पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असले तरी, जनतेच्या मनात मात्र निर्णय जवळपास ठाम झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवार सौ. सारिका गणेश कस्पटे या नगरसेवक म्हणूनच प्रभागात ओळख निर्माण करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या सामाजिक कामामुळे सौ. सारिका कस्पटे यांनी केवळ निवडणूक काळातच नव्हे, तर कायमस्वरूपी जनतेसोबत राहणारे नेतृत्व म्हणून विश्वास संपादन केला आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, महिला व ज्येष्ठांचे प्रश्न, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या विषयांवर त्यांनी अखंडपणे केलेला पाठपुरावा आज मतदारांच्या निर्णयामागील प्रमुख कारण ठरत आहे.
प्रभाग क्रमांक २६ मधील अनेक नागरिकांनी “आता आमचा नगरसेवक कोण असावा हे आम्ही ठरवले आहे” असे खुलेपणाने सांगण्यास सुरुवात केली असून, हा जनमताचा सूर विरोधकांच्या गोटातही चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय लढत न राहता, जनतेच्या विश्वासाची थेट लढाई ठरत असल्याचे दिसून येत आहे.
विकास, पारदर्शकता आणि स्वच्छ प्रशासन या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणाऱ्या सौ. सारिका गणेश कस्पटे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाखाली निवडणूक रिंगणात असून, प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

