Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सर्व सभासदांची  वार्षिक सर्वसाधारण सभा ( AGM) बुधवार दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वा. संघटना रजिस्टर ऑफिस सद्गुरू प्लाझा, पहिला मजला, ऑफिस नं. २ आणि ३, THARMAX चौक, चिंचवड, या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, अशी माहिती अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली .

गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास अर्धा तासानंतर उपस्थित असलेल्या सभासदासह आहे त्याच ठिकाणी सभा घेतली जाईल, सभेमध्ये घेतलेले निर्णय सर्वांवर बंधनकारक असतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. सभेमध्ये कोणाला काही म्हणणे मांडावयाचे असेल त्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात संघटनेच्या कार्यालयात दोन दिवस अगोदर जमा करावे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version