ताज्या घडामोडीपिंपरी
साहित्यिक सुरेश कंक पुन्हा एकदा उपोषण करणार!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही संस्था येत्या काही दिवसात दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेत आहे.
छोट्या छोट्या विभागांना साहित्य शाखा ही संस्था देत नाही. त्यामुळे पिंपळे गुरव सांगवी शाखा व्हावी म्हणून यापूर्वी मी एक उपोषण केले होते.
आता दिल्लीमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद जात आहे त्याचा आनंद आहे.पण छोट्या छोट्या विभागांना साहित्य संस्था देत नाही म्हणून पिंपळे गुरव सांगवी शाखेच्या मागणीसाठी दिल्लीत ज्यावेळेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल त्याचवेळी मी पुन्हा एकदा उपोषण करणार आहे. असे सुरेश कंक म्हणाले. मोठ्या बाता मारतील तिथं दिल्लीत पण गल्लीत काय आहे याची जाणीव करून देण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी नक्की उपोषण करणार आहोत असा ठाम निर्धार कंक यांनी व्यक्त केला .














