ॲड.सचिन काळे युवा मंचच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

चऱ्होली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चऱ्होली येथील काळे कॉलनी मध्ये नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेत अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये मात करून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान ॲड. सचिन काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सचिन काळे म्हणाले की, मुलांमध्ये शिक्षणाची जिद्द असली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थिती जाणीव ठेवून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीझ केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मला आयुष्य काय करावयाचे आहे ? आणि हेच ध्येय डोळ्यासमोर अभ्यास केला पाहिजे ,त्यासाठी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे ,सध्या स्पर्धेचे युग आहे आणि आपण स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे असे परखड मत सचिन काळे यांनी व्यक्त केले .
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे यांनी सांगितले की कोणत्याही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण काही मदत लागली तर निश्चित मदत करेल मग तो कोणत्याही शाळेचा विद्यार्थी असो, निसंकोच पणे विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले व पुढील शिक्षणसाठी मी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहे.मी लवकरच पालक व विद्यार्थीसाठी मोफत मार्गदर्शन मेळावा घेणार असल्याचे सांगितले.यावेळी सुयश निंबाळकर, विकास शिंदे ,मयुरी राजगुरू, श्रावणी शेरकर, अथर्व घुले सह अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.













