चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक

स्मरणिकेतून १०० वर्षातील नाट्य संमेलन अध्यक्षांच्या कारकीर्दीला मिळणार उजाळा

Spread the love

 

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या ६ व ७ जानेवारी २०२४ दरम्यान चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलनावर आयोजित करण्यात आले आहे. या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण स्मरणिका तयार करण्यात आली आहे. १०० व्या नाट्य संमेलनाचे औचित्य साधून या स्मरणिकेत आजवर झालेल्या १०० नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला आहे. ‘नांदी’ असे या स्मरणिकेला नाव देण्यात आले असून १०० व्या नाट्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी याचे अनावरण करण्यात येणार आहे.

या स्मरणिकेची संपूर्ण जबाबदारी ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नियामक मंडळाचे सदस्य सुहास जोशी यांच्यावर सोपवण्यात आले आहे. याविषयी बोलताना सुहास जोशी म्हणाले, खरं  तर स्मरणिका तयारीसाठी ३० दिवसांपेक्षाही कमी दिवस मिळाले असून अत्यंत कमी वेळात आम्ही हे शिवधनुष्य उचलले आहे. १००वे नाट्य संमेलन होत असल्याचयी पार्श्वभूमीवर या स्मरणिकेत १०० नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला आहे. या सर्व नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या फोटोंचा देखील यामध्ये समावेश असणार आहे. एका नाट्य रासिकाकडे १९६६ पासून नाटकाच्या तिकिटाचा संग्रह आहे. त्या नाटकाच्या तिकिटांच कोलाज देखील यामध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच पंडित नंदकिशोर कपोते यांचा ‘नाटकातील नृत्याचे महत्व’ या विषयांवरील लेख, त्याच प्रमाणे लावणी सांम्राज्ञी संजीवनी मुळे – नगरकर यांचा ‘नाटकातील लोक कलेच महत्व’ असा ही एक लेख असणार आहे.

राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, पद्मश्री गिरीष प्रभूणे,  पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त शेखर सिंह आयुक्त, नाटकार, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांचाही लेख असणार आहेत. याशिवाय मधु जोशी यांचा सांस्कृतिक मागोवा हा लेख आहे.  संगीत रंगभूमीच्या अभ्यासक डॉ. वंदना गांगुरडे यांचा ‘संगीत रंगभूमी व मराठी नाटक’ असा एक लेख असणार आहे. गेली ६२ वर्ष राज्यात महाराष्ट्र शासनाची राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये आज पर्यंत इतकी वर्ष अविरातपणे ही एक मोठी नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर प्रकाश टाकणारा एक लेख पि. डी. कुलकर्णी यांचा असणार आहे. तसेच ‘गाढवाच लग्न’ फेम वसंत आवचरीकर यांचा देखील यामध्ये लेख आहे. शिवाय भाऊसाहेब भोईर यांनी सुरू केलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वाटचालीचा देखील लेख यामध्ये आहे.

स्मरणिके विषयी बोलताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, अवघ्या महिनाभरा पूर्वी नाट्य संमेलन पिंपरी- चिंचवडला मिळाल्या नंतर स्मरणिकेची तयारी सुरू झाली. सुहास जोशी यांनी या स्मरनिकेची धुरा सांभाळली आहे. तर मुखपृष्ट हे प्रसिद्ध नैपथ्यकार प्रदीप मुळे यांनी तयार केले आहे. १०० वे नाट्य संमेलन असल्याने तंजावरमध्ये झालेल्या पहिल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांपासून आज पर्यंतच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांपर्यंतचा इतिहास व नाट्य संमेलनाचा प्रवास यावर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्यामुळे खरोखरच ही स्मरणिका स्मरणात राहणारी आणि संग्रही ठेवणारी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button