पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सांगवी प्रभाग क्रमांक ३२ अ (अनुसूचित जाती – महिला) मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, निवडणूक रणांगण अक्षरशः तापले आहे. डॉ. प्रज्ञा गायकवाड जगताप यांनी रणघोष करत मैदानात उतरताच ही लढत केवळ प्रचारापुरती न राहता थेट सत्तासंघर्षात रूपांतरित झाली आहे.
या परिवर्तनाच्या लढाईला सामाजिक चळवळीतील ठाम आवाज असलेले डॉ. धम्मरत्न गायकवाड यांची भक्कम साथ लाभल्याने संपूर्ण सांगवी परिसरात नव्या उर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज शिवसृष्टी गार्डनपासून गल्ली–बोळ, चौक–चौरस्ते आणि वस्ती-वस्तीमध्ये केवळ एकच नाद घुमताना दिसला—तो म्हणजे शिट्टीचा रणघोष.
ही शिट्टी आता केवळ प्रचाराचे साधन राहिले नसून, ती अन्यायाविरोधातील गर्जना, सामाजिक न्यायाची हाक आणि नव्या नेतृत्वाच्या आगमनाची स्पष्ट घोषणा ठरत आहे. या आक्रमक आणि प्रभावी प्रचारामुळे प्रस्थापित उमेदवारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असून, त्यांची राजकीय पकड सैल होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
डॉ. प्रज्ञा गायकवाड जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शन व पाठबळामुळे प्रभाग ३२ अ मध्ये परिवर्तन अटळ असल्याची भावना नागरिकांमध्ये दृढ होत चालली आहे. “शिट्टी वाजतेय म्हणजे बदल ठरलेलाच” अशी चर्चा आता सर्वसामान्य मतदारांपासून राजकीय वर्तुळापर्यंत ऐकू येत आहे.
या निवडणुकीत प्रचार नव्हे, तर थेट लढाई सुरू झाली असून, यावेळी शिट्टीच बोलेल—आणि प्रभाग ३२ अ चा निर्णय बदलाच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

