Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज)  – बीओटी तत्वावर रावेत किवळे याठिकाणी बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करा, अशी मागणी प्रज्ञा खानोलकर यांनी आयुक्तांकडे  निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक १६ मधील सर्वे नं. ३९ या ठिकाणी B.O.T तत्वावर एक इमारत बांधण्यात आलेली आहे. त्यामधील काही जागा महानगरपालिकेला हस्तातंतरीत होणार
आहे.

सध्या वॉर्ड क्रमांक १६ मध्ये रावेत किवळे हा महानगरपालिकेत सर्वात मोठा वार्ड आहे. तेथील
लोकसंख्या जवळ जवळ ५२००० आहे. सध्या असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र हे किवळे गावठाण येथे आहे. विस्तारित झालेला परिसर विकासनगर, साईनाथ नगर, आदर्शनगर, एम बी कॅम्प, गुरुदत्त कॉलनी इत्यादी आहे. सध्या असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या नागरिकांना जाण्यासाठी जवळ जवळ ५ ते ६किलोमीटर अंतर जावे लागते.
या वरील सर्व बाबींचा विचार करता विकास नगर मध्ये B. OT तत्वावर झालेल्या इमारतीमध्ये
एक नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करा असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version