Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उपशहर प्रमुख  हरेश आबा नखाते यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही शुक्रवार दिनांक १/११/२०२४ रोजी दिवाळी फराळ आणि चाय पे चर्चा अर्थात स्नेह मेळावा शहरातील पत्रकार बांधव सह आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर जेष्ठ पत्रकार विजय जाधव, ज्येष्ठ पत्रकार दादाराव आढाव, अनिल वडघुले,महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज च्या लीना माने, जेष्ठ पत्रकार गणेश हुंबे, जेष्ठ पत्रकार महावीर जाधव, पत्रकार संतोष गोतावळे, विजय सोनवणे,रमेश साठे, पुण्यनगरीचे महेश मंगवडे अनिल बडगुजर, सागर सूर्यवंशी, संतोष जराड पत्रकार बांधव उपस्थित होते.

परिसरातील काम करणाऱ्या तमाम अभ्यासू पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत पार पडला. सुमारे दोन तास रंगलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमा दरम्यान विविध विषयांवर पत्रकारांची चर्चा रंगली होती वर्षाभर ऊन,वारा, पाऊस, याची तमा न बाळगता परिसरातील वार्तांकन आणि दैनंदिन घडामोडी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचे काम पत्रकार बांधव करीत असतात त्यांच्याबरोबर स्नेह जपता यावा यांच्याही अडीअडचणी जाणून घेता याव्यात याच अनुषंगाने दरवर्षी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.अशा भावना हरेश आबा नखाते यांनी व्यक्त केल्या.

दिवाळी सणाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली शिवसेना विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी आभार मानले

Share.
Leave A Reply

Exit mobile version