ताज्या घडामोडीपिंपरी

वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार महापालिकेच्या इतर रुग्णालयात निरीक्षक म्हणून कामकाज करण्याची संधी स्थायी समितीत विषयाला मान्यता

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खाजगी वैद्यकीय संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालयात निरीक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी संधी देण्याच्या विषयासह विविध आवश्यक विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.

स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

खाजगी व शासकीय संस्थेतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपँथी पदवी अभ्यासक्रम, भौतिकोपचार, व्यवसायोपचार यांसारखे निमवैद्यकीय पदवी अभ्यासक्रम व परिचर्या विषयक पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी राज्य शासनाने दिलेल्या अटी शर्तींनुसार करारनामा करण्यात येणार आहे. याअंतर्गत वैद्यकीय व संबंधित क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या किंवा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अल्प दरात महापालिका रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांना निरीक्षक म्हणून कामकाज करण्याची संधी मिळणार आहे.

कोणते विद्यार्थी करू शकतात अर्ज?

खाजगी वैद्यकीय संस्थेत बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, एमबीबीएस, एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा, डीएनबी, डीएम, एमसीएच, एमडीएस, एमएसडब्ल्यु, एमबीए (हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन) तसेच समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.

प्रशिक्षण कालावधी:

किमान १ महिना ते कमाल ६ महिने
शुल्क:भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रती खाट ३०० रुपये ( महिन्याला ९,००० रुपये) शुल्क आकारले जाईल.

· परदेशी विद्यार्थ्यांसाठी याचे तीनपट शुल्क आकारले जाईल.दरवर्षी प्रतिदिन शुल्कामध्ये १०% वाढ होणार आहे.विद्यार्थ्यांना १ महिन्याचे शुल्क आगाऊ भरावे लागेल.

प्रक्रिया:विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर रुग्णालयातील गरज व उपलब्धतेनुसार परवानगी दिली जाईल.

·संबंधित विद्यार्थ्यांना महापालिकेशी करार करावा लागेल.

·परवानगी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व इतर महापालिका रुग्णालयांमध्ये प्रशिक्षणाची (निरीक्षक म्हणून काम करण्याची) संधी मिळेल.

महापालिका रुग्णालयांमध्ये नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या योजनेसाठी प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली. याव्यतिरिक्त, महापालिकेच्या प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख, सर्व्हे नं. ४२, २, ५, ७ मधून जाणारा १२ मीटर रुंद डी. पी. रस्ता विकसित करणे, निसर्गकवी संत बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय याठिकाणी पांढरे उंदीर पुरविणे, भारत विकास शिक्षण संस्थेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयांची संलग्रता मिळविणे, अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वापरात नसलेले अथवा दुरावस्थेत अथवा मोडकळीस असणारे सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचा सर्व्हे करून निष्कासित करणे, प्रभाग क्र. १ मधील अष्टविनायक चौक परिसरातील तसेच पाटीलनगर, बागवस्ती व इतर भागातील रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने दुरूस्ती करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास देखील प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button