Spread the love

 

महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांशी अण्णा बनसोडे यांची बैठक

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुती मधील घटक पक्षांची देखील शहरात ताकद वाढली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे म्हणाले.

महायुती मधील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत आपण सर्व एक दिलाने काम करत असून महायुतीच्या उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत असे घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, घटक पक्षांना आगामी महापालिका तसेच इतर निवडणुकांमध्ये चांगल्या जागा मिळाल्या पाहिजेत. घटक पक्षांची देखील शहरात ताकद वाढली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सर्वांनी एकत्रित काम करून महायुतीची ताकद वाढवली पाहिजे, असेही आमदार अण्णा बनसोडे म्हणाले.

महायुती मधील आरपीआय (आठवले), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि इतर लहान पक्षांनी आपापल्या परिसरात नेतृत्व तयार करावे. त्यातून सर्वेक्षण करून पुढील निवडणुकीत योग्य निर्णय घेतला जाईल. त्यासाठी संबंधित पक्षाच्या वरिष्ठांशी आपण चर्चा करू, असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version