चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

समृद्ध लाभार्थी संपर्क अभियानची कासारवाडीमधून अमित गोरखे यांच्या उपस्थीतीत सुरुवात

Spread the love

मोदिजींना धन्यवाद म्हणायला पिंपरी विधानसभेतून सरसावले अनेक समृद्ध लाभार्थीं हात..!!!

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी विधानसभेत समृद्ध लाभार्थी अभियानाची सुरुवात कासारवाडी येथून झाली. माननीय पंतप्रधान मोदीजींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात गोरगरिबांपर्यंत सरकारी योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यां पर्यंत पोहोचणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या दहा वर्षाच्या कार्यकाळात देशात मोठ मोठे बदल घडून आले तसेच देशातील नागरिकांना सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी नवनवीन योजना आणल्या यावेळी पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला,त्यांचे मोदींजीं बद्दलचे मत जाणुन घेतले. या देशाला बलशाली भारत बनवायचा आसेल तर फक्त आणी फक्त मोदिजीच हे करु शकतात हा आत्मविश्वास तेथील नागरिकांनी दर्शवला. अगदी भाजी विक्रेत्या पासून ते किराणा मालाच्या दुकानापर्यंत अगदी बांगडी भरणारी महिला सुद्धा मोदींमुळे काय फायदा झाला हे सांगत होत्या, पूर्ण काळात मिळालेली मोफत लस असेल मोफत अन्नधान्य पुरवठा असेल बाळंतपणात मिळालेली निधी असेल अपंगांना मिळालेला निधी असेल किंवा रोजगारासाठी मुद्रा योजनेतून घेतलेले लोन असेल असे अनेक लाभार्थी या भागात संपर्क करताना भेटले व प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या माननीय पंतप्रधान मोदीजींच्या काळातील शासनाचा लाभ घेतल्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीजीच आम्हाला हवे आहेत अशी उस्फूर्त भावना व्यक्त केली.

अमित गोरखे बोलताना म्हणाले की आज पिंपरी विधानसभा क्षेत्रात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नगरसेवकांबरोबर लाभार्थी संपर्क अभियानात फिरत असताना खऱ्या अर्थाने अगदी वंचित घटकांपर्यंत मोदीजींनी आखलेल्या योजना पोचल्याचा आनंद व समाधान व्यक्त झाले.

पंतप्रधान मोदी चिनी अनेक योजना व कामे केली त्याच प्रामुख्याने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटीहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य वितरण करण्यात आले, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 कोटीहून अधिक गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळाली, जल जीवन मिशन अंतर्गत 14 कोटीहून अधिक घरांमध्ये नळाचे पाणी आणि 100% घरांमध्ये वीज पोहोचली,  प्रधानमंत्री स्व निधी योजनेअंतर्गत 53 लाख फेरीवाले, विक्रेत्यांना कर्ज वाटप करण्यात आले. 51 कोटीहून अधिक जन धन खाती उघडून गरिबांना बँकिंग व्यवहार प्रवाहात आणले गेले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11.8 कोटी अधिक शेतकऱ्यांना दोन लाख 80 हजार कोटी रुपयाहून अधिक थेट आर्थिक मदत करण्यात आली. महिलां साठी उज्वला योजना अंतर्गत 10 कोटी हून अधिक मोफत (गॅस) LPG कनेक्शन दिले आणि 12 कोटी शौचालय बांधण्यात आले आयुष्यमान भारत अंतर्गत 55 कोटी लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच सुद्धा या योजनेतून देण्यात आले. त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा अभूत पूर्वक विकास घडऊन आणला. मोदी सरकार येण्याआधी देशात विमानतळांची संख्या फक्त 74 ह- भारत आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तर डिजिटल आर्थिक व्यवहारांमधे जगात नंबर 1 आहे. मोदीजींनी एवढेच नाही तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% जागा राखीव केल्या. संपूर्ण जग या ब्रह्मांडाचा शोधात असताना भारताने सुद्धा मागे न राहता चंद्रयान 3 मोहिमेनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागावर आपले यान उतरवणारा हा जगातील पहिला देश ठरला.

भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 शिखर परिषद 2023 यशस्वी आयोजन केले.संपूर्ण देशाला आयोध्या श्रीरामजन्मभूमीत प्रभू श्रीरामांचे दर्शन पुन्हा घडवून आणून भव्य श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली. कोरोनाच्या काळात वंदे भारत मिशन अंतर्गत 2.97 कोटी लोकांना देशाच्या विविध भागात आपल्या घरी सुरक्षित रित्या पोहोचवले यासारख्या अनेक गोष्टी मोदीजींनी त्यांच्या दहा वर्षाच्या पंतप्रधान कार्यकाळात देशवासियांपर्यंत पोहोचवल्या गेल्या दहा वर्षात देशाचा सर्वांगीण विकास होत आहे तो या देशातील नागरिकांनी दाखवलेल्या मोदीजींवरच्या विश्वासामुळेच.या सर्व योजना, ही सर्व कामे करताना देशाला जगात आर्थिक महासत्ता बनवण्याच्या संकल्प मोदिजींनी केला आसून या अभियानत संपुर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे .या अभियानात पिंपरी विधानसभेतील पदाधिकारी,कार्यकर्ते सामिल झाले होते. यावेळी पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, प्रदेश सदस्य माऊली थोरात, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर,देवदत्त  लांडे ,प्रकाश तात्या जवळकर, सुनील लांडगे,सुरेश  गदिया गणेश  संभेराव, अजित भालेराव, बापूसाहेब भोसले , राजू गणपती साठे, नाना कांबळे, बाळासाहेब लांडे, युवराज लांडे ,मयूर थोरात, मनोज बोरसे सौ सीमा बोरसे, सार्थ पालांडे, श्रीकांत खाडे. व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हे अभियान संपुर्ण देशात,पिं.चिं शहरात 23 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button