ताज्या घडामोडीपुणे
शितल भानुदास औटी यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साउ ज्योती फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – साउ ज्योती फौंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांचे वतीने सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन गंज पेठ पुणे याठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
श्री. सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी या शाळेतील शितल भानुदास औटी यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साउ ज्योती फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने आदर्शशिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.













