चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिना निमीत्त वूई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने केशवनगर चिंचवड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.बुद्ध वंदना घेण्यात आली.
फाउंडेशनचे सल्लागार मधुकर बच्चे यांनी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाण्याने जनतेवर झालेला आघात ,झालेले दुःख व त्यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद यांनी बाबासाहेबांची जगभर असलेली ख्याती,त्यांनी समाजात केलेला बदल, तसेच भारताला दिलेले संविधान याविषयीं सविस्तर माहिती दिली.
या वेळी सलीम सय्यद,मधुकर बच्चे, जयंत कुलकर्णी दिलीप चक्रे, रवींद्र काळे,गणेश बच्चे, सदाशिव गुरव, श्रीनिवास जोशी अनिल पोरे, शंकर राव कुलकर्णी ,मोहम्मद शेख, अर्जुन पाटोळे,पोपट बच्चे,अर्चना बच्चे,आकाश खिल्लारे,मच्छिन्द्र थोरवे, उत्तम विटुळे, सखाराम देशपांडे,आदी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आबेडकर यांना आभिवादन केले.













