संवाद व्यासपीठाच्या वतीने मधुकर बच्चे यांना कार्य कर्तृत्व पुरस्कार प्रदान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संवाद व्यासपीठाच्या वतीने या वर्षी कार्य कर्तृत्व पुरस्कार मधुकर बहिरू बच्चे यांना प्रदान करण्यात आला.
समाजात सातत्याने समजोपयोगी उपक्रम राबविणे ,कायम निपक्ष समाजसेवा करणे,जनतेच्या न्याय हक्कासाठी सतत आवाज उठवून जनेतला न्याय मिळवून देणे, समाजहीत डोळ्यांसमोर ठेऊन सतत जनतेला जास्तीत जास्त फायदा करण्याची तळमळ ,आदी कार्याची दखल घेऊन मधुकर बहिरू बच्चे यांना कार्य कर्तृत्व पुरस्कार महासंसद रत्न मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
या वेळी संवाद व्यासपीठ संस्थापक अध्यक्ष हरेश अप्पा मोरे,युवा कीर्तनकार झी टॉकीज फेम जयश्री येवले, जागृत आपंग संघटना अध्यक्ष मानव कांबळे,जिल्हा नियोजन समिती सदस्य भारती विनोदे,अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघटना विष्णुपंत तांदळे आदी उपस्थित होते. या वेळी नागरिक उपस्थित होते.









