ताज्या घडामोडीपिंपरी

शहरवासियांनी जास्तीत जास्त झाडे लावून शहराचे वातावरण पर्यावरणपुरक ठेवण्यासाठी प्रयत्न करावा – आमदार उमा खापरे

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील दुर्गादेवी उद्यान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान यांसारखी अनेक उद्याने शहराच्या नावलौकीकात भर पाडत असून त्यांची उत्तम निगा व व्यवस्था राखल्याबद्दल आमदार उमा खापरे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शहरातील हरित क्षेत्राचे प्रमाण चांगले असले तरी सध्याचे वाढते तापमान लक्षात घेता शहरवासियांनी जास्तीत जास्त झाडे लावून शहराचे वातावरण पर्यावरणपुरक ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने रानजाई महोत्सव’ व २७ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन महापौर निवास निगडी, प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी महापौर निवास, निगडी येथे झालेल्या कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आमदार उमा खापरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुर्यकांत मुतियान, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारखानदार बाग स्पर्धेत अर्धा एकर बागक्षेत्र गटात प्रथम क्रमांक सॅडविक कोरोमंट इंडिया प्रा. लि, दापोडी, द्वितीय क्रमांक गरवारे टेक्निकल फायबर्स लि, प्लॉट नं ११ डी-१ ब्लॉक एमआयडीसी चिंचवड तर तृतीय क्रमांक ऑर्सिकॉन ईएल २२ आय ब्लॉक, एमआयडीसी भोसरी यांनी पटकावला. अर्धा ते दोन एकर गटात पहिला क्रमांक टाटा मोटर्स पिंपरी, द्वितीय क्रमांक के एस बी पंप्स लि, जुना मुंबई पुणे हायवे, पिंपरी तर तृतीय क्रमांक एलांटास बेक इंडिया लि खराळवाडी, पिंपरी यांनी पटकावला. दोन एकरपेक्षा जास्त बागक्षेत्र गटात प्रथम क्रमांक एलांटास बेक इंडिया लि खराळवाडी पिंपरी, द्वितीय क्रमांक बिर्ला सॉफ्ट लि, फेज-१, प्लॉट नं ३५/३६ हिंजवडी तर तृतीय क्रमांक ऍटॉस सिंटेल, तळवडे यांनी पटकावला.

शासकीय व इतर संस्थांच्या बाग स्पर्धेत अर्धा एकर बागक्षेत्र गटात प्रथम क्रमांक हिंन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इंन्स्टिट्युट, निगडी, द्वितीय क्रमांक असिम विश्व को ऑप सोसायटी चिंचवड तर तृतीय क्रमांक ऍटॉस सिंटेल, प्लॉट नं बी-५ आय टी पार्क, एमआयडीसी तळवडे यांनी पटकावला. अर्धा एकर ते एक एकरपर्यंत बागक्षेत्र गटात प्रथम क्रमांक एम ई एम. सी. एम ई, दापोडी, द्वितीय क्रमांक प्रधानाचार्य हिंन्दुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, निगडी, पुणे तर तृतीय क्रमांक एटॉस सिंटेल, प्लॉट नं बी-५ आय टी पार्क, एमआयडीसी तळवडे यांनी पटकावला. एक एकर पेक्षा जास्त बागक्षेत्र गटात प्रथम क्रमांक डॉ. डी. वाय पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी, द्वितीय क्रमांक प्रधानाचार्य हिंन्दुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, निगडी पुणे तर तृतीय क्रमांक पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग स नं २६ निगडी प्राधिकरण यांनी पटकावला.

रोपवाटीका स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम श्री साई नर्सरी, भुजबळ चौक, हिंजवडी-वाकड ब्रीज, वाकड, द्वितीय क्रमांक साईराज नर्सरी, शेंडगे वस्ती, वाकड तर तृतीय क्रमांक सुफलम नर्सरी, वाकड यांनी पटकावला.

खासगी बंगल्या भोवतालच्या बाग स्पर्धेत बंगला क्षेत्र १५० चौ. मी पर्यंत गटात प्रथम क्रमांक प्रदिप देशपांडे, द्वितीय क्रमांक संतोष ढाणे तर तृतीय क्रमांक सीमा काळे यांनी पटकावला. बंगला क्षेत्र १५१ चौ. मी ते २५० चौ. मी पर्यंतच्या गटात प्रथम क्रमांक अमृतसिंग बलजित कौर , द्वितीय क्रमांक ज्योती हिरालाल संकलेचा तर तृतीय क्रमांक सविता सिंगवी यांनी पटकावला.

खाजगी बंगल्याभोवतालच्या बाग स्पर्धेत प्रथम क्रमांक इवा सोडानी, द्वितीय क्रमांक सृष्टी संजय शेटये तर तृतीय क्रमांक शिवाजीराव पाटील यांनी पटकावला.

स्वच्छ व सुंदर घर स्पर्धेत घरातील अंतर्गत क्षेत्र ५० ते १०० चौ. मी गटात प्रथम क्रमांक अनिता चंद्रकांत गुंडाळ, द्वितीय क्रमांक निलांबरी महेंद्र भिंगारदिवे तर तृतीय क्रमांक सारिका संतोष कडुसकर, मोशी यांनी पटकावला. घरातील अंतर्गत क्षेत्र १०१ ते १५० चौ. मी गटात प्रथम क्रमांक पुजा निखळ, द्वितीय क्रमांक जयश्री इवळे तर तृतीय क्रमांक बलजीत कौर यांनी  पटकावला. घरातील अंतर्गत क्षेत्र १५० चौ. मी गटात पहिला क्रमांक मधुकर संत, द्वितीय क्रमांक नंदु गवाजी कोकणे तर तृतीय क्रमांक शांता बबनराव तापकीर यांनी पटकावला.

