवाड जगताप यांनी रणघोष करत मैदानात उतरताच ही लढत केवळ प्रचारापुरती न राहता थेट सत्तासंघर्षात रूपांतरित झाली आहे. या परिवर्तनाच्या लढाईला सामाजिक चळवळीतील ठाम आवाज असलेले डॉ. धम्मरत्न गायकवाड यांची भक्कम साथ लाभल्याने संपूर्ण सांगवी परिसरात नव्या उर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज शिवसृष्टी गार्डनपासून गल्ली–बोळ, चौक–चौरस्ते आणि वस्ती-वस्तीमध्ये केवळ एकच नाद घुमताना दिसला—तो म्हणजे शिट्टीचा रणघोष. ही शिट्टी आता केवळ प्रचाराचे साधन राहिले नसून,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीने आक्रमक शक्तिप्रदर्शन करत प्रचाराची दिशा ठामपणे निश्चित केली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेमुळे संपूर्ण प्रभागातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. ग्रामदैवत पंचनाथ महाराजांचे दर्शन घेऊन पदयात्रेने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ज्योतिबा गार्डन येथे झालेल्या भव्य जाहीर सभेला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सभास्थळी पोहोचताच भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, तर विरोधकांच्या गोटात खळबळ उडाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. सभेत बोलताना आमदार शंकर जगताप यांनी अत्यंत आक्रमक शैलीत विरोधकांवर थेट हल्लाबोल केला.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे. “स्वतःचे घर भरण्यासाठी नव्हे, तर केवळ समाजासाठी काम करत आलोय,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले. प्रभाग २१ मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या पॅनलतर्फे पिंपरी गावातील माळी आळी, कापसे आळी, पवनेश्वर मंदिर परिसर, कुंभारवाडा, खराडे वाडा, नानेकर चाळ, वाघेरे आळी, गव्हाणे आळी, सविता अपार्टमेंट आदी भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली. महिलांनी औक्षण करून स्वागत केले तर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते श्री. संदीप काटे यांनी शहरातील विविध सोसायट्यांमधील नागरिक व सोसायटीधारकांशी थेट भेटी घेऊन संवाद साधला. या प्रत्यक्ष संवादातून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक विकासाबाबतच्या सूचना जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान भारतीय जनता पार्टीची विकासाभिमुख ध्येय-धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध योजना तसेच महापालिका स्तरावरील नियोजित विकासकामांची सविस्तर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, उद्याने व नागरी सुविधा या मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली. सोसायटीधारकांनी या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला. नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता येत्या निवडणुकीत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (चिंचवडगाव–केशवनगर) मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ झाला. चिंचवडगाव येथील श्रद्धास्थान असलेल्या महासाधू श्री मोरया गोसावी महाराज मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून भाजपने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली. महासाधू श्री मोरयांच्या चरणी नतमस्तक होत भाजपचे गट क मधील अनुक्रमांक चारचे अधिकृत उमेदवार ॲड. मोरेश्वर चंद्रकला ज्ञानेश्वर शेडगे यांच्यासह सौ. अपर्णा निलेश डोके, सौ. मनिषा योगेश चिंचवडे आणि श्री. सुरेश शिवाजी भोईर यांनी विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकहिताला प्राधान्य देण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या प्रचार शुभारंभामुळे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते नाना काटे यांचा ‘लकी नंबर’ म्हणून ओळखला जाणारा १२१२ हा आकडा यंदाच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. यावेळी हा आकडा केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता थेट इलेक्ट्रॉनिक बॅलेट मशीनवरील (ईव्हीएम) उमेदवारांच्या क्रमवारीतून समोर आल्याने चर्चेला अधिक धार मिळाली आहे. ईव्हीएमवरील मांडणीत ‘१२१२’ चा दुर्मिळ संयोग ईव्हीएमवरील उमेदवार क्रमांक पाहता नाना काटे यांच्या संपूर्ण पॅनलमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण १ २ १ २ आकडी संयोग दिसून येत आहे. उमेश काटे हे क्रमांक – १ शीतल काटे क्रमांक  – २ मीनाक्षी काटे क्रमांक – १ नाना काटे क्रमांक    …

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असले तरी, जनतेच्या मनात मात्र निर्णय जवळपास ठाम झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवार सौ. सारिका गणेश कस्पटे या नगरसेवक म्हणूनच प्रभागात ओळख निर्माण करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या सामाजिक कामामुळे सौ. सारिका कस्पटे यांनी केवळ निवडणूक काळातच नव्हे, तर कायमस्वरूपी जनतेसोबत राहणारे नेतृत्व म्हणून विश्वास संपादन केला आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, महिला व ज्येष्ठांचे प्रश्न, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या विषयांवर त्यांनी अखंडपणे केलेला पाठपुरावा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील व्यापारी वर्गाने भारतीय जनता पक्षाला उघड पाठिंबा दर्शवला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून विविध धोरणांद्वारे व्यापारी वर्गाला सातत्याने पाठबळ दिले असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. पारदर्शक करप्रणालीमुळे व्यवसाय करणे सुलभ झाले असून, त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. म्हणूनच आम्ही भाजपसोबत आहोत, असा ठाम विश्वास पिंपरीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, अशोक थिएटर परिसरातील प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपा–आरपीआय (आठवले गट) चे अधिकृत उमेदवार सौ. उषाताई वाघेरे, मोनिका ताई निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. ३१ चे उमेदवार दिप्ती अंबरनाथ कांबळे, राजेंद्र गणपत जगताप, उमा शिवाजी पाडुळे व अरुण श्रीपती पवार यांचे लाडक्या बहिणींकडून ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. घराघरांतून लाडक्या बहिणींनी पुढाकार घेत उमेदवारांचे औक्षण करून, फुलांची उधळण केली. या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रभागातील समस्या आणि स्थानिक विकासाबाबत चर्चा केली. प्रचाराला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे मनोबल वाढले आहे. एकूणच निवडणूक प्रचारात महिलांचा वाढता सहभाग लक्षवेधक ठरत आहे. घराघरांतून संवाद साधताना महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत पुढील काळातही…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेनेच्या प्रचाराला वेग आला आहे. संत तुकाराम नगर, वल्लभनगर, महात्मा फुलेनगर, लांडेवाडी, कासारवाडी आणि नाणेकर चौक या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना जनसामान्यांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना महानगरप्रमुख राजेश चिमणराव वाबळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत प्रचाराची धुरा सांभाळली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य तसेच मूलभूत नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर उमेदवार ठोस भूमिका मांडत थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रभाग २० मध्ये परिवर्तनाची लाट निर्माण…

Read More