‘हातगाडी’ चिन्हाला आपलं लाख मोलाचे मत देऊन विजयी करा ‘एकता पॅनल’चे मतदारांना आवाहन

‘एकता पॅनल’चे उमेदवार सुरेश कर्डिले आणि कांचन मांढरे यांच मतदारांना आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगर पथ विक्रेता समिती सदस्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या रविवारी (दि. २०) रोजी या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे.
पथ विक्रेता एकता समितीच्या ‘एकता पॅनल’कडून सर्वसाधारण पुरुष गटातून सुरेश मारुती कर्डिले आणि सर्वसाधारण महिला राखीव गटातून कांचन महेश मांढरे हे निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांचा प्रचाराचा जोमात सुरु आहे. ‘हातगाडी’ या चिन्हासमोर शिक्का मारून आम्हाला निवडून द्या, असं आवाहन त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात उमेदवार सुरेश कर्डिले यांनी म्हटले आहे की, पथारी व्यवसायिक बंधू-भगिनी यांचे जीवनमान कसे सुधारेल व त्यांना प्रशासनाच्या सर्व योजनांचा कसा लाभ मिळवून देता येईल त्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार आहे. पथारी व्यावसायिकांना फेरीवाला प्रमाणपत्र, ओळखपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. प्रशासनाला अतिक्रमण कारवाई करण्यापासून रोखणार. महानगर पालिकेने केंद्राकडे सुचविलेल्या ‘पथारी झोन’ असलेल्या जागा शोधून, त्यांची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला भाग पाडणार. त्यांना (त्या जागांना) वीज, पाणी, संरक्षण या पायाभूत सुविधा मिळवून देणार. मॉलच्या धर्तीवर वेगवेगळे झोन विकसित करणार, उदा. फुडझोन, व्हेजिटेबल झोन, स्टेशनरी झोन, फ्रुट झोन, महिलांसाठी पिंक झोन इ. त्या-त्या झोनची स्टॉलची वेगवेगळी रंगसंगती करणार. जास्तीत जास्त व्हेंडिंग झोन करून सर्व फेरीवाले बांधव यांचे पुनर्वसन करणार. जेथे जोर जुलूम, जबरदस्ती दिसून येईल. त्याठिकाणी अन्यायाविरुद्ध वाचा फोडणार आहे. त्यासाठी पथविक्रेता एकता समितीच्या ‘एकता पॅनल’च्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या ‘हातगाडी’ या चिन्हाला आपलं लाख मोलाचे मत देऊन आम्हाला विजयी करा, असं आवाहन या पत्रकाद्वारे त्यांनी पथ विक्रेता मतदारांना केलं आहे.