खाजगी बंगल्याभोवतालच्या बाग स्पर्धेत १५० चौ मी व तत्सम घरगुती बंगले गटात प्रथम क्रमांक संतोष गणपत ढाणे, द्वितीय क्रमांक नविन पुनावळे तर तृतीय क्रमांक देवेंद्र लुंकड यांनी पटकावला. १५० चौ. मी पेक्षा जास्त घरगुती बंगले गटात प्रथम क्रमांक गौरी कोकीळ, द्वितीय क्रमांक ओरलीकॉन कंपनी तर तृतीय क्रमांक श्रीकांत पारवले यांनी पटकावला.

महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा स्पर्धेत (कमीत कमी २५ वृक्ष) प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड मनपा शाळा क्र. ५४ राजमाता जिजाऊ विद्यालय, पिंपळे गुरव, द्वितीय क्रमांक मनपा प्राथमिक शाळा क्र ९२, म्हेत्रेवाडी, साठे चौकाजवळ, चिंचवड तर तृतीय क्रमांक आयुर्वेद महाविद्यालय व संधोशन केंद्र, निगडी प्राधिकरण यांनी पटकावला.

खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निगडी प्राधिकरण, द्वितीय क्रमांक डॉ. डी वाय पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स, रावेत रोड, आकुर्डी तर तृतीय क्रमांक नॉव्हेल इंटरनॅशनल स्कुल संभाजीनगर, चिंचवड यांनी पटकावला.

महापालिका परिसरातील सामाजिक संस्था तसेच सार्वजनिक मंडळे (कमीत कमी २५ वृक्ष) स्पर्धेत प्रथम क्रमांक रामेती, द्वितीय क्रमांक इ एल २२ आय ब्लॉक एमआयडीसी भोसरी तर तृतीय क्रमांक एल आय सी प्राधिकरण निगडी यांनी पटकावला.

कारखानदार बाग स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून इन्फोसिस लि, प्लॉट नं २४, फेज-०२, हिंजवडी यांना तर शासकीय व इतर संस्थांच्या बाग स्पर्धेत प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, खासगी बंगल्या भोवतालच्या बाग स्पर्धेत मधुकर संत, सेक्टर नं २५ प्लॉट नं ४६२ निगडी प्राधिकरण आणि नैना जॉनसन, इडन गार्डन बल्क लेन २ सेक्टर २६ रोहाऊस नं १२ निगडी प्राधिकरण यांचा समावेश होता.

खासगी बंगल्याभोवतालच्या बाग स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून जयश्री चंद्रशेखर इवळे आणि संजय ज्ञानोबा शिंदे यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उत्तेजनार्थ म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळा, पिंपरीगाव आणि महाविद्यालयांमध्ये आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र सेक्टर नंबर २७ निगडी प्राधिकरण यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ सामाजिक संस्था/सार्वजनिक मंडळांमध्ये अविरत श्रमदान आणि गृहरचना संस्थांमध्ये कुणाल आयकॉन हौसिंग सोसायटी, पिंपळे सौदागर यांचा सन्मान करण्यात आला.

लक्ष्मी फ्लॉवर ऍन्ड डेकोरेशन, भारत भुजबळ यांना महापौर चषक तसेच हिंदुस्तान पेट्रेलियम, निगडी यांना आयुक्त चषक आणि जयवंतराव टिळक, गुलाबपुष्प उद्यान यांना उप आयुक्त चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सी.आय.ई इंडिया स्टँपिग डिव्हिजन, कान्हे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निगडी प्राधिकरण, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, नेहा पाटील (देशमुख), आदित्य संजय कुलकर्णी, महिन्द्रा स्टील, विशाल एंटरप्रायझेस, रोहिणी निघोजकर, एफ. ई. एम. सी. एम. ई. दापोडी, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रावेत, सुखद गारवा, लक्ष्मण कुंदे, वाय. बी. पाटील कॉलेज, डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सुषमा रासने, महिन्द्रा असोले, पल्लवी काकासाहेब सावंत, सुहासिनी पारखी, शिवशंकर अडसे, रखमाजी गायकवाड, यशवंतराव चव्हाण गुलबपुष्प उद्यान, नेहरूनगर, डॉ. डी. वाय पाटील आर्ट ऍण्ड क्राफ्ट, रावेत, डी. वाय. पाटील कॉलेज, पी. जी. डी. एम, आकुर्डी, शिवकिशोर कानडे, देहुरोड, शितल महाजन, रेवती संजय जाधव, बेबी किरण, प्रियंका भागवत, मोशी प्राधिकरण, प्रशांत उगले, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठाण, रावेत, डॉ. डी. वाय पाटील, ज्ञानशांती शाळा, रावेत, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, रावेत, डी. वाय पाटील ऍग्रीकल्चर कॉलेज, रावेत यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तर सी. आय. ई. इंडिया स्टँपिग डिव्हिजनला फुलांचा राजा म्हणून ढाल देऊन तर जयवंतराव टिळक, गुलाबपुष्प उद्यान यांना फुलांची रानी म्हणून तबक देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने कॅलिग्राफी, पर्यावरण तज्ञांचे मार्गदर्शन, निसर्ग कवितांचे संमेलन, निसर्ग गीतांचा बहारदार कार्यक्रम, चर्चासत्र, माहितीपट तसेच स्टॉल्स अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती समाधान व कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकिरण घोडके यांनी, सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार राजेश वसावे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button